नवीन लेखन...

पावित्र्य रक्षाबंधनाचे !

बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते रक्षाबंधनाच्या दिवशी, बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी सुरु होते का त्याच दिवशी? एकदा भावाच्या मनगटावर राखी बांधली म्हणजे घेतली शपथ भावाने बहिणीच्या सुरक्षेची आणि पवित्र बंधनाची ! एका वर्षात विसरला का भाऊ आपल्या बहिणीला? का लक्षात राहावे म्हणून पुनःपुन्हा दरवर्षी राखी बांधावी लागते भावाच्या मनगटावर बहिणीला? एवढे का तकलादू नाते असते जे खुंटा […]

सदैव नामस्मरण

प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।। चमत्कार दिसून आला एके दिवशी । राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।। विज्ञानाने उकल केली या घटनेची । खात्री करिता सत्यता पटली याची ।। चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे । त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।। शब्दांचे वलय फिरती देहाभोवती । […]

अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – ६

काऊंटी फेअर्स सन १८०० च्या सुमारास शेतकी जत्रांमधून खेडयापाडयातील लोकांना नवीन शेतकी तंत्रज्ञान, साधनं, पिकांच्या आणि जनावरांच्या जाती – उपजाती बघण्याची संधी मिळायची. १९ व्या शतकात, या जत्रांमधे इतर शैक्षणिक, स्पर्धात्मक, सामाजिक तसंच करमणुकीच्या गोष्टींचा समावेश होत गेला. त्या नंतर केवळ काही पिढयांमध्ये, जिल्हा आणि राज्य स्तरावरच्या शेतकी जत्रा, ही पूर्णांशाने एक अमेरिकन पध्दत / रीतिरिवाज […]

गोलम गोल पाने.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती. सगळी पानं एकदम गोलम गोल होती. सगळ्या झाडांची, झुडुपांची, वेलींची पानं एकदम गोलम गोल होती. सगळ्या झाडांवर लहान लहान गोल गोल पानं. तर काही झाडांवर मोठी मोठी गोल गोल पानं. झाडांवरच्या वेलीसुध्दा गोल गोल. त्या वेलींची पानं सुध्दा गोल गोल गोल. झाडाखालचं […]

लव्ह स्टोरी

ते रोज एकमेकांना लांबूनच पाहायचे. पण.. बोलणं कधी झालं नाही. कधी कधी ते एकाच तलावात पोहायला जायचे. पण.. त्यावेळी इतकी गर्दी असायची की त्यांना काही बोलता यायचं नाही. कधी ते फिरायला गेले तर लांबूनच चालाचये. त्यामुळे.. बोलणं नाही तर फक्त बघणं व्हायचं. गेलं वर्षभर तो तिच्याशी बोलण्याची वाट पाहात होता. आज तो हात ताणून आरामात निवांत […]

आमची माती आमचं शिक्षण

परिक्षा शुल्क भरायलाही पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडून गावाकडे परतणारी शेतकऱ्याची पोरं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरी महाविद्यालयांपुढे रांगा लावून उभे असलेले विद्यार्थी असे विरोधाभासी चित्र सध्या दिसत आहे. कधी काळी डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न पाहणारे डोळे मातीत राबवण्यासाठी कृषी अभ्यासक्रमाकडे कसे काय वळू लागले? प्रवेश फेरीसाठी ९४ टक्के गुणांचा कट ऑफ पर्यंत कशी पोहचली? आमची माती […]

अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – ५

शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी शेती संदर्भातील प्रकल्प 4-H : या प्रकल्पाची सुरुवात २० व्या शतकाच्या सुरवातीला, अमेरिकेच्या विविध राज्यांमधे साधारणपणे एकाच वेळी झाली. या मागचा उद्देश, public schools मधलं शिक्षण अधिकाधिक प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक स्वरूपाचं व्हावं आणि एकंदर शिक्षणाची ग्रामीण भागाशी योग्य सांगड घातली जावी, असा होता. वर उल्लेखलेल्या Land Grant Universities ची सुरुवात होऊन ३०-४० […]

नशीब…

तुझी ती भेट अंतरंगात जपली तुझ्या विरहाने आग मनात लागली. तुझे ते रुप चंद्रमा नभात तुझी ती वाणी हसरी प्रभात भेटण्याची वेळ असे तुझ्या मनाची मी सदेेेैव पाहतसे वाट तुझ्या  येण्याची वचन तु दिलेस सा ठेवुन प्रेमाची फसवून तु गेलीस लाज ठेव तया वचनाची ना दुसरीचे रुप माझ्या निरमल मनात निघून येशील पुन्हा हेच असावे माझ्या नशीबात……  — […]

पार्सल टेप आर्ट

काही कलाकार इतके प्रतिभावंत असतात की त्यांना कला साकारण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करुन घेता येतो. चित्रकला ही साधारणपणे कागदावर ब्रशने किंवा इतर माध्यमातून रंगरंगोटी करुन साकारली जाते. मात्र ब्रश किंवा रंगाचा वापर न करता एकाद्याने अप्रतिम चित्रे साकारली तर आपण काय म्हणाल? जगावेगळा आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला मुळचा युक्रेनमध्ये जन्मलेला आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये वास्तव्याला असलेला […]

बारा ज्योतिर्लिंगे – श्री मल्लिकार्जुन

हे दुसरे ज्योतिर्लिंग दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात श्री शैल डोंगरावर कर्नुल – या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या १२५ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिराबाबतची कथा अशी. […]

1 2 3 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..