नवीन लेखन...

हृदयाचे वेगवेगळे आजार

हृदयाचे वेगवेगळे आजार
हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांसंबंधी आपण थोडक्यात माहिती पाहू :
जन्मजात दोष : काही दुर्दैवी व्यक्तींच्या बाबतीत हे लक्षात आले की त्यांच्या हृदयाच्या रचनेत जन्मतःच दोष असतो. त्यामुळे वेगवेगळ्या व्याधी त्यांना त्रस्त करीत असतात. रचनेसंबंधीच्या दोषातून उद्भवलेल्या या व्याधीवर शल्यक्रिया हा उपचार लाभदायक ठरतो. हृदयाच्या थैलीला अतिसूक्ष्म छिद्र असणे किंवा हृदयाच्या झडपांमध्ये काही दोष असणे हे मुख्य जन्मजात दोष आहेत. हे दोष औषध योजना, आहार नियंत्रण व तज्ज्ञांनी सुचविलेले व्यायाम याच्या साह्याने नियंत्रणात राहतात. हृदयाच्या मुख्य व्याधी कोणत्या आहे ते आपण पाहू :
१) हृदयक्रिया बंद पडणे (कार्डियाक अरेस्ट)
या व्याधीवर कोणताच इलाज उपयोगी पडत नाही. छातीजवळ हृदयपटलाच्या भागात अतिशक्तिशाली मर्दन करणे व त्याच वेळी मृतवत असलेल्या व्यक्तीच्या तोंडात दुसर्याने जोरजोराने श्वास सोडणे. हा उपचार क्वचित उपयोगी पडतो. अन्यथा या व्याधीचे मृत्यू हेच उत्तर आहे.
२) हृदयाच्या काही रोहिणीमध्ये अवरोध (कोरोनरी थांब्रोसिस)
हृदयातून निघणार्या किंवा हृदयाला रक्त पोहचविणार्या काही रोहिणींमध्ये आतून थर जमा झाल्यामुळे रक्त वाहून नेण्याच्या त्यांच्या कार्यात बाधा येते. त्यामुळे श्वास प्रश्वास घेणे अत्यंत जड होऊ लागते. चालणे, बोलणे, बसणे इत्यादी सर्वच क्रिया अति कठीण वाटू लागतात. अशा वेळी दुर्लक्ष झाले तर हृदयक्रिया बंद पडून मृत्यू येऊ शकतो. यावर उपाय म्हणजे जोड रक्तनळ्या लावणे अर्थात बायपास सर्जरी करणे.
३) रक्ताभिसरणाच्या क्रियेची लय मंद होणे (अंजायना पेक्टोरिस)
या व्याधीत रक्ताभिसरणाची गती हृदयातूनच मंद होते. त्यामुळे प्रत्यक्ष हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतो. त्यामुळे डाव्या छातीच्या आत तीव्र व जीवघेणी कळ येते. तसेचसंपूर्ण डाव्या हातात मुख्यतः खांद्यात आणि दंडात भयंकर दुखणे जाणवू लागते. ही कळ इतकी भयंकर असते की त्याचे वर्णन करणे कठीण वाटते. या व्याधीवर आधुनिक वैद्यकशास्त्रात औषधोपचाराद्वारे हमखास अशी उपाययोजना केली जाते.
४) हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक)
या विकारातसुद्धा हृदयक्रिया एकाएकी बंद पडते. तत्काळ औषधोपचार केले तर या व्याधीतून सुधारण्याची बरीच शक्यता असते. हृदयविकाराचा झटका हा आधीच अॅन्जायनाचा त्रास होत असलेल्या रुग्णाला होऊ शकतो. तसेच पूर्वी हृदयाला कोणताही त्रास नसलेल्यासही येऊ शकतो. अशा व्यक्तीला छातीत,तसेच डावा खांदा, हात या ठिकाणी जड वाटू लागते व दुखू लागते. या दुखण्याची तीव्रता अॅन्जायनापेक्षा जास्त असते. दुखण्याबरोबर चक्कर येणे, घाम फुटणे, मळमळणे, उलटी होणे हेही त्रास संभवतात. झटका आल्याचे दुखणे २० मिनिटाहून जास्त तसेच राहते. अशा रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक ती यंत्रणा असलेल्या अतिदक्षता विभागात त्याला ठेवले जाते. त्यात मॉनिटरच्या योगे रुग्णाचा आलेख सतत पडद्यावर दिसत राहतो. रुग्णाच्या यथायोग्य उपचारासाठी इतरही सुविधा अतिदक्षता विभागात उपलब्ध असणे आवश्यक आहे.
५) हृदयाच्या आत चाललेल्या कार्यात अवरोध (हार्ट ब्लॉक)
ही व्याधी हळूहळू वाढीस लागते. त्यामुळे योग्य वेळी योग्य ते निदान झाल्यास या व्याधीवर नियंत्रण ठेवता येते व तिचे गंभीर परिणाम टाळता येतात.
६) हृदयाच्या सामान्य गतीपेक्षा कमी गती व अनियमित अशी हृदयाची धडधड होणे (ब्रॅडी कार्डिया)
या व्याधीमध्ये हृदयाचे अखंड चालू असलेले प्रसरण-आकुंचन क्षण दोन क्षण बंद होते. मात्र दुसर्याच क्षणी हृदयाचे धडकणे चालू होते. या व्याधीत जीव कासावीस होतो. अशक्तता वाढत जाते. कोणत्या वेळी काय होईल हे सांगणे कठीण होते. औषध, गोळ्यांनी बरे वाटू शकते; पण शल्यक्रिया करून ‘पेसमेकर’ नावाचे उपकरण छातीत बसविल्याने हृदयाचे ठोके नियमित करणे हा उपचार हमखास उपयोगी ठरतो.
७) हृदयाची गती वाढणे (टॅकी कार्डिया)
यात हृदयाच्या ठोक्याची गती खूप वाढते. त्यामुळे वारंवार जीव घाबरा होतो. छातीत फार मोठ्या प्रमाणात धडधड ऐकू येते व त्यामुळे काही सुचेनासे होते. औषधी गोळ्यांनी ही व्याधी नियंत्रणात राहते.
८) हृदयाचा आकार वाढणे (कार्डियाक हायपर ट्रॉफी)
९) हृदय ज्या जागेत बसले आहे त्या हृदय कपाटाचा आकार वाढणे (कार्डियाक डायलेटेशन)
या व्याधीवर आधुनिक वैद्यकशास्त्रात महत्वपूर्ण संशोधन झाले आहे. त्यामुळे हृदयविकार तज्ज्ञ या व्याधीच्या रोग्याचे जीवन सुसह्य करू शकतात.
१०) हृदयाच्या आसपास काही द्रव पदार्थ एकत्रित होणे (पेरी कार्डियल इन्फ्यूजन)
या व्याधीत हृदय गतीमध्ये व कार्यामध्ये अवरोध निर्माण होतो. अशा स्थितीत आधुनिक यंत्रांनी सुसज्ज अशा चिकित्सालयात दाखल होणे हा एकमेव तरणोपाय असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..