नवीन लेखन...

स्त्री मुक्तीचा खरा अर्थ – ’’आर्थिक स्वावलंबन‘‘

’’ सवित्रीबाई, रमाई, जिजाईचा वसाअंधारात दिवा प्रकाशतो जसा शिव – साहू, फुले, बाबा घडवावे,उमटवूनी स्वकतृत्वाचा ठसा ‘‘

एवढी प्रचंड स्त्रीची ओळख असतांनाही अजूनही स्त्री जन्मा हीच तूझी कहानी ह्वदयी अमृत नयनी पाणी या विचाराप्रमाणे जिवन जगत आहे. प्रत्येक स्त्री ही राणी लक्ष्मीबाई आहे.

परंतु आजचे दुष्य बघीतले तर तीची दषा लग्नापुर्वी ’राणी‘ लग्नानंतर ’लक्ष्मी‘ आणि मुल झाली की ’बाई‘ अशी झाली आहे. भारतीय स्त्रीचे जीवन यमुनेच्या प्रवाहाप्रमाणे संथ वाहत आहे.

’’ जिच्या हाथी पाळण्याची दोरी,ती जगाला उध्दारी असे म्हणतात ‘‘

परंतु खरं तर दुसर्‍याचा उध्दार करता करता ती स्वतःचा उध्दार करायची थांबली किंवा तीला स्वतःचा उध्दार करायची संधीच मिळाली नाही. अजुनही स्त्री स्वतःच्या पायावर उभी असुनही तीचे जीवन पुरूषावलंबी आहे. ’थांब उदयाचे माऊली! तीर्थ पायाचे घेई तो‘ एवढा स्त्रीचा मान व अधिकार! एवढी तीची थोर महती! स्त्रीची कुचंबना, विटंबना याच समाजात केली जाते. एकविसाव्या शतकात वावरत असतांना सर्व क्षेत्रात स्त्री वावरतांना दिसते. पण खरोखर किती स्त्रीचा या बाहय आवरणाखाली पारतंत्र्यात जगंत आहे. खरचं, स्त्री मुक्त आहे काय?

भारत हा कृशीप्रधान देष आहे ७५ जनता खेडभागात राहते. २५ः शहरी भागात राहाणार्‍या स्त्रीया स्वतःचा उध्दार करू शकल्या. त्यातही २०ः स्त्रीया अजुनही मानसीकरित्या पुरूशांच्या तावडीतून मुक्त नाहीत. जरी सर्व क्षेत्रात त्या पुढे असल्या तरी त्यांच्या कुटुंबात मात्र वेगळेच चित्र असते. ग्रामीण भागातील स्त्रीयांपर्यंत कुटुंबात मात्र वेगळेच चित्र असते. ग्रामीण भागातील स्त्रीयांपर्यंत अजुनही शासनाच्या योजना पोहचूनही त्यांचा लाभ त्यांना घेता येत नाही. याचे कारण म्हणजे अज्ञान, दारिद्रय, अंधश्रध्दा, विशेष म्हणजे पितृसत्ताक पुरूषप्रधान संस्कृती. जिथे ग्रामीण भागातील ७५ः स्त्रीया अजुनही पुरुषांच्या, अज्ञानाच्या अंधकारमय बेडीत आहेत. तीथे २५ः स्त्रीया प्रकाषात असून काय उपयोग? तोही प्रकाश प्रखर नाही.

मग ३३ः आरक्षण मिळुनही खरचं स्त्री मुक्त झालीय का?स्वतःची जीवनगाथा गातांना स्त्री म्हणते आहे –

’’गर्भाचे बंधन तुटले पणमुक्त कधी झाले नाही आधी मुलगी नंतर पत्नी भोग जीवाचे गेले नाही.शेवटी स्वतःलाच तीची ओळखपटत नाही म्हणून ती म्हणते -मी आदिती, मी निर्मीतीयुगायुगाची मीच करतीअस्तित्वाला नसे अर्थ फारसातू कोण? म्हणून चिडवी आरसा‘‘

आर्याच्या वर्णव्यवस्थेत स्त्री दलित होती आणि म्हणूनच जुन्या सरंजामशाही जातीय समाजव्यवस्थेमध्ये शुद्राप्रमाणे स्त्रीयांना शिक्षणाचा हक्क नव्हता अगदी प्राचीन काळातील मातृवंषीय किंवा मातृकेंद्रिय समाजामध्ये स्त्रीयांना महत्वाचे स्थान होते. मोहोंजोदाडो सारख्या सिंधु संस्कृतीच्या या शहरामध्ये स्त्रीया संस्कृती प्रमुख होत्या. परंतु पुढे प्रस्थापित झालेल्या आर्य प्रणित समाजात स्त्रीचे शोषण होऊ लागले. जाती व्यवस्था सुरू झाल्यानंतर स्त्रियांचा स्वातंत्र्याधिकार तसेच शिकण्याचा अधिकार पूर्णपणे बंद झाला. स्त्रीयांचे रोजचे काम म्हणजे चूल व मूल तर शुद्रातिशुद्र स्त्रीयांना याशिवाय शेतीचे किंवा घरचे इतर काम तिचे धार्मिक काम म्हणजे पतीप्रथेचे पालन करणे आणि म्हणूनच स्त्री मुक्तीच्या संदर्भात महात्मा फुलेंनी त्यावेळी अस्तीत्वात असलेली सतीप्रथा, बालविवाह, सक्तीचे वैधव्य यावर कुर्‍हाड चालवीली. स्त्री लेखांबाबत ती जाब विचारिल, तिच्यावर अव्याहत चालत आलेली पुरुषांची दादागीरी संपेल या भीतीपोटी ती अशिक्षित असायला हवी असं आर्य प्रणितांना वाटत होते. स्त्री ही लहानपणी वडीलांच्या ताब्यात त्यानंतर नवर्‍याच्या व म्हातारपणी मुलांच्या ताब्यात होती अर्थात स्त्रीयांना स्वातंत्र्याचा अधिकार नव्हता आणि याला मनुस्मृतीतच नव्हेतर इतर आर्यप्रणीत धर्मग्रंथाचा आधार होता. अशाप्रकारे त्यावेळी स्त्रीची दडपणूक होत होती. या गुलामगिरीतून स्त्रीला काढण्याचे काम सावित्रीबाई फुलेंनी केले. म्हणून ’पहिले नमन सावित्रीला जिने स्त्री-मुक्तीला जन्म दिला.‘

स्त्रीमुक्त तर झाली, परंतु स्वतःच्याच भावविश्वाच्या चक्रव्यूहात ती अडकली. पतीव्रता हा तीचा धर्म तिने सोडला नाही अजूनही स्त्रीया विविध क्षेत्रात कार्यरत असूनही पुरुषांपुढे दुर्बल बनतात. अजुनही मुलगी सुंदर, सुशील असुनही हुंडयासारख्या प्रथेला बळी पडते आहे. अजुनही आम्ही वंशाचा दिवा मुलगाच याचा अट्टहास सोडलेला नाही. अजुनही मनात प्रश्न रेंगाळतो आहे.

’’हे हात त्याच कळीला का म्हणून तोडायला उठतात. फुलण्याआधीच देठापासून खुडायला झटतातकाटयांचीही भीती त्यांना वाटत नाहीकी कळीला फुलण्याचे स्वातंत्र्य इथं नाही?‘‘

अजुनही स्त्रीच्या देहाचा बाजार मांडला जातो. अजूनही तिच्या भावनांची राखरांगोळी केली जाते. अजुनही स्त्री-शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत झालेला नाही. दररोज वर्तमानपत्रात बातम्या येतातच, तीने पत्नीचा संशयावरून खून केला, तर कधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार असे निघ्रुण प्रकार घडत आहे. हे प्रकार उच्चस्तरापासून तर खालच्या स्तरापर्यंत दिसून येतात. यातून स्त्रीला मुक्त करण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी पहिले शस्त्र शिक्षणाचे वापरले पाहिजे. सरोजिनी नायडू यांनी म्हटल्याप्रमाणे, एक स्त्री जर साक्षर झाली तर ती संपूर्ण कुटुंबाला साक्षर करते. शिक्षणामुळे विचारांमध्ये क्राती होते. सुदृढ, सक्षम आणि परिवर्तनवादी विचार स्वीकारणारी माताच मुलीच्या हातात संगणक देवून तिला प्रगतीचा मार्ग दाखवू शकते. मुलींना वडाला फेरा माराचला शिकविण्याएवजी अंतरिक्षामध्ये कल्पना चावलासारखी झेप घेणे अशी दृष्टी दिली तरच सावित्रीबाईंना अपेक्षीत असलेलं स्त्रीचं व्यक्तीमत्व घडून येईल. म्हणूनच स्त्री-शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.

स्त्री शिक्षीत झाली तरच ती अन्यायाविरूध्द लढू शकते. शिक्षणामुळे आचार-विचारात प्रचंड परिवर्तन घडून येते. शिक्षणामध्ये जीवनाचा मुलमंत्र लपलेला आहे. मूळूमूळू रडण्यात स्त्रीचे शौर्य नाही, तर तुडूतुडू सर्व रूढी – परंपरांना तुडवण्यात तिचे सामर्थ्य व शौर्य आहे. स्त्रीयांनी दाखवून दिले पाहिजे सौंदर्य हे आमचे सामर्थ्य नसून सामर्थ्य हेच आमचे सौंदर्य आहे. स्त्री षिक्षणातुन स्त्रीया स्वावलंबी होतील, अनेक लघुउद्योग, ग्रामोद्योग,

कारखाने त्या स्वतः चालवतील. आर्थिक स्वावलंबन प्राप्त झाले की प्रचंड उर्मी देहात संचारत. काहीही अदम्य करण्याची जिज्ञासा जागृत होते. आर्थिकरित्या बळकट झाल्याषिवाय स्त्री कधीच मुक्त होणार नाही. हुंडयासारख्या प्रश्नना सामोरे जातांना ती जर आर्थिकदृश्टया सबळ असली तर नवर्‍याला लाथ मारून जाण्याइतकी ताकद तिच्याकडे असेल. प्रेमभंग झाला म्हणून ती रडत बसणार नाही तर त्याला आपल खरं रूप दाखवून देण्यासाठी अषा अनेक तरूणींना यापासून सावध करेल. आई-वडील घरात घेणार नाही, म्हणून नवर्‍याचा जाच ती कधीच सहन करणार नाही, त्याचे अष्लिल चाळे खपवून घेणार नाही तर मोकळेपणाने स्वतः स्वतंत्र जीवन जगेल. मुलगाच पाहिजे असा आग्रह धरणार्‍या पतीला कधीही ती आश्रयी जाणार नाही, तर मुलगीच बरी या निर्णयावर ती ठाम राहिल. भावूक होवून कधीच पुरूशांच्या लाडिकपणाला बळी पडणार नाही. तिच्यापुढे स्त्रीयांच्या उन्नतीसाठी झटणार्‍या सरोजीनी नायडू यांचा आदर्श आहे. यासोबतच श्रेष्ठ क्रांतीकारक सुहासिनी गांगुली, अनेक दिवस भूमिगत राहून क्रांती, करणारी विरांगना पारूला मुखर्जी, कठोर कारावास भोगणारी तेजस्वी महिला कमलादेवी चटोपाध्याय, स्वातंत्र्य व न्यायासाठी झटणारी चितगावची प्रितीलता, स्वातंत्र्यात योगदान देणारी उशा मेहता, भारताच्या पहिल्या महिला पंत
्रधान इंदिरा गांधी, संयुक्तराष्ट्र संघटनेच्या अघ्यक्षा विजयालक्ष्मी पंडीत यासारख्या प्रभावी व्यक्तीमत्वाची प्रेरणा तिच्यासोबत आहे. तेव्हा ही अलौकीक प्रेरणा घेवून क्रांती घडवून आणण्यासाठी स्त्रीयांनी तत्पर राहावे.

स्त्री ही स्त्रीचीच शत्रू आहे. जेवढी क्रुर कृत्ये समाजात घडत आहेत त्यात स्त्रीयांचा मोठा वाटा आहे. पतव्रिता म्हणून पतीची सेवा करावी अषी धारणा स्त्रीनेच स्वतःशी बाळगली आहे. नव्याने कोणते काम करू नये हा नियम तिनेच काढला. वंषाला दिवा ’ मुलगा ‘ पाहिजे हा सासुरूपी स्त्रीचाच मुख्य अट्टाहास. हुंडयासाठी सुनेला जाळणा-या व्यक्तीमध्ये एकतरी स्त्री असतेच. एखादी स्त्री परपुरूशाषी बोलत असली तर तिच्यावर लांछन लावणारी स्त्रीच. स्वाभिमानाने एकटं जिवन जगणार्‍या स्त्रीकडे बोट दाखवणारी स्त्रीच असते. नवरा सोडलेली, अष्लिल, असे आरोप लावणारी स्त्रीच असते. मदारी खेळ दाखवतो आणि प्रेक्षक उत्स्फूर्तपणे हसून टाळया वाजवून त्याची मजा घेतात. अगदी तषीच मजा पुरुषवर्ग स्त्रीची स्त्रीकडून होणारी पिळवणूक बघुन घेतो. आणि म्हणून स्त्रीयांनो जागे व्हा. बदलत्या काळानुसार स्वतःला बदला. एका सखीला सावरण्यासाठी दुसर्‍या सखीने पुढाकार घ्या. तिला समजुन घ्या. आपली अब्रु आपल्या हाताने चव्हाटयावर आणु नका. आपल्या बेडीची चावी आपल्याच कंबरेला खोचली आहे.

आपल्यामध्येच असणारी फुट पूरूषवर्गाला प्रोत्साहन देत आहे. म्हणून शिका, संघटीत व्हा, स्वतःच्या पायावर उभे व्हा. स्वतःची ओळख स्वतः तयार करा. स्वतंत्र अस्तित्व तयार करा. जगातली कोणतीही ताकद आपल्याला हरवू शकत नाही. आर्थिक स्वावलंबी झाल्यानंतर स्त्रीयांना कशाचीही अडचण येणार नाही. प्रत्येक समस्येचे गूढ अर्थव्यवस्थेत दडलेले असते म्हणून स्त्रीयांनी आर्थिक रित्या बळकट होणे आवाश्यक आहे. शिवाय तिचा मूळ स्वभाव भावुक असणे सोडलाच पाहिजे. तेव्हाच क्रांती घडू शकते. षेवटी ’’ मी स्त्रीयांना एवढेच म्हणेन –

मर्यादा पाळतेस तू, स्वपायावर चालतेस तू,मग का अश्रू व्यर्थ घालतेस तू,घर सजवतेस तू, त्यासाठी झिजतेस तू, मग का अवेळी गडे विझतेस तू, धर्म पाळतेस तू, जेवण वाढतेस तू,पण का स्वतःच्या जिवास जाळतेस तू, सावित्री तू, राणी तू, दुर्गा तू, इंदिरा तू,मग का अशा चांडाळांना घाबरतेस तू?‘‘

कु. कल्पना यु. बन्सोड
जि. प. उ. प्रा. शाळा, उर्जानगर पं.स. चंद्रपूर जि. चंद्रपूर9960015908

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..