नवीन लेखन...

मराठी लेखक, कवी व नाटककार पु.शि.रेगे

पु.शि.रेगे यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. पर्यंत झाले होते. लंडनच्या “स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स“ मधून त्यांनी बी.एस्सी. ची पदवी संपादन केली होती. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला.अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्या् उत्कट अशा मनोहर भावनांनी नाटककार मा. पु.शि.रेगे यांच्या कविमनावर भुरळ पाडली होती.

रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्न करीत होते. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर शब्दांची मधुर पखरण असे. “जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रद्धा व धारणा होती. “फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबर्याा दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत.

सावित्री ही कादंबरी १९६२ मध्ये लिहिलेली. म्हणजे तिला आता ५५ वर्षे झाली. पण अजूनही तिचं गारुड जाणकार मराठी वाचकांच्या मनावरून उतरलेलं नाही. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह आहे. या साहित्याखेरीज त्यांनी काही शैक्षणिक पुस्तकेही लिहिली आहेत. छंद या द्वैमासिकाचे संपादन ही रेगे यांची आणखी एक क्षणीय कामगिरी होय. हे भाषा, कला व साहित्य या विषयांना वाहिलेले हे एक वाङ्मयीन नियतकालिक होते. १९५४ मध्ये काही समानधर्मीयांच्या सहकार्याने त्यांनी ते सुरू केले. १९६० साली ते त्यांनी बंद केले. रेगे यांनी छंदमध्ये विपुल लेखन तर केलेच; पण त्याची संपादकीय व्यावहारिक व आर्थिक बाजूही आस्थेने संभाळली.

पु.शि.रेगे यांनी १९६५ मध्ये रशियाचा येथे मॉस्को लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात एक भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. १९६५ मध्ये केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे ते उद्घघाटक होते. वर्धा येथे १९६७ साली आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पु.शि.रेगे यांचे १७ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..