नवीन लेखन...

जयोस्तु ते श्रीमहन्मंगले…

जयोस्तु ते श्रीमहन्मंगले
शिवास्पदे शुभदे…
स्वतंत्रते भगवती
त्वामहं यशोयुतां वंदे…

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं,
नीति संपदांची
स्वतंत्रते भगवती श्रीमती
राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची
आकाशी होशी…
स्वतंत्रते भगवती
चांदणी चमचम लखलखशी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे…

गालावरच्या कुसुमी किंवा
कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी
विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे
गांभीर्यहि तूची…
स्वतंत्रते भगवती
अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे…

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे
तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती योगिजन
परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्‍नत
महन्मधुर तें तें…
स्वतंत्रते भगवती
सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे…

हे अधम रक्तरंजिते
सुजन पूजिते
श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण,
चराचर शरण,
श्री स्वतंत्रते…
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे…

— स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..