नवीन लेखन...

हेही नसे थोडके !

सध्या देशात विशेषत: महाराष्ट्रात, बर्ड फ्लूचा आतंक माजला आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी सरकारी स्तरावर प्रचंड धावपळ सुरू आहे. लाखोंच्या संख्येने कोंबड्या मारल्या जात आहेत. या रोगाच्या धास्तीने कुक्कुटपालन व्यवसायावरच गंडांतर आले आहे. कोंबड्या बर्ड फ्लूने मरत आहेत की अन्य कोणत्या रोगाने, यावर दावे-प्रतिदावे केले जात आहे. सरकारची धावपळ पाहू जाता राष्ट्रावर प्रचंड मोठे संकट कोसळल्याचा आभास निर्माण होत आहे. हा बर्ड फ्लू खरेच इतका भयंकर आहे का? करोडोंचा व्यवसाय, लाखो लोकांचा रोजगार पणाला लावण्याइतका मोठा धोका या रोगाने निर्माण केला आहे का, हे प्रश्न विचार करायला लावणारे आहेत. बर्ड फ्लू एक घातक आजार आहे हे मान्य केले तरी त्याची घातकता अन्य कुठल्याही आजाराइतकीच आहे हे लक्षात घ्यायला हवे. शेवटी तो एक फ्लूचा प्रकार आहे. कोंबड्यांद्वारे तो संक्रमित होतो; परंतु याचा अर्थ प्रत्येक कोंबडी बर्ड फ्लूठास्त आहे आणि त्या कोंबडीच्या संपर्कात येणारा अथवा त्या कोंबडीचे मांस खाणारा प्रत्येक व्यक्ती बर्ड फ्लूचा बळी ठरेल असा होत नाही. वास्तविकता तर ही आहे की, बर्ड फ्लूचा एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्रेक होऊनही अद्याप बर्ड फ्लूने एकाही व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागलेले नाही. केवळ नऊ जणांना या रोगाची लागण झाल्याचा संशय आहे आणि त्यांची प्रकृती गंभीर वगैरे नाही. मुळात या रोगाची जी दहशत निर्माण करण्यात आली आहे तितका हा रोग गंभीर नाही. या रोगाचे विषाणू 25 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात जिवंत राहू शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्या महाराष्ट्रात या रोगाचा उपसर्ग आढळून आला त्या महाराष्ट्रात हिवाळ््याचे मोजके काही दिवस वगळता तापमान सातत्याने 25 अंश सेल्सिअसच्या वर असते. अशा परिस्थितीत बर्ड फ्लूच्या विषाणूंचा शिरकाव राज्यात कसा झाला आणि त्यांनी

हजारो कोंबड्यांना आपले

निवासस्थान कसे बनविले, हा एक संशोधनाचाच भाग आहे. प्रयोगशाळेनेच तसा अहवाल दिला असल्याने बर्ड फ्लूचा उपसर्ग राज्यात झाला हे एक वेळ मान्य केले तरी ज्या प्रकारे आणि ज्या प्रमाणात त्याच्या घातकतेचा प्रसार सुरू आहे ते पाहता हा बर्ड फ्लू भारतात व्यवस्थित ‘प्लँट’ तर केला नसेल ना, अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे. गेल्या काही वर्षांत भारतात विविध रोगांचा उपद्रव बराच वाढल्याचे दिसते. अचानक या रोगांची संख्या आणि घातकता वाढण्याचे कारण तरी काय? दुसरे एक महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे रोग कोणताही आणि कितीही घातक असला तरी त्यावरचे औषध तत्काळ उपलब्ध होते. या निव्वळ योगायोगाच्या गोठी नाहीत. बहुराठ्रीय औषध उत्पादक कंपन्यांचे अर्थकारण यात दडलेले आहे असा संशय घेण्यास पुरेपूर वाव आहे. बर्ड फ्लूच्याच उदाहरणाने हे स्पष्ट होते. अतिशय घातक म्हणून या रोगाचा आता प्रसार होत असला तरी हा रोग मुळात तेवढा घातक नाही. आठ वर्षांपूर्वी तामिळनाडूत अशाच प्रकारच्या रोगाने हजारो कोंबड्या मेल्या होत्या. त्या वेळी एखाद्या माणसाला या रोगाची लागण झाल्याचे ऐकिवात नाही. आताच हा रोग घातक ठरण्याचे कारण स्पष्ट आहे. या रोगाच्या उपचारासाठी ज्या कंपनीचे औषध परिणामकारक समजले जाते ती कंपनी अमेरिकेची आहे. राष्ट्राध्यक्ष बुश यांच्या अति निकटवर्ती असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मालकीची ही कंपनी आहे. जगात कुठेच बर्ड फ्लूचा उद्रेक झालेला नसल्याने कंपनी घाट्यात चालली होती. कंपनीला वर आणण्यासाठी काही तरी करणे भाग होते आणि काहीतरी किंवा काहीही करायला भारतासारखा हक्काचा मित्र दुसरा कोणता असणार? या कंपनीची एजन्सी भारतातील कंपन्यांनी घेतल्यानंतर आठच दिवसांत भारतात अतिशय घातक (?) अशा बर्ड फ्लूचा उपद्रव सुरू झाला. बर्ड फ्लू हा साधा फ्लूच्या गटातला एक आजार आहे. नेहमीच्या
षधोपचाराने किंवा निव्वळ विश्रांती घेतली तरी तो सहज बरा होऊ शकतो; परंतु तसे झाले तर त्या औषध कंपनीचे दुकान कसे चालेल? सगळी सरकारी यंत्रणा त्या साध्या रोगाला घातक ठरविण्याच्या मागे लागली. प्रसारमाध्यमांनीही या रोगाचे भडक चित्र रंगवायला सुरुवात केली. एखादे राष्ट्रीय संकट कोसळल्यासारखी धावाधाव सुरू झाली. बहुराठ्रीय कंपन्या म्हणजे तर सरकारचा ‘वीक पॉइंट’ आणि त्यातही अमेरिकन कंपनी तीही राष्ट्राध्यक्षाच्या जवळच्या माणसाची, मग तर विचारायलाच नको! सांगायचे तात्पर्य, आपली फालतू उत्पादने महागड्या दराने विकण्यासाठी बहुराठ्रीय कंपन्या इथल्याच सरकारला हाताशी धरून अतिशय भ्रामक प्रचार करीत असतात आणि सरकारही त्यांच्या या कावेबाजपणाला बळी पडते. बहुतेक प्रसारमाध्यमेही सरकारचीच, तात्पर्याने या कंपन्यांचीच री ओढत असतात. काही मोजक्या लोकांना बहुराठ्रीय कंपन्यांच्या या घातक खेळीची जाणीव झालेली आहे. ते आपल्या परीने यासंदर्भात जनजागृतीचे काम करीत आहेत; परंतु त्यांना सरकार किंवा प्रसारमाध्यमांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश मिळताना दिसत नाही. सरकारकडून तर त्यांनाही सहकार्याची अपेक्षा नसेल; पण किमान प्रसारमाध्यमांनी तरी त्यांचा विचार बहुसंख्य जनतेपर्यंत पोचविण्यास हातभार लावायला हवा. दुर्दैवाने तसेही होताना दिसत नाही. सरकारचे पडखाऊ धोरण आणि प्रसारमाध्यमांचे सरकार धार्जिणेपण बहुराठ्रीय कंपन्यांसाठी उपकारकच ठरत आले आहे. कोणतेही औषध किंवा कोणताही माल भारतात खपवायचा असेल तर सरकार आणि प्रसारमाध्यमांना हाताशी धरले म्हणजे झाले हा एक साधा मार्ग या कंपन्यांना माहीत आहे. आपण जो काही प्रचार करत आहोत त्याची चिकित्साही होणार नाही याची या कंपन्यांना एवढी खात्री आहे की, त्यांच्या देशात बंदी असलेल्या उत
पादनांना ते इथे अगदी सहज खपवू शकतात. पैशाच्या जोरावर मोक्याच्या जागी असलेली माणसे विकत घेणे आणि आक्रमक प्रचाराच्या जोरावर सामान्य लोकांचा बुद्धिभ्रम करणे या दोन यशस्वी सूत्रांच्या मदतीने बहुराठ्रीय कंपन्या

या देशाला पद्धतशीरपणे लुटत आहेत. भारतातील पिण्याचे पाणी दूषित असल्याची

आवई उठविण्यात आली, ‘जाँडिस’ची भीती लोकांना घालण्यात आली की त्यांच्या बाटली बंद पाण्याचा खप सहज वाढतो. गलगंडाचा संबंध आयोडीनशी जोडून आयोडाईज्ड मीठ जनतेच्या माथी मारता येते. वास्तविक इतर अन्नघटकातूनच इतके आयोडीन आपल्या शरीरात जात असते की आयोडाईज्ड मीठ वापरण्याची आपल्याला गरजच नसते.महात्मा गांधींच्या आश्रमात तर जेवणात मीठ नसायचेच. सगळे पदार्थ अळणी असायचे. त्यांच्या आश्रमात कुणाला गलगंड झाल्याचे उदाहरण नाही. परंतु मिठाचा आणि गलगंडाचा नसलेला संबंध जोडून एरवी पन्नास पैशाला मिळणारे मीठ आता आमच्यापर्यंत पोहोचते तेव्हा दहा रुपयांचे झालेले असते. प्रतिव्यक्ती रोज सरासरी पाच ठॉम मीठ लागते असे गृहीत धरले तरी वर्षाला जवळपास 180 कोटी रुपये या मिठात विरघळून विदेशात जातात शिवाय शरीरात आयोडीनचे प्रमाण वाढल्याने रक्तदाब, हृदयविकार यांसारखे विकार जडून औषधाचा खर्च वाढतो ते वेगळेच. म्हणजेच मिठासोबतच औषध कंपन्यांच्या खर्चाचीही सोय केली गेली, असेच म्हणावे लागेल. या सगळ््या जुन्या अनुभवातून शिकून यापुढे तरी बहुराठ्रीय कंपन्यांच्या भ्रामक प्रचाराला बळी न पडण्याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी. प्रसारमाध्यमांनी त्या दृष्टीने जनजागृती करायला हवी. किमान जे लोक अशी जनजागृती करीत आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. पाश्चिमात्य देशाकडून आलेली कोणतीही नवी कल्पना, कोणताही नवा प्रस्ताव, कोणतेही नवे ज्ञान आधी देशहिताच्या कसोटीवर पारखून मगच ते स्वीकारायचे की न
ही याचा विचार करायला हवा. गोरा साहेब म्हणतो म्हणजे ते खरेच असेल, या ब्रिटिशकालीन गुलामगिरी मनोवृत्तीतून आता आपण आणि विशेषकरून आपल्या सरकारने बाहेर पडणे गरजेचे आहे. अनेक लोक त्यासाठी प्रयत्न करीत आहेतच. सुरुवात झालेली आहे. कोणत्याही नव्या कल्पनेकडे, विचाराकडे आणि अगदी रोगाकडेही लोक आता चिकित्सक दृष्टीने पाहू लागले आहेत. बर्ड फ्लूसंदर्भात मनेका गांधीसारख्यांनी जे विचार मांडले आहेत ते अशाच चिकित्सक मनोवृत्तीचे द्योतक म्हणावे लागतील. सुरुवात झाली हेही नसे थोडके! ही सुरुवात शेवटाला नेण्याचे काम मात्र सरकारलाच करावे लागणार आहे. त्यासाठी आधी सरकारातील मंडळांनी पाश्चात्त्यांच्या वैचारिक पगड्यातून बाहेर पडायला हवे. देशहित डोळ््यांसमोर ठेवून योग्य तो निर्णय घेण्याचे बौद्धिक स्वातंत्र्य आपल्या राज्यकर्त्यांना लाभेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्याचा प्रवास सुरू होईल!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..