नवीन लेखन...

मर्यादा आणि क्षमता!




समाजात वावरताना आपल्याला बरेचदा असे आढळून येते की, काही लोकांमध्ये प्रचंड क्षमता असूनही ते आपल्या क्षमतेला योग्य न्याय देऊ न शकल्याने गरिबीत किंवा अडचणीत दिवस काढत असतात, तर काही लोकांच्या वकुबाला बऱ्याच मर्यादा असूनही ते आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून यशस्वी जीवन जगत असतात. विचारसरणीतील किंवा दृठिकोनातील फरकामुळेच हा भेद निर्माण झालेला असतो. ‘ग्लास अर्धा भरला आहे’ आणि ‘ग्लास अर्धा रिकामा आहे’ या दोन वैचारिक दृठिकोनांत सर्वसामान्य लोकांची विभागणी करता येईल. ही विभागणी चिरंतन आहे. स्त्री-पुरुषांच्या संख्येतील संतुलन जसे निसर्गत: सांभाळले जाते तसेच ‘ऑप्टिमिस्ट’ आणि ‘पेसिमिस्ट’ या दोन जमातीतील संख्या संतुलनही कायम असते. जगात जितके लोक आशावादी असतात तितकेच निराशावादीही असतात. अर्थात ही विभागणी बंदिस्त स्वरूपाची नाही. एखादी व्यक्ती निराशावादी असेल तर ती आयुष्यभर निराशावादीच राहील असेही नाही. योग्य संधी मिळाली किंवा त्या व्यक्तीच्या क्षमतेला योग्य वाव मिळाला तर त्या व्यक्तीचा दृठिकोन आमूलाग्र बदलू शकतो. तसेच एखाद्या प्रचंड आशावादी व्यक्तीला प्रचंड संघर्षानंतरही सतत अपयशच येत गेले तर शेवटी तोही निराश होऊ शकतो. अशा परिस्थितीत नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर कुमारावस्था ओलांडून तारुण्यात पदार्पण करणाऱ्या प्रत्येक युवकाने आपल्या भावी आयुष्याचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक ठरते. हे नियोजन करताना आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांचा आणि मर्यादांचा विचार व्हायलाच हवा. तरुण वयात धाडसी वृत्ती अंगात असली तरी प्रत्येक वेळी हे धाडस यशस्वी ठरेलच असे नाही. बरेचदा अविचाराने केलेले धाडस प्रचंड अपयश देऊन जाते आणि हे अपयश संपूर्ण जीवन निराशेने अंधारून टाकत असते. त्यासाठीच एखाद्या वेळी आपल

्या क्षमतांची पुरेपूर जाणीव एखाद्याला नसेल तरी हरकत नाही; परंतु आपल्या मर्यादांची जाणीव त्याला असायलाच हवी. भावी आयुष्याला

एक ठाम दिशा देणारा निर्णय घेताना

मग तो कोणत्याही संदर्भातला असो अंतर्मुख होऊन विचार करायलाच हवा. अमुक एक यशस्वी झाला म्हणून आपणही होऊ अशा प्रकारचा विचार बरेचदा घात करून जातो. कोणत्याही एका व्यक्तीची तुलना दुसरीसोबत होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या बोटांचे ठसे वेगळे असतात त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या क्षमता आणि मर्यादाही वेगवेगळ््या असतात. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना पथदर्शक म्हणून एखाद्याचे उदाहरण डोळ््यांसमोर ठेवणे वेगळे आणि एखाद्याचे अंधानुकरण करणे वेगळे. आपण आधी स्वत:ला पूर्णपणे समजून घेणे अत्याधिक महत्त्वाचे ठरते. आपल्यामध्ये काही न्यून असले तरी त्याचा बाऊ करण्यात अर्थ नसतो. सर्वार्थाने परिपूर्ण व्यक्ती या जगात अजून जन्माला यायची आहे हे नेहमी लक्षात ठेवावे. त्यामुळे आपल्यातल्या कमतरतेचे वैषम्य आपल्याला वाटणार नाही आणि त्या कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने आपण विचार करू शकू. काही न्यून किंवा वैगुण्य जन्मजात असतात ते दूर करता येत नाही. बरेचदा या शारीरिक स्वरूपाच्या असते. ते स्वीकारूनच विचार करायला हवा. उगाच त्या वैगुण्याला कुरवाळत नकारात्मक विचार करण्यात अर्थ नसतो; परंतु इतर अनेक कमतरता सहज दूर करता येण्यासारख्या असतात. ज्ञानाची, माहितीची कमतरता शिकून किंवा सरावाने सहज दूर करता येते. आर्थिक परिस्थितीवरही जिद्दीने मात करता येते. अनुभवाचे योग्य विश्लेषण केल्यास भावी आयुष्यात सातत्याने उपयोगी पडणारे ज्ञान, प्रावीण्य आपल्याला लाभू शकते आणि हीच खरी तर आपली कमाई असते. आपल्या आवडी किंवा सवयीदेखील बऱ्याचदा आपल्या प्रगतीतील अडथळा बनत असतात. या सवयी सहज बदलता येतात; मात्र अनेक जण सवयीचा ग
लाम बनून राहण्यात धन्यता मानतात. ही त्यांची मानसिक कमजोरी असते. कारणे हजार देता येत असतील तरी कोणतेही कारण प्रगतीच्या आड येणाऱ्या अडथळ््याचे समर्थन ठरू शकत नाही. त्यामुळे आयुष्याच्या व्यापक लाभाचा विचार करता आपल्या आवडींना, सवयींना योग्य दिशा देणे आपले कर्तव्यच ठरते. जीवनात अपयशी ठरण्यामागे आर्थिक बेशिस्त हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. पैसा कमवण्यासाठी अक्कल लागते हे जितके खरे आहे तितकेच तो टिकविण्यासाठी, त्या पैशाचे योग्य नियोजन करण्यासाठीही अक्कल लागते हेदेखील तितकेच सत्य आहे. बऱ्याच लोकांमध्ये अक्कलहुशारी ही केवळ पैसा कमविण्यापुरतीच मर्यादित असल्याचे दिसून येते. कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन न केल्याने शेवटी अशा लोकांच्या पदरी दु:ख आणि निराशाच पडते. या सगळ््या गोष्टींचा आधीच विचार करून डोक्यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ न ठेवता निर्णय घेतल्यास पुढील आयुष्यात अपयशाचे धनी व्हावे लागणार नाही. एक महत्त्वाचा मुद्दा राहिलाच. आपल्या स्वभावाला आणि विशेषत: वाणीला योग्य वळण लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची वृत्ती वेगळी असू शकते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो; परंतु हे वेगळेपण प्रत्येकाने स्वत:पुरते मर्यादित करून घ्यायला हवे. चारचौघांत वावरताना आपण काय बोलत आहोत आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा. तुम्ही रागीट असाल, तिरसट असाल, घमेंडी असाल; मात्र हे गुण किंवा वैगुण्य तुमच्यापुरतेच मर्यादित राहायला हवे. प्रत्येक दुसरी व्यक्ती तुमच्या या स्वभावाशी जुळवून घेईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे इतरांशी व्यवहार करताना, बोलताना शक्य तितके मार्दव आपल्या वागण्यात-बोलण्यात आणायला हवे. अनेकदा केवळ अस्थानी आणि अयोग्य बोलण्याने आपले प्रचंड नुकसान होऊ शकते. आपल्या या क्षमतांचा आणि मर्यादांचा विच
र करून जी व्यक्ती आयुष्याच्या संदर्भातील निर्णय घेत असते ती व्यक्ती क्वचितच अडचणीत येते. आपण स्वतंत्रपणे जगत असलो तरी हे स्वातंत्र्य फार वरवरचे आहे. अनेक धाग्यांनी, अनेक बंधनांनी आपले आयुष्य जखडलेले असते. कधी हे धागे नाजूक, तरल भावनांचे असतात तर कधी कोरड्या व्यवहाराचे. आपल्या एखाद्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम केवळ आपल्यापुरताच मर्यादित राहत नाही. अशा असंख्य धाग्यांनी आपल्याशी बांधल्या

गेलेल्या इतरांनाही त्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसू शकतो. अनेकदा आपले अविचारी

कृत्य स्वत:सोबतच समाजाची, कुटुंबाची, राष्ट्राची हानी करू शकतात. दयेच्या अतिरेकी भावनेने पृथ्वीराज चौहान यांनी महंमद घोरीला जिवंत सोडले. त्याच्या या एका चुकीचा परिणाम संपूर्ण भारत वर्षाला शेकडो वर्षे भोगावा लागला. आक्रमणाची वेळ चुकली आणि एक हमखास जिंकू शकणारे युद्ध मराठे पानिपतावर हरले. त्या एका चुकीने देशाचा इतिहासच बदलून गेला. सांगायचे तात्पर्य, निर्णय छोटा असो अथवा मोठा तो संपूर्ण विचारांती आणि आपल्या क्षमता, तसेच मर्यादांची पुरती जाणीव ठेवूनच घ्यायला हवा. यशस्वी जीवनाचा दुसरा कुठलाही मंत्र नाही.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..