भाजपला झाले तरी काय?

लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित धक्कादायक पराभवाने सध्या भाजपमध्ये प्रचंड निराशा पसरलेली दिसते. पक्षाच्या नेतृत्वाला, पक्षाच्या सिद्धांतांना, पक्षाच्या वैचारिक धोरणाला आव्हान देणाऱ्यांची वाढती संख्या पाहता ही निराशा आता असंतोषातून व्यत्त* होऊ लागली आहे, असेच म्हणावे लागेल. एका छोट्या चकमकीत झालेला पराभव म्हणजे महायुद्धातला अंतिम पराभव नसतो, हे लक्षात घ्यायला भाजपमध्ये कुणी तयार नाही. या पराभवाने जणू काही सगळेच संपले अशा थाटात पक्षाच्या धोरणांची, विचारांची, नेतृत्वाची चिरफाड केली जात आहे. एकेकाळी ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून आपली वेगळी ओळख सांगणारा हा पक्ष आता ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ अशी आपली ओळख प्रस्थापित करू पाहत आहे. अचानक हे सगळे वाद निर्माण होण्याचे कारण तरी काय? ज्यांनी पक्षशिस्तीचा आदर्श कार्यकर्त्यांसमोर ठेवायचा तीच मंडळी बंड करून का उठत आहेत? पक्षाचे नक्की बिनसले तरी कुठे? वरकरणी या सगळ्या वादामागे हिंदुत्ववाद की धर्मनिरपेक्षता हे वैचारिक द्वंद्व असल्याचे दिसत आहे आणि हे द्वंद्व निर्माण होण्याचे कारण राजकीय सत्ता हेच आहे. भाजप हा एक राजकीय पक्ष आहे आणि त्यामुळेच सत्ताप्राप्ती हे त्याचे ध्येय असेल तर त्यात वावगे असे काही नाही; परंतु तेच अंतिम ध्येय समजायचे की त्यापेक्षा उच्च ध्येय राजकीय ताकदीतून आणि मिळाल्यास सत्तेतून गाठायचे, या वैचारिक घालमेलीनेच आज भाजपला वैचारिक फुटीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जुन्या जनसंघातल्या मंडळींनी भाजपची स्थापना केली तीच मुळात हिंदुत्वाचा विचार आधारभूत मानून. काँठोसच्या बेगडी धर्मनिरपेक्षतेवर प्रखर टीका करीत या मंडळींनी प्रखर राष्ट्रवादी विचार लोकांसमोर मांडत आम्ही काँठोसला पर्याय उभा करीत असल्याचे सांगितले. सुरुवातीच्या काळात काँठोसच्या

जातीय राजकारणाला कंटाळलेल्या लोकांना भाजपची ही भूमिका पटली, त्यांनी भाजपला बळ दिले. दरम्यानच्या काळात रामजन्मभूमी आंदोलनाने तर भाजपची लोकप्रियता शिखरावर

नेऊन ठेवली. वास्तविक हे आंदोलन भाजपचे

नव्हते; परंतु अडवाणींनी रथयात्रा काढून या आंदोलनाचा राजकीय लाभ उचलला. याच मुद्यावरून भाजपने व्ही. पी. सिंगांचे सरकार पाडले. अगदी तोपर्यंत भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष होता. त्यानंतर मात्र ताकद वाढलेल्या भाजपला केंद्रातील सत्तेचे स्वप्न पडू लागले आणि त्याचवेळी हेदेखील लक्षात आले की भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला काही विशिष्ट राज्यांमध्ये चांगले पाठबळ मिळत असले तरी ही ताकद संपूर्ण भारत व्यापून टाकणारी नाही. केवळ हिंदुत्वाच्या जोरावर आपण केंद्रातल्या सत्तेपर्यंत पोहचू शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात येताच भाजपने वैचारिक तडजोडी करायला सुरुवात केली. समविचारी असलेल्या नसलेल्या अनेक पक्षांची मोट बांधून भाजपने अखेर केंद्रातील सत्तेवर दावा सांगितलाच. त्यानंतर भाजपात केवळ सत्तेचे राजकारण सुरू झाले. येनकेनप्रकारेण सत्ता प्राप्त करायची, त्यासाठी वाटेल तशा वैचारिक कोलांटउड्या घ्याव्या लागल्या तरी हरकत नाही, हाच भाजपचा अजेंडा झाला. तिथूनच ‘पार्टी विथ डिफरन्स’ ही भाजपची ओळख पुसट व्हायला सुरुवात झाली. काँठोसमधील गटबाजीला, काँठोसच्या स्वार्थी राजकारणाला, काँठोसच्या भ्रष्टाचारी नेत्यांना कंटाळलेल्या लोकांना भाजप हा एक उत्तम पर्याय वाटत होता; परंतु काँठोसचे हे सारे अवगुण भाजपातही उतरले आणि भाजपला उतरती कळा लागली. सुरुवातीच्या काळात प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपने केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी हिंदुत्व खुंटीला टांगले. मतदार अगदीच दुधखुळे नसतात. आपल्या धार्मिक भावनांचा राजकीय कारणांसाठी वापर केला जात आहे हे लोकांच्या
लक्षात यायला वेळ लागला नाही. निवडणुका आल्या की रामजन्मभूमी, समान नागरी कायदा, काश्मिरात लागू असलेले 307 कलम आदींचा जप करायचा, त्या जोरावर हिंदुंची मते मिळवायची आणि सत्ता मिळाली की हे मुद्दे केवळ सत्ता टिकविण्यासाठी बासणात बांधून ठेवायचे, हा प्रकार फार काळ चालणार नव्हताच. भाजपच्या मतदाराला भाजपची काँठोस होणे मान्य नव्हते आणि भाजपच्या नेत्यांनी नेमके तेच केले. शिवाय भाजपने हिंदुत्वाचे ज्या पद्धतीने राजकारण केले ते या देशात फार काळ चालू शकणारे नव्हतेच. भाजपचे हिंदुत्व सकारात्मक नव्हते, मुस्लीम द्वेषाच्या आधारावर भाजपने आपले हिंदुत्व उभे केले होते. द्वेषाचे हे राजकारण, मग ते कोणत्याही बाजूचे असो, अधिक काळ टिकूच शकत नाही. मध्यंतरीच्या काळात काँठोसला जो दणका बसला आणि त्याचा फायदा भाजपला झाला तोही धर्मनिरपेक्षतेच्या अतिरेकी धोरणामुळेच; आताही भाजपला जो दणका बसला आहे तो हिंदुत्वाच्या विद्वेषी राजकारणामुळेच. वरुण गांधींच्या द्वेषपूर्ण वत्त*व्याचा फटका भाजपला उत्तरप्रदेशात बसला.
हिंदुत्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने भाजपला इतर धर्मीयांची सहानुभूती मिळाली नाही आणि हिंदुदेखील विशेषत: युवावर्ग फार मोठ्या प्रमाणात भाजपापासून दुरावत गेला. काँठोसने भूतकाळात ज्या चुका केल्या त्याच भाजपाने केल्या. काँठोसने हिंदू मतांना गृहीत धरून मुस्लिमांच्या तुष्टीकरणाची भूमिका घेतली. परिणामी हिंदमध्ये काँठोसविरोधी लाट निर्माण झाली. त्याचा इतका जबर फटका काँठोसला बसला की 1984 नंतर आजतागायत काँठोसला केंद्रात स्वबळावर सत्ता स्थापन करता आलेली नाही. भाजपचेही आता तेच होत आहे. भाजपनेही हिंदू मतांना गृहीत धरून धर्मनिरपेक्षतेचे सूर आळवायला सुरुवात केली. अडवाणींचे जिनांबद्दल प्रशंसोद्गार असो अथवा जसवंत सिंगांनी जिनांची केलेली वकिली असो, हे सगळ

े प्रकार म्हणजे भाजपची मान्यता व्यापक करण्यासाठी केलेले उपाय आहेत. भाजपची ओळख हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच आहे, हिंदुत्ववाद भाजपचा प्राण आहे, तेव्हा भाजपने धर्मनिरपेक्ष म्हणून आपली छबी उभी करण्याच्या नादात हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट यायला वेळ लागणार नाही. आज भाजपमध्ये जे काही घडत आहे ते कधीतरी होणार होतेच. नेत्यांच्या सत्ताकांक्षेने भाजपला आज या अवस्थेत नेऊन ठेवले आहे. सत्तेच्या राजकारणासाठी वाटेल तशा वैचारिक कोलांटउड्या घेतल्यावर असे केव्हातरी तोंडावर पडणे ओघाने आलेच. भाजप आता आपल्या राजकीय कारकिर्दीच्या निर्णायक वळणावर आला आहे. वळण

घेऊन योग्य मार्गावर जाण्याची संधी आज भाजपपुढे आहे. हे वळण चुकले तर

पुढे सारेच चुकत जाईल. सुदैवाने भाजपमध्येच आज अशी काही मंडळी आहेत की ज्यांनी हिंदुत्व आणि विकास यांचा योग्य समन्वय साधत यश कसे प्राप्त करता येते, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाला कधीच सोडचिठ्ठी दिली नाही; परंतु त्याचवेळी त्यांनी विकासाचे राजकारणही तेवढ्याच जोमाने केले. मध्यप्रदेशमध्ये भाजपला पुन्हा सत्ता प्राप्त झाली ती केवळ हिंदुत्वाच्या जोरावर नक्कीच नाही. शिवराज चौहान यांनी केलेली विकासाची कामे लोकांना अधिक प्रभावित करून गेली. छत्तीसगढमध्ये रमणसिंग सरकारदेखील विकास कामांच्या जोरावरच पुन्हा सत्तेत परतू शकले. सांगायचे तात्पर्य भाजपाने नव्या पिढीच्या, तरुण मतदारांच्या अपेक्षादेखील समजून घ्यायला हव्या. या पिढीला धर्माधारित राजकारणात रस नाही. त्यांना विकास हवा आहे. त्यांना काम करणारे सरकार हवे आहे. त्यांना राजकीय स्थिरता हवी आहे. या संदर्भात काँठोसचे यावेळचे आकलन अतिशय अचूक ठरले. त्यांनी अतिशय हुशारीने सोनिया गांधी किंवा राहुल गांधींना बाजूला ठेवून डॉ. मनमोहन सिंगां
ा पुढे केले.
सांगायचे तात्पर्य काँठोस आपल्या भूतकाळातील चुकांपासून बोध घेऊन पुन्हा नव्याने, नव्या ताकदीने उभी राहू शकते तर भाजपला ते का शक्य होणार नाही? आज भाजपमध्ये सुरू असलेला गोंधळ या पक्षासाठी इष्टापत्ती ठरू शकतो, जर या मंथनातून योग्य ते हाती लागले तर! अन्यथा पक्ष सैरभैर व्हायला वेळ लागणार नाही. भाजपला या परिस्थितीतून बाहेर यायचे असेल तर सामान्य माणसाच्या हिताच्या, त्याच्या विकासाच्या राजकारणावर भर द्यावा लागेल. त्यातून सत्ता मिळाली तर उत्तमच, नाही मिळाली तरी तक्रार नाही, हेच धोरण भाजपला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवू शकते! जिना महान होता की नव्हता या चर्चेने लोकांची पोटे भरत नाही. तुमच्या मतदारांच्या गरजा आणि अपेक्षा खूप वेगळ्या आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या आणि या फालतू चर्चा बंद करा; हाच भाजपसाठी सद्यपरिस्थितीत योग्य सल्ला ठरतो!
– प्रकाश पोहरे
निशांत टॉवर,
गांधी रोड, अकोला
मोबाईल – 91-98225 93901

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..