नवीन लेखन...

सप्टेंबर २८ – माजिद खान आणि ‘गस’ लोगी



माजिद खान

२८ सप्टेंबर १९४८ रोजी माजिद जहांगीर खानचा जन्म झाला भारतातील लुधियानात. जहांगीर खांसाहेब भारताकडून कसोट्या खेळलेल्या होते. मजिद खेळला पाकिस्तानकडून. हा इम्रान खानचा मावसभाऊ. गोलंदाज म्हणून पाकिस्तानकडून त्याची वायच्या अठराव्या वर्षीच निवड झाली होती पण नंतर त्याची फटकेबाजी पाहून त्याल मधल्या फळीत जागा देण्यात आली. १९७६-७७ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कराचीत उपाहारापूर्वी शतक अकढून तो अशी कामगिरी करणारा पहिला पाकिस्तानी तर ४२ वर्षांतील पहिला खेळाडू बनला. त्याची सर्वोत्कृष्ट खेळी मात्र खालच्या क्रमांकावर झाली. कराचीविरुद्ध ४ बाद ५ अशी अवस्था झालेली असताना फलंदाजीस येऊन द्विशतक झळकावत त्याने पंजाब विद्यापीठाला विजयी केले. पाकिस्तानसाठी ग्‍लॅमॉर्गनविरुद्ध त्याने ८९ मिनिटांत १४७ धावा काढल्या १९६७ मध्ये; त्या डावात १२ षटकार होते. त्यापैकी पाच रॉजर डेविसच्या एकाच षटकात निघाले होते. या शतकामुळे तो खूपच गाजला आणि ग्लॅमॉर्गनने तब्बल आठ हंगामांसाठी त्याला करारबद्ध केले. १९७० मध्ये त्याला विज्डेनने वर्षाचा मानकरी म्हणून निवडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सामनाधिकारी आणि नंतर पाकिस्तान मंडळाचा अध्यक्ष होण्यापूर्वी त्याने ६३ सामन्यांमधून जवळजवळ ४,००० धावा काढल्या.बाझिद खान हा माजिद खानचा मुलगा. तोही पाकिस्तानकडून कसोट्या खेळला. तीन पिढ्या कसोटी खेळणारे पुरुष असणारे भारतीय उपखंडातील हे एकमेव घराणे आहे.

‘गस’ लोगी२८ सप्टेंबर १९६० रोजी कॅरिबिअन क्रिकेटिहासातील एका हिर्‍याचा जन्म झाला. ऑगस्टीन लॉरेन्स लोगी त्याचं नाव. शॉर्ट लेगचा ‘सर्वभक्षी’ क्षेत्ररक्षक आणि पाचव्या-सहाव्या क्रमांकावर येऊन धुलाई करणारा फलंदाज म्हणून ‘गस’ प्रसिद्ध झाला. जेफ दुजाँसोबत १९८८ च्या इंग्लंडच्या दौर्‍यावर तो यजमानांची डोकेदुखी बनला होता. भारताविरुद्धच्या कसोटीतील १३० धावा (एप्रिल १९८३) ही त्याची सर्वोत्तम कामगिरी. ५ फूट ४ इंचाचा हा खेळाडू १९९१ मध्ये ३६.७९ च्या सरासरीने २,४७० कसोटी धावा काढून चालता बनला. ५२

कसोट्यांमधून ५७ झेल त्याने

घेतले. १५८ एकदिवसीय सामन्यांमध्येही तो खेळला. निवृत्तीनंतरही क्रिकेटमध्ये तो सक्रिय राहिला. तो फलंदाजीला येई तेव्हा निम्मा संघ तंबूत परतलेला असे ही बाब लक्षात घेता ही सरासरी खूपच चांगली आहे. नंतर त्याने कॅनडा, विंडीज या संघांना प्रशिक्षण दिले. आता तो बर्मुडाचा प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाच्या काळातच त्याच्या मायभूमीच्या संघाने (बर्मुडा) विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळविली.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..