नवीन लेखन...

डिसेंबर १२ : युवराजसिंग



१२ डिसेंबर १९८१ रोजी चंडीगढमध्ये युवराजसिंगचा जन्म झाला. त्याचे वडील योगराजसिंग हे माजी भारतीय कसोटीपटू आणि पंजाबी चित्रपटांमधील एक अभिनेते होत.
कूच-बिहार चषकात (१९ वर्षांखालील) पंजाब संघाला आपल्या नेतृत्वाखाली युवीने विजय मिळवून दिला आणि याच सामन्यात केलेल्या ३५८ धावांमुळे तो प्रकाशात आला. नंतर जानेवारी २००० मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला जाणार्‍या संघात त्याची निवड झाली (अंडर-१९ वर्ल्ड कप). हा विश्वचषक भारताने जिंकला.
नैरोबीत झालेल्या आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी स्पर्धेत युवराजसिंगचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. दुसर्‍याच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ८२ चेंडूंमध्ये ८४ धावा तडकावल्या आणि सामन्याचे टीव्हीसाठी समालोचन करणार्‍या टोनी ग्रेगकडून “व्हेअऽ वेअऽ यू?” असा प्रश्न युवीसाठी बाहेर पडला.
कैफ-युवी जोडीने २००२ मध्ये नॅटवेस्ट चषकात भारताला मिळवून दिलेला विजय अप्रतिम होता. २००३ च्या विश्वचषकात तो भारताकडून खेळला. २००५ मध्ये इंडीयन ऑईल चषक स्पर्धेत अंतिम साखळी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने शतक काढले. शतक काढल्यानंतर ड्रेसिंगरूमच्या दिशेने त्याने केलेले हातवारे हे भारतीय व्यवस्थापनाशी असलेल्या त्याच्या मतभेदांचे निदर्शक होते. ग्रेग चॅपेल हे नुकतेच भारताचे प्रशिक्षक बनले होते आणि युवीवर त्यांनी टीका केली होती. नंतर मात्र युवराजने चॅपेलच्या युक्त्या-प्रयुक्त्यांचे कौतुक केले होते.
२००६ च्या पाकिस्तान दौर्‍यात कर्णधार राहुल द्रविड आणि उपकर्णधार वीरेंदर सेहवाग मैदानाबाहेर असताना मैदानावर युवराजसिंगच नेतृत्व करीत असल्याने त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जाऊ लागले. २००७ मध्ये त्याच्याकडे एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपदही आले. ते त्याच्याकड
ून २००८ मध्येच काढून घेतले जाण्यामागे त्याचे ‘नाईट-लाईफ’ असल्याचे बोलले जाते.
२००७ च्या विसविशीत विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध युवराजने एकाच षटकात सहा षटकार मारले. आणखी दोघांनी क्रिकेटच्या वरिष्ठ सामन्यांमध्ये अशी कामगिरी केलेली असली कसोटी संघाचा दर्जा असलेल्या दोन संघांमधील सामन्यात एकाच षटकात सहा षटकार मारले जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
मुख्यत्वे डावखुरा फलंदाज अशी युवीची ओळख असली तरी

तो एक चांगला कामचलाऊ पारंपरिक फिरकीपटूही आहे. फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजी तो जास्त चांगली खेळू शकतो असे विश्लेषकांचे मत आहे आणि २००५ चे उपरोल्लेखित शतक हा त्याच्या करकिर्दीतील टर्निंग पॉईंट मानला जातो. पॉईंट क्षेत्रातील एक चपळ मैदानरक्षक अशीही त्याची ख्याती आहे. त्याला अ‍ॅटिट्यूड प्रॉब्लेम असल्याचेही बोलले जाते.

कसोटी संघातील आपले स्थान कायम राखण्यासाठी युवराज अजूनही धडपडतो आहे. परवाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने सामनावीराचा बहुमान मिळविला. तो फॉर्ममध्ये आला आहे ही भारतीय चमूसाठी आनंदाची गोष्ट आहे.

एकाच षटकातील सहा षटकारांसाठी प्रसिद्ध असलेला युवराजसिंग

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..