हे देवा म्हाराजा…..

बारा गावच्या, बारा वहिवाटीच्या,
कुलदैवत आणि गावच्या ठिकाणदार म्हाराजा…..
……व्हय म्हाराजा sss…

ह्या तुका बारा पाचाचा
गाऱ्हाणा घालतय म्हाराजा
ता तू पावन करुन घी रे म्हाराजा..
……व्हय म्हाराजा sss…

सध्या जो काय ह्यो ओळखीच्या
मंडळीनी आपलो ग्रुप केलो आसा म्हाराजा….
……व्हय म्हाराजा sss…

जसे ग्रुप सुरू झाल्यापासना
आजतागायत सर्व एकमेकांका
जोडून ऱ्हवले हत म्हाराजा…
……व्हय म्हाराजा sss…

तसेच व्हाँटस् अप ग्रुपवर
एकमेकांका जोडून ऱ्हवची
तेंका बुध्दी दे रे म्हाराजा…
……व्हय म्हाराजा sss…

आमचो प्रेमळ ग्रुपलिडर
सगळ्यांका मायेने गोंजारता
कधी कधी हिटलर बनान
फटकारता म्हाराजा…
……व्हय म्हाराजा sss…

कोणाचा काय चुकला तर
त्येका ग्रुपवरना काढुन टाकान
पुन्हा ग्रुपवर घेता म्हाराजा…
……व्हय म्हाराजा sss…

अशीच तेका सुबुध्दी देवनं
ग्रुप जोडानं ठेवची शक्ती
अँडमिनाक दि रे म्हाराजा…
……व्हय म्हाराजा sss…

कामगारांक बोनस, अधिकाऱ्यांक
बक्षिसी तशी ग्रुप सदस्यांक
पार्टी देवची आमच्या अँडमिनाक
बरकत दि रे म्हाराजा…
……व्हय म्हाराजा sss…

टाटा चेअरमनची निवड होवची आसा,
कडक ईस्त्रीचो नयो…
म्हणजेच आमचो अँडमिन…
हेकाच ती संधी दि रे म्हाराजा…

……व्हय म्हाराजा sss…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..