नवीन लेखन...

हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर करा – ईशान उपनिषद

 

अग्ने नय सुपथा राये अस्मान्

विश्वानि देव वयुयानि विद्वान्.

युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो

भूयिष्ठां तेनमउक्तिं विधेम.

[ईशोपानिषद (मंत्र १8) ]

 

शाब्दिक अर्थ: हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मार्गातले

अडथळे दूर करा. ही विनंती. अग्निदेव सर्वज्ञ आहेत, ते सर्वकाही जाणतात, त्यांच्या पासून काही ही लपलेले नाही. साधकच्या हातून घडलेल्या वाईट कृत्यांमुळे मुक्तीचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे. पापांच्या परिणामांपासून मुक्त करण्यासाठी साधक अग्निदेवाची विनंती करीत आहे. अग्निदेव प्रसन्न होउन आपल्या भक्तांवर सदैव कृपा करतात.

आपल्या आयुष्यात अग्नीचे अत्यंत महत्व आहे. अग्नि विना आजच्या जगाची कल्पना आपण करू शकत नाही. आपल्या पोटात ही जठराग्नी जळत असते. ही अग्नी शरीलाला आवश्यक असे पोषक तत्व ग्रहण करते आणि व्यर्थ पदार्थ टाकून देते. काही भक्त व्रत-उपवासाद्वारे आपल्याच शरीराची (शरीरातल्या चरबीची) आहुती या अग्नीत देतात. अग्नीत तापल्या मुळे शरीर आणि मन शुद्ध होतात व परमेश्वरा पर्यंत पोहचण्याचा मार्ग प्रशस्त होतो. अशी अवधारणा.
समस्त भौतिक पदार्थांना शुद्ध करने हा अग्नीचा स्वभावाच आहे. अग्नीत तापल्या मुळे समस्त पदार्थांचे दोष नष्ट होतात. चिकित्सक ही धातूंना अग्नीत जाळून १००% शुद्ध भस्म प्राप्त करतात. या लौह, रौप्य ,सुवर्ण इत्यादी भस्माचा उपयोग व्याधीग्रस्थांची व्याधी दूर करण्यासाठी उपयोग करतात. अर्थात माणसांच्या भौतिक इच्छाही अग्निदेव पूर्ण करतात. फिगर सुंदर ठेवण्यासाठी कुणी तरुणी जठराग्नित आपल्या चरबीची आहुती देते. अग्निदेव तिच्यावर ही कृपा करतात. तिला ही स्लीम फिगर मिळते.

नेता आणि अधिकाऱ्यांच्या मनात सत्ता आणि भौतिक सुखांची आकांक्षा असते. त्यात काहीच गैर नाही. पण त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना गैर-मार्ग वापरावे लागतात. सरकार-दरबारात कागदी घोडे दौडत असल्यामुळे त्यांचे गैर कृत्य सरक

ारी कागदोपत्री दर्ज होतातच. पहिले या फाईली रिकॉर्ड रूम मध्ये दबलेल्या राहत असे. पण आपल्याला माहीतच आहे. माहितीचा अधिकारामुळेकित्येक दडलेले घोटाळे बाहेर निघाले. कित्येक नेत्यांना आणि अधिकाऱ्याने तिहाडची सुगंधित हवा खावी लागली (तिहाड जेलच्या एका बाजूला जनकपुरीतली घाण वाहून नेणारा नाला वाहतो. त्याचा सुगंधी वास जेल मध्ये सतत दरवळत राहतो. गेल्याच वर्षांपासून या नाल्याला झाकण्याचे काम सुरु झाले आहे आतापर्यंत ९० टक्के पूर्ण झाले असेल- या महान कैद्यांची कृपा दुसर काय) असो.

सूचनेच्या अधिकाऱ्यानुसार माहिती ही द्यावीच लागते आणि परिणाम ही भोगावे लागतात. कागद गहाळ कारणे ही सौप नाही कारण त्याची ही चौकशी होणार. कदाचित गहाळ जालेली फाईल पुन्हा प्रगट होऊ शकते. सत्तेच्या खेळात कुणी ही केंव्हा दगा-फटकी करू शकतो. घोटाळे उघडकीस आले तर अश्या नेत्यांचा मार्ग अवरुद्ध होऊ शकतो. सत्ता त्यांच्यापासून दूर होईल. कदाचित तिहाडची हवा ही खावी लागेल.
आपल्याला माहित आहे, अग्निदेव अत्यंत कृपाळू आहेत, आपल्या भक्तांना निराश करीत नाही. अश्या घोटाळेबाज अधिकारी आणि नेत्यांनी अग्निदेवाची प्रार्थना केली आणि अग्नीने ही आपल्या भक्तांवर कृपा केली तर त्यात गैर काय. ‘आगीत फाईली जळाल्या, नेता-अधिकारी पापमुक्त जहाले’. अशारीतीने सर्वकाही जाणाऱ्या अग्निदेवाने आपल्या भक्तांच्या प्रगतीच्या प्रवासाच्या मार्गातले अडथळे दूर केले.
ज्या प्रमाणे अग्निदेवाने त्यांच्या मार्गातले अडथळे दूर केले त्याच प्रमाणे सर्वांच्या मार्गातले अडथळे अग्निदेवाने दूर करावे ही चरणी प्रार्थना.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..