नवीन लेखन...

हि कसली समानता ?

 

महाराष्ट्रात पोळा हा सन शेतकऱ्याच्या दृष्टीने एक महत्वाचा सन म्हणून साजरा केला जातो.या सणाच्या दिवशी बैलांची पूजा करून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यापूर्व कालापासून चालत आलेली एक अनिष्ट प्रथा मनाला खटकते.ती म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा मान म्हणून

त्या त्या गावातील पोलीस पाटील किंवा जो कोणी पूर्वापार मानकरी असेल त्याला दिला जातो व जोपर्यंत त्याचे बैल प्रदक्षिणा घालणार नाहीत तोपर्यंत इतर कोणाचेही बैल प्रदक्षिणा घालू शकत नाहीत.

मानकरी त्या दिवशी मुद्दामच बैल उशिरा वाजत गाजत व जागोजागी थांबत मंदिरात येतात आणि तोपर्यंत इतर शेतकरी बिचारे ताटकळत बसतात.या सर्व प्रकारामाद्धे आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानाकार्याच्याच बैल्जोडीने पहिल्यांदा प्रदक्षिणा घालावी म्हणून बंदोबस्तात त्या दिवशी मुद्दाम वाढ केली जाते व अनेक खेद्यांमाद्धे हा प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून अनेकवेळा मारामारी होते व याकामी शासनाचे बंदोबस्तासाठी लाखो रुपये खर्च होतात .पण हि कसली समानता ? लोकशाहीतील नीतीमूल्यांची फसवणूक व दुर्बल आणि असंघटीत श्त्कार्यांची अक्षरश: कुचंबणा नव्हे काय ?

आज लोकशाही असलेल्या या भारत देशात अण्णा हजारे सारख्या ७४ वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीला १३ दिवस उपोषण केल्यावर कुठे शासनाला जाग आली आणि हा घोर संघर्ष यशस्वी झाला.दुक:ख असे आहें कि अशा अनिष्ट प्रथा जोपासण्यासाठी शासकीय बळ वापरले जाते तेथे समानतेची अपेक्षा बिचार्या शेतकऱ्यांनी काय म्हणून करावी ?

महादेव विश्वनाथ कापुसकरी

बसमथ नगर जी. हिंगोली.

मो.9423141008

majhaa blog -www.mvkapuskari.blogspot.com

— महादेव कापुसकरी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..