हवामानशास्त्र……..

गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द सतत चर्चेत आहे. आजकाल कुठलेही वृत्तपत्र उघडल्यानंतर हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग, ओझोनचा थर याविषयीची एकतरी बातमी दररोज वाचायला मिळते.

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इतर अनेक महत्त्वाची शास्त्रे सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित झालेली दिसतात. मात्र माहिती तंत्रज्ञानाची जोड या अनेक शास्त्रांना मिळाली आणि या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मकपणे केला तर ते मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे हवामानशास्त्राद्वारे सिद्ध झाले आहे. सुनामी किंवा चक्रीवादळ, अतिपर्जन्यवृष्टी या सारख्या आपत्ती उद्भवण्यापूर्वीची सूचना सहज मिळते. याचे कारण म्हणजे प्रगत असे हवामानशास्त्र होय.

पृथ्वीला सर्व बाजूनी वेढणारे आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकवून ठेवणारे हवेचे आवरण म्हणजे वातावरण. याला इंग्रजीत ATMOSPHERE असे म्हणतात, तर हवामान शास्त्राला Meteorology असे म्हटले जाते. पृथ्वीवरील वातावरणाची घनता उंचीनुसार कमी होते. म्हणून वातावरणामुळे पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहते. वातावरणाची रचना ही निश्चित केलेली आहे. हवामानशास्त्राद्वारे या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणात नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गान, कार्बन डायऑक्साइड, नियॉन, हेलियम, ओझोन, हायड्रोजन, क्रिप्टॉन, झेलॉन, मिथेल हे वायू वातावरणात आढळतात.

सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या भूकवचापासून १४ किमी पर्यंतच्या वातावरणाचा थर तपांबर म्हणून ओळखला जातो. तो पृथ्वीच्या गोलाकारकृती प्रमाणे कमीजास्त असतो. त्यानंतरचा थर हा स्थितांबर. याला दुसरे नाव म्हणजे समताप क्षेत्र. हा ३० किमी पर्यंत मानण्यात येतो. तिसरा स्तर हा भूपृष्ठापासून ३० ते ६० किमी उंचीवर ओझोन अंबर नावाने ओळखला जातो. या स्तरात तापमान सर्वाधिक असते. सजीव सृष्टीचे संरक्षक कवच म्हणून या स्तराला ओळखले जाते. ६० किमीच्या पुढे अयनांबर म्हणून ओळखला जातो. विषमस्तरावर म्हणजे ९० किमी ते १० हजार किमीपर्यंत विषमस्तर असतो. याचे तापमान १० हजार अंश फॅरानाईटपर्यंत असते. या सर्व वातावरणाचा विचार केल्यास यातील

होणारे बदल विविध अर्थाने अभ्यासण्याचे शास्त्र म्हणजे हवामान शास्त्र होय.

हवामानावर महत्त्वाचा परिणाम करणारा घटक म्हणजे समुद्र. या समुद्राचे देखील विविध संशोधन देश आणि विदेशात सुरू आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे देखील निश्चित करण्यात आले आहेत. समुद्रातील अंतर्गत क्षेत्र, प्रादेशिक क्षेत्र, सलग्न क्षेत्र यांचा विचार करून कायदे निर्माण करण्यात आले.

१७९२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात मद्रास येथे पहिली वेधशाळा उभी केली. १८२३ मध्ये कुलाब्यात दुसरी वेधशाळा सुरू झाल आणि या ठिकाणी हवामान विभाग अस्तित्वात आला. त्यानंतर अवघ्या सहा वर्षात १८२९ मध्ये कोलकत्याला सर्व्हे ऑफ इंडियाचे ऑफिस सुरू होऊन तिसरी वेधशाळा कार्यान्वित झाली. नंतरच्या काळात तिरुअनंतरपूरम, सिमला याबरोबरच अन्य राज्यातही वेधशाळा सुरू झाल्या. १ एप्रिल १९२८ पासून पुणे वेधशाळेद्वारे हवामानाचे अंदाज वर्तविणे सुरू झाले. पारंपरिक पद्धतीने हवामानाचे अंदाज व्यक्त होत असताना संगणकाचा पर्याप्त वापर, उपग्रहांची मदत, संगणकात असणार्‍या विविध पर्यावरणीय माहितीचा उपयोग करून अचूक असे अंदाज वर्तविणे सहज शक्य झाले आहे.

भारताने केलेली उपग्रहांची प्रगती लक्षात घेता पृथ्वीवरील वातावरणात होणारे बदल आणि त्याची माहिती सॅटेलाईटद्वारे तात्काळ वेधशाळेद्वारे प्राप्त होऊन, संभाव्य बदलांना तोंड देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेकदा मोठ्या प्रमाणात पडू शकणार्‍या पावसाची पूर्वसूचना हवामान खात्याकडून वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे विविध यंत्रना दक्ष होतात आणि जीवीत व वित्तहानी टळते. या सूचना देताना हवामान खात्याकडून विविध घटकांचा जो अभ्यास केला जातो तोही हवामानशास्त्रात येतो.

हवामानशास्त्रात हवामानाची माहिती, छायाचित्र, आलेख प्राप्त होतात. हवेचे तापमान मोजण्यासाठी तापमापक, आर्द्रता मापक, वायू दिशार्शक, वायू वेग मापक, वायू भारमापक, वायूभार लेखक, पर्जन्यमापक या उपकरणांचा उपयोग हवामानाच्यां अंदाजाच्या अचूकतेसाठी केला जातो. या शिवाय सांकेतिक चिन्हे आणि खुणांचा उपयोग करून हवामान शास्त्र विकसित होताना दिसते. सर्वसाधारणपणे कमाल आणि किमान तापमानाचे विश्लेषण, हवेचा वेग, आकाशाची स्थिती, हवेची दिशा, समुद्र स्थिती, आणि उपलब्ध नकाशे यांचा उपयोग करून हवामानाची माहिती देणे शक्य होते.

हवामानशास्त्र हे अत्यंत प्रगत असे शास्त्र म्हणून उदयास आले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार ज्या वेगाने वाढत गेला. त्याचा सर्वाधिक वापर हवामानशास्त्रात झालेला आढळून येतो.

(महान्यूजमधील डॉ. गणेश मुळे यांच्या लेखावर आधारित)

— बातमीदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…