नवीन लेखन...

स्पेशल एक्स-रे (बेरियम स्वॅलो / एनेमा)

अन्न, अथवा पाणी गिळताना अडचण येत असल्यास, अन्न वर येत असल्यास, सारखी उचकी लागत असल्यास किंवा आवाजामध्ये झालेला एकदम बदल म्हणजे बेरियम स्वॅलो करण्यास आमंत्रण. हा तपास केव्हाही होतो. यात एक व्हॅनिला इसेन्स असलेली पेस्ट रुग्णास स्क्रिनिंग मशीनसमोर काळोखात दिली जाते. मग क्ष-किरण तज्ञ ही पेस्ट अन्ननलिकेतून कशी खाली जाते हे पाहतो व ती कोठे अडकते का ते पाहतो आणि तसे फोटो काढतो.

यामुळे अन्ननलिकेचा कॅन्सर उघडकीस येतो. कधीकधी लहानपणापासूनच अन्ननलिका खालच्या भागात अरुंद असते. याला “अकलेझिया” म्हणतात व हे निदान लहानपणीच झाले नाही तर अन्ननलिका फुगत जाते, मोठेपणी त्रास वाढतो व बेरियम स्वॅलोवर दिसून येतो.

पोट छातीत घुसणे याला हयाटस हर्निया म्हणतात. याने रुग्णाला पित्त वर येणे, अन्न वर येणे सतत उचकी लागणे असे त्रास होतात म्हणूनच बेरियम स्वॅलो हा साधा तपास याचे अचूक निदान करतो. निदान होणे म्हणजे रोगाचा शेवट होणे होय! म्हणूनच एक्स-रे काढण्यास दिरंगाई अथवा टाळणे साफ चूकीचे आहे.

बेरियम एनेमामा
शौचातून रक्त जाणे, कधी जुलाब तर कधी बद्धकोष्ठता येणे, वजन कमी होणे (एकदम घटणे) याचे कारण आपल्या मोठ्या आतड्यात लपलेला रोग असू शकतो आणि म्हणूनच बेरियम एनेमा हा तपास सांगितला जातो व यासाठी क्ष-किरणतज्ञाची आधी भेट घ्यावी. आपणास आदल्या रात्री जुलाबाचे औषध घेऊन दुसर्‍या दिवशी एक साधा एनेमा आधी दिला जातो व याने मोठे आतडे आधी धुतले जाते.

पुढे काळोखात स्क्रिनिंग करत एक बेरियम एनेमाचे भांडे धरुन आतील बेरियम आपल्या गुद्दद्वारामार्फत मोठ्या आतड्यात हळूहळू जाते. ही क्रिया अजिबात दुखापत देत नाही. कारण अॅनॅस्थेटिक जेलीने व नाजूक ट्यूबने अलगदच एनेमा दिला जातो. हे सांगणे मी अत्यंत जरुरी समजतो, कारण अनेक रुग्ण याला लाजतात, घाबरतात व तपास करतच नाहीत आणि पुढे रोग वाढला की पस्तावतात.

एकदा मोठे आतडे बेरियमने भरले की काही फोटो काढून आपणास त्वरित टॉयलेटमध्ये फक्त अर्धे अधिक औषधच सोडण्यास पाठवले जाते कारण पुढे एका पंपाद्वारे आपले मोठे आतडे हवेने फुगवले जाते. याला डबल कॉंट्रास्ट एनेमा म्हणतात. लहानात लहान कॅन्सरची गाठ, कॅन्सरने झालेल्या आतड्याचा चिमटा (स्ट्रिक्चर), आतड्याचा अल्सर, पॉलिप दिसून येतो. लहान मुलांत आतड्यात आतडे घुसून प्रचंड वेदना होणारा एक रोग या एनेमाने तात्काळ बरा होऊन ऑपरेशन टळते.

एनेमा झाल्यावर आत घातलेली हवा व बेरियम दिवसभरात हळुहळु सुटून जाते व काहीही त्रास होत नाही. म्हणूनच हा तपास घाबरण्याजोगा अजिबात नाही. याचे अनेक फायदे आहेत.

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..