नवीन लेखन...

स्पेशल एक्स-ररे (एच.एस.जी / फिसच्युलोग्राफी)

या सदरात आपण दोन छोटे स्पेशल तपास पाहणार आहोत. यात एच.एस.जी. अथवा हिस्टेरोसालपिंगोग्राफी ही गर्भाशयाची नलिका तपासणारी चाचणी परीक्षा होय. क्वचितच या तपासाने नलिका उघडल्या जाऊन पेशंटना फायदा होऊ शकतो. हा तपास ज्या स्त्रियांना मूल होत नसेल अशा स्त्रियांमध्ये केला जातो. बर्‍याचदा गर्भाशयाच्या नलिका ब्लॉक असतात व या नलिका हा तपास स्पष्टपणे दाखवतो. हा तपास मासिक पाळी सुरु झाल्यापासून १० दिवसांच्या आत व ३-४ दिवसांनी रक्तस्त्राव बंद झाल्यावर केला जातो. १० दिवसांतच का? कारण त्यानंतर जर गर्भधारणा झाली असेल तर गर्भपात होऊ शकतो. हा तपास उपाशीपोटी करावा लागत नाही, म्हणून कोणत्याही वेळेस होतो. यासाठी स्वत: क्ष-किरण तज्ञ अथवा स्त्रीरोगतज्ञ गर्भाच्या तोंडाकडून एक रेडिओपेक इंजेक्शन देतात, जे विशेष कळ देणारे नसते. म्हणून तपासाला भिऊ नये.

हा तपास काळोखात स्क्रिनिंगखाली केला जातो व दोन एक्स-रे काढले जातात. यात गर्भाशय व फॅलोपियन ट्यूब दिसतात व जर त्या नॉर्मल असतील तर औषध ओटीपोटाच्या आत पडताना दिसते. हा एकमेव तपास असा आहे की, याचे फोटो उपलब्ध होतात व कितीही स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला आपणास घेता येतो. या तपासानंतर थोडा काळ औषध बाहेर येते म्हणून सॅनेटरी पॅड दिले जाते. नंतर अॅंटिबायोटिक दिले जाते.

आता दुसरा स्पेशल एक्स-रे फिसच्युलोग्राफी पाहू या. यामध्ये रुग्णाला गुद्दद्वाराभोवती सतत त्रास देणारा (पू येणारा) सायनस झालेला असतो. बाहेरुन साधा व छोटा दिसणारा हा रोग आतमध्ये पराक्रम करत असतो. म्हणजेच मोठा होऊन मोठ्या आतड्यापर्यंत घुसतो व हळूहळू या तोंडातून शौच बाहेर येऊ लागते. म्हणूनच हा तपास करुन रोग आतपर्यंत किती खोल गेला आहे व हा आतड्यात शिरला आहे का हा तपास सांगतो. या तपासात रुग्णाला पालथे झोपवून २-३ सीसी इंजेक्शन या रोगाच्या तोंडापासून दिले जाते. हे औषध रेडिओपेक (एक्स-रेवर स्पष्ट दिसणारे) असते व त्यामुळे फिसच्युलाची लांबी कळून येते.

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..