नवीन लेखन...

सजले कुठे शहर हे ?

सजले कुठे शहर हे ? आली कुठे दिवाळी ?
अंधार माणसांची करतो किती टवाळी !

पडता क्षणीच रात्री झोपेस मी बिलगतो
थकलो किती दिवसभर कळते मला सकाळी

बसलो निवांत आम्ही बोलायला जरासे
वाकून का पहाते चाफ्या तुझी डहाळी

मद्यात ते बुडाले, गझलेत मी बुडालो
त्यांची नशा निराळी माझी नशा निराळी

मी कामगार आहे, मी भाग्यवंत आहे
चंद्रा तुझ्या कपाळी आजन्म रात्रपाळी

भांडुनी उपयोग नाही भांडुनी थकशील तू
एकदा प्रेमात माझ्या जीवना पडशील तू

मी गुणांचा चाहता पण दोषसुध्दा सांगतो
आरसा फेकून, माझा चेहरा धरशील तू

जाणले नाही जगा तू जाणले नाही मला
हे तुला समजेन तेव्हा केवढा रडशील तू

याच एका कारणाने चालतो आहे पुढे
राग हा गेला तुझा की माफही करशील तू

वेगळे नाहीत आपण वेगळे होऊ कसे ?
मी तिथे असणार आहे मी जिथे म्हणशील तू

— प्रदीप निफाडकर

Avatar
About प्रदीप निफाडकर 35 Articles
श्री. प्रदीप निफाडकर हे ज्येष्ठ पत्रकार असून गझल या विषयाचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांनी स्वत: अनेक गझला लिहिल्या असून अनेक गझलांचे भाषांतरही केले आहे. गझलेत वात्सल्य आणणारे आणि प्रेम व दारूत अडकलेल्या गझलेला कौटुंबिकता प्राप्त करून देणारे श्री.निफाडकर हे गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य असून, पत्रकार म्हणूनही ते सुपरिचित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..