नवीन लेखन...

विक्षिप्तांचे प्रकार

 

पुस्तक परिचय

`नग आणि नमुने’

लेखक : शिवराज गोर्ले

सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्यप्राणी समजावून घेणे अतिशय अवघड आहे. जे केवळ वर्तमानाच जगतात अशा चतुष्पाद प्राण्याचे व पक्ष्यांचे जीवन मर्यादित क्षेत्रात, विशिष्ट पद्धतीने नेमून दिल्यासारखे असते. त्यांची चाकोरी ठरलेली असते; परंतु तिन्ही काळात जगणाऱया माणसाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. पंचज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने, स्वयंप्रेरणेने, प्रतिभेने तो प्रगती साधत असतो. त्याला मर्यादा नाही. त्यामुळे माणसांच्या तऱहा अनेक, एकासारखा दुसरा नाही.

शिवराज गोर्ले यांच्या या नग आणि नमुन्यांमध्ये आदर्श म्हणावा असा एकही नाही. आहेत ते सगळे सामान्य सामान्यांतले सामान्य; पण त्यांनादेखील समजून घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ही पात्रे नाटकात योजता येतील अशी आहेत. कदाचित नाटककार गोर्ले यांचा तसाच उद्देश असावा, असे वाटते.

लोकांची फजिती करण्यात गंमत मानणारा, थापाड्या वश्या दामले आहे, तर कोणाला जमत नसेल ते काम अंगावर घेणारा दाखला-प्रेमी दामू चिनकटेही आहे. नाटकवेडा फाटक, संपूर्ण कारकीर्द नोकराची भूमिका वठवणारा व रंगभूमीच्या इतिहासात रमणारा दीपक दंडवते, तर याउलट अभिनय ही एक क्षुद्र बाब आहे, असे मानणारा अन् रंगभूमीचा जणू बट्ट्याबोळ करायला निघालेला काका कुरतडकरही येथे भेटतात.

कामचुकार, आगाऊ, लंपट, गोंधळ-घोटाळे करणारा बनसोडे ड>íपरीवाला; आकडेमोडीत रमलेला, प्रत्येक गोष्ट पैशात मोजणारा लिमये यांच्याबरोबरच खऱया प्रेमाचा आदर करणारा गणा गायधनीसुद्धा आपल्याला भेटतो.

सतत भांडणाची खुमखुमी असलेले विसूभाऊ चिरमुले, वाह्यात बडबड करणारा रंगा लिखिते, तसेच मुखदुर्बळ आळशी नंदू घोमणही इथे पाहायला मिळतो. मअसे आणखी किती

तरी नग गोर्ले यांना भेटले असतील. त्यापैकी केवळ 15 जणांचा नमुन्यादाखल लेखकाने परिचय करून दिलेला आहे.

हे पुस्तक वाचल्यानंतर समाजात विक्षिप्त लोक किती आहेत. विक्षिप्तपणाचे प्रकार किती आहेत, याची कल्पना येते. थोरामोठ्यांची व्यक्तिचित्रणे आपल्याला आदर्श देतात. गोर्ले यांचे `नग आणि नमुने’ अतिसामान्यांच्या समूहातले विविध रंग दाखवतात. हे रंग पाहायचे असतील तर पुस्तक वाचयालाच हवे.

`नग आणि नमुने’

लेखक : शिवराज गोर्ले

प्रकाशक : मेनका प्रकाशन, पुणे.

पाने : २४९

किंमत : रुपये २००/-


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..