नवीन लेखन...

राज्य हवं असेल तर स्वत:वर डाव घ्यायची तयारी ठेवा

आपल्यातील प्रत्येकाला आयुष्यात राज्य हवं असतं पण त्यासाठी स्वत:वर डाव घ्यायला आवडत नाही..नेहमीच आपला डाव कुणीतरी घ्यावा म्हणून यासाठी प्रत्येकजण कुणाचीतरी वाट पाहत असतो.सभोवतली इकडून तिकडून फिरणार्या सोयऱ्यातून कुणीतरी पुढे येईल ही आपली इच्छा काही केल्या फलद्रूप होत नाही.मग आपण इथल्या माणसांच्यामध्ये माणुसकी उरली नाही म्हणून खेद व्यक्त करतो.

कधी भावना उरात मावेनाशा झाल्या की त्यातून बंडखोर काव्याची निर्मिती होत जाते.आपल्या शब्दांच्या कधी लाह्या होतात आणि आकाशातल्या सगळ्या चांदण्याची कधी जागा घेतात हे आपल्याला समजत नाही.मधूनच तत्वज्ञानाचे नवनवे फंडे आपल्या हातून जन्माला येतात.

आपण या सगळ्यात एक साधी गोष्ट विसरून जातो की मुळात रखरखत्या उन्हात आपल्याला सावली मिळावी म्हणून नेहमी कुणीतरी ऊन झेलायलाच हवे असा काही दंडक होऊ शकत नाही.कधीतरी आपणसुद्धा आपल्या उन्हाची ख्याली-खुशाली विचारायला हवी.आपल्या उन्हानां आपल्याकडून होणाऱ्या विचारपुसेची आस लागून राहिलेली असते.बाकी सगळ्यांच्या स्पर्शापेक्षा त्यांना आपल्याकडून एक फुंकर अपेक्षित असते.आणि हे त्यांचे मागणं काही वावगं म्हणता येणार नाही.

साऱ्या जगात कितीही कौतुक झाले. मानपत्रे मिळाली तरी गावाकडल्या पाठीवरल्या थापेपुढे त्यांना मोल नसते.आपल्याला आपल्या उन्हापेक्षा शेजारच्या अंगणातली सावली जादा भाजून काढत असते.जगात उन्हाच्या भाजण्यावर औषध मिळू शकते.पण सावलीच्या भाजण्याला काही कुठे आराम मिळत नाही.

दुसरं असं होतं की आपल्याला सावली देणाऱ्या झाडाच्या फांद्या वठल्या की आपण त्यांचा हात अलगद सोडून देतो.आतापर्यंत केवळ त्यांच्यामुळे प्रत्येक नाजूक घडीला आपण सहीसलामत सुटलो याबद्दल आपल्याकडे कसलाही कृतज्ञपणा असत नाही.आणि कित्येकदा आपल्या कानावर पडणाऱ्या हाकांना आपण कृतघ्नपणे टाळून टाकत असतो. इथले सगळे व्यवहार केवळ देवाण-घेवाण अशा दोन बाजू असणार्या नाण्याच्या इशाऱ्यावर चालते हे सोयीस्करपणे विसरून जात असतो.

दिलेल्या कडू गोळीच्या कडवटपणाचे वास्तव आपण स्वीकारत नाही. त्याला सामोरे जायची आपण हिंमत दाखवीत नाही.सत्य हे नागडे असायला हवे हे सत्य आपल्याला पचनी पडत नाही.वेगवेगळ्या वेशभूषा करून आपण कुणाला फसवीत होतो.याचं उत्तर आपल्या मानगुटीवर बसते तेव्हा आपल्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. आपण त्यावेळी स्वत:वर डाव घेण्यासाठी कबूल होऊन कितीही आर्जवे करीत गेलो तरी हाती काही लागत नाही.

—  दीपक  गायकवाड

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..