योगाभ्यास आणि प्राणायाम – भाग तीन

लहान मुलांनी साध्या प्राणायामाचा आणि मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास करणे, त्यांच्यासाठी फारच अत्त्युत्तम स्थिती होय. कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीने, स्त्री अथवा पुरुष, योगाभ्यास करण्यास कोणतीच हरकत नाही. तद् वतच तो कोणत्याही वयामध्ये करण्यास कोणतीच हरकत नाही. हे जरी खरे असले तरी स्त्रियांनी त्यांच्या मासिक धर्मामध्ये, गरोदरपणामध्ये आणि बाळंतपणा नंतर सहा महिने मात्र योगाभ्यास करू नये. याउलट अशा स्त्रियांनी प्राणायाम व काही ठराविक आसने हि तज्ञ व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली करावीत.

योगासने सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री करता येतात. मध्यरात्री मात्र करू नयेत. प्रात:काळ हा सर्वोत्तम काळ होय. याचे करण म्हणजे सकाळी उठल्याबरोबर व्यक्ति ताजीतवानी असते, तसेच ती रिकाम्या पोटी असते व सकाळी योगाभ्यास करण्यामुळे आपण संपूर्ण दिवसभर चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. जर सकाळी शक्य नसेल, तर संध्याकाळी करण्यास हरकत नाही. परंतू दुपारचे जेवण घेतल्यानंतर साधारणपणे ४ ते ६ तासांनी हा योगाभ्यास करणे उत्तम. संध्याकाळी योगाभ्यास करणे लाभदायक ठरू शकते, कारण दिवसभराच्या कार्यबाहुल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण हे चांगल्या प्रकारे चाललेले असते. त्याचप्रमाणे शरीरही लवचिक झालेले असते. सकाळ, संध्याकाळ वेळ नसल्यास दिवसाच्या कोणत्याही वेळेस योगाभ्यास करता येवू शकेल. परंतू यासाठी पोट मात्र रिकामे असणे गरजेचे असते. तसेच मनाने चलबिचल झालेल्या व्यक्तिने प्रथमत: आपले शरीर आणि मन शांत करावयास हवे व त्यासाठी शवासन करावे व मन व शरीर शांत झाले असता, नंतरच योगाभ्यासास सुरुवात करावी.

“प्राण” या संस्कृत शब्दाचा अर्थ जीवन असा आहे, तर “यम” म्हणजे शिस्त, नियंत्रण, नियमावली आणि पारंगतता होय. “प्राण” याचा दुसरा अर्थ श्वास असा होतो. याचे करण श्वास नसेल, तर जीवन असणार नाही. श्वसन हे शरीरातील स्वायत्त कार्य होय आणि त्याच्यावरच आपणास नियंत्रण करावयाचे असते. त्याद्वारे स्नायू संस्थेच्या इतर कार्यावर नियंत्रण करता येत असते. ती कार्ये म्हणजे, हृदयाचा दाब, रक्तदाब, तसेच शरीराची इतर स्वायत्त कार्ये होत. म्हणूनच श्वासाचे नियंत्रण प्राणायामाने करणे हे योगासनांचे एक महत्वाचे असे कार्य आहे.

— मयुर तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…