नवीन लेखन...

या मार्गावरील सगळ्या line व्यस्त आहेत, आपला कॉल वेटिंग वर आहे

 

बरेच विद्यार्थी प्रेमप्रकरणामुळे ग्रासलेले दिसतात तर काही इतर कारणांमुळे…

मित्रानो एक सांगावस वाटते प्रेम करा पण अभ्यासावर करा.पोस्ट मिळण्यावर प्रेम करा. सद्या Girlfriend आणि Boyfriend जसे आठवड्याचे वार बदलतात त्याप्रमाणे बद्दलतांना दिसतात. पैसा आहे तोपर्यंत तुमच्याकडे Gf आहे. किंवा तुमच्यापेक्षा जास्त चांगला मिळाला की तुम्ही मग गेले कचराकुंडीत, आज 1 उद्या 2 रा, परवा 3 रा…..हि सध्या fashion चालली.काय काय वचन, जिने मरणे के साथ, janu काय , उल्लू काय, पिल्लू काय आणि काय काय सोंग सुरु असतात .लग्न करेल तर तुझ्याशीच, पण वेळ आली आणि थोडं का तुमचं आणि तीच खटकलं कि महाभारताच्या युद्धाला सुरवात.मग आमच्या घरचे नाही म्हणतात मी लग्न नाही करू शकत, मला माफ करून द्या, काय काय बहाणे सुरु होतात, आजपर्यंतचे सगळे वचन, वायदे सगळे मातीमोल. रोज तीच किंवा त्याच ऐकलं तर खूप छान, रात्रभर फोन Engage , सकाळी लायब्ररी किंवा कॉलेज मध्ये परत रामायण सुरु.घरी सांगतात की मी अभ्यास करते, मी लायब्ररी जाते आणि आई बाबा पण विश्वास ठेवतात, पण तिकडे जाऊन काय करतात तर गार्डन किंवा इतर ठिकाणी मजा उडवतात .इकडे माय बाप तुमच्यासाठी स्वतःच्या पोटाला मारून तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही लोक असले धंदे करता, थोडी लाज वाटली पाहिजे स्वतःची स्वतःला . ” पहले खुद कुछ काबिल बनो फिर देखो दुनिया तुम्हारे पिछे दौडगी, तुम दुनिया के पिछे मत दौडो” सगळं काही तुम्हाला आपोआप मिळेल. Gf ला फिरवणे काय, आपला अमूल्य वेळ देऊनही एक दिवस ती तुम्हाला या मार्गावरील सगळ्या line व्यस्त आहे , आपला कॉल waiting वर आहे म्हणूनच ऐकवेल जाईल , परत तुम्ही Distrub व्हाल.म्हणून वेळ असतानाची योग्य वळणावर या.हे प्रेम वैगैरे काही नसते फक्त एक आकर्षण असते. प्रेम करायचं तर आईवर करा बहिणीवर करा, किंवा लग्न करून मोकळे व्हा आणि पत्नीवर आणि मुलामुलींवर प्रेम करा.हे असल्या प्रेमप्रकरणांच्या भानगडीत पडून आपलं आणि आपल्या घरच्या लोकांचं डोकं खराब करू नका.आज जेवढे निदर्शनास आलेत आणि बातम्यांवर ऐकलं किंवा वृत्तपत्र यांच्यावर प्रसिद्ध माहिती नुसार Love Marriage करणाऱ्यांचे बरोबर पटत नाही किंवा Divorce झालेय (काही अपवाद सोडता) आपल्या करियर कडे लक्ष द्या. स्वतःला सिद्ध करा.असल्या भांगडीतून बाहेर या. नाहीतर एक दिवस तुमचं Breakup ठरलं आहेच.आयुष्याच breakup झालं की तुम्हाला कोणीच विचारणार सुद्धा नाही .म्हणून तुमचीच line तुम्ही बदला म्हणजे कॉल waiting वर राहणार नाही. थेट जागी पोहचाल.परत एकदा सांगतोय हे प्रेम वैगेरे काही नसते हे फक्त सोंग असते.आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपलं आणि आपल्या लोकांचं आणि देशाचं नाव मोठं करा.

या लेखबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपण 8275289828 या Whatsp क्रमांकावर पाठवू शकता.

@Prof_Hiteshkumar_Patle

— प्रा. हितेशकुमार पटले

प्रा. हितेशकुमार पटले
About प्रा. हितेशकुमार पटले 15 Articles
प्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..