नवीन लेखन...

मुलीचा जन्म आणि कविताकाल माझ्या भाचीचा फोन आला, मामाजी आप दादा बन गये हो, भैया को लडकी हुई है. इस ख़ुशी में एक कविता हो जाये. खंर म्हणाल तर मी कवी नाही. मराठी भाषेचे शिक्षण ही नाही. छंद, अलंकार कशाशी खातात हे ही माहित नाही. पण हृदयातील भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न करतो. त्या चिमुकल्या चिमणीच्या जन्माच्या वेळी आजी आणि पणजी सुद्धा तिच्या जवळ होते. त्यांना काय वाटत असेल, त्यांच्या मनातील मला जाणवलेल्या भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे:
वासंतिक सुगंधात
वंश वेल मोहरली.
वसंत पंचमीच्या दिनी
घरी महालक्ष्मी प्रगटली
लक्ष्मी – सरस्वतीची कृपा.
अशी माझीयावर झाली.
आजीचा आनंद आता
गगनात सामावेना.
डोळ्यात अश्रू , मनात आनंद
आईच्या हृदयी फुटला आता
मायेचा पाझर.
उबेच्या कुशीत, असा सुरु झाला
चिमुकल्या चिमणीचा संसार.
चिमणीची चिव-चिव
अंगणात गुंजली
जन्मांचे दु:ख सारी,
पणजी विसरली
चिमणीला ही मिळाली बघा
मैत्रीण जीवे – भावाची
दोघांची खेळी आता
अंगणात रंगली.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

1 Comment on मुलीचा जन्म आणि कविता

  1. नमस्कार.
    भावपूर्ण कविता. ‘दिल से’ शब्द व भाव येणें हें महत्वाचें, व ‘दिल से दिल तक’ पोंचणें हें महत्वाचें. तें करतो, तो खरा कवी. ( जे तुम्ही आहात की ).
    नाहींतर अशिक्षित ( traditional अर्थाने ) असणार्‍या बहिणाबाई श्रेष्ठ प्रतीचें काव्य कशा लिहूं सकल्या असत्या ?
    सस्नेह,
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..