मालवणी माणसां

मालवणी माणसां
लयलय ग्वॉड
फणसाचेगरे जसे,
आणि आंब्याचा त्वॉर…….

जाव नको रंगारुपार त्येंच्या
करवंदाभायरून काळी जरी दिसली,
खातानास्वादार त्येंच्या
माणसांमात्र भाळली…………..

होती तेव्हा मालवणी माणसां
ताड-माडउंचीची,
पायातनव्हती चपला तेव्हा
जमीनहोती पायाखालची…………

हात रापले, पाय रापले,
आंगाचोझालो रंग काळो काळो
काबाडकष्टकरून करून
झालोतो लेकुरवाळो………..

पोरां शिकली, मुंबैत गेली,
मिलमध्येकामाक लागली आणि चाकरमानी झाली,
महिन्याच्यामहिन्याक
मनीऑर्डरीकरूक लागली……….

असे दिवस सरता सरता,
बरोचमोठो काळ उलाटलो,
स्वतःचामात्र घर न घेता,
भाड्याच्याचघरात तो रवलो………..

गावच्या घरासाठी त्यानं स्वतःचा आयुष्यही येचल्यान
भावबंदांसाठीस्वतःचा उभ्या आयुष्य त्यानं घालयल्यान
मुंबईच्याचाळीतल्या १० बाय १० च्या खोलयेत
त्येनारडत पिचत आयुष्य मात्र काढल्यान

आता तेका, दरम्यान
पोराबाळा झाली
शिकानसवरान मोठी होता होता,
नावारुपाकइली…..

कोण झालो इंजिनियर,
तरकोण झालो कलाकार,
पैशाचीआता चिंता नव्हती,
पैसोइलो भारंभार………….

शिकलो सवरलो, सरस्वती प्रसन्न झाली,
त्याबरोबरपैसो इलो आणि लक्ष्मी जोरात पावली,
मुंबैतघर घेवची
त्याकाआता ऐपत प्राप्त झाली……

म्हाताऱ्याची मुला आता
लयमोठी झाली,
गावच्याइस्टेटीत भानगड नको म्हणान,
मुंबैतचस्थीर झाली………

शाळेतल्या दिवसांची आणि
पावसातल्याओहुराची
म्हाताऱ्याकमधून मधून
आठवणमात्र येता

पण करतलो काय आता,
तोआठवण काढून काढून रडता,
मुलामात्र गावांक जावूक होनत न्हाय राजी,
आताकाय करतले हे उतारवयात, आजोआणि आजी?…….

— मयुर तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…