नवीन लेखन...

माझी गोवा टुर

 २६ जानेवारी निमित्ताने माझं मिञांबरोबर गोव्याला जाणं झालं.प्रत्येकाला आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य सोड़ुन बाहेरचं जग बघण्याची ईच्छा असते.बाहेर फिरायला जावं तिथली माणसं, त्यांची संस्क्रती पहावी त्यातुन काहीतरी शिकाव काहीतरी आत्मसात करावं अशी ईच्छा असते.पण हि ईच्छा फक्त ईच्छाच असावी तिला आत्मसात करु नये.आपला भारत देश हा संस्क्रती प्रधान देश आहे.जी संस्क्रती भारतामध्ये बघायला मिळते तशी संस्क्रती आजपर्यंत कोणत्या देशाला लाभली नाही.अनेक संत, रती-महारती या भारतामध्ये होवुन गेले आहेत त्यांचे कार्यही तसेच आहे. जे कार्य भारतातील संतांनी केलं आहे, आपल्यावर ज्या प्रकारचे संस्कार त्यांनी केले आहेत, अशा प्रकारचे संत या गोर्‍या लोकांच्या देशात जन्माला येणं मुश्किल आहे आणि कधी येणारही नाहीत. आणी केवळ या महान संतांमुळेच आपली संस्क्रती आजपर्यंत टिकुन राहीली आहे.
पण या संस्क्रतीला आज गालबोट लागत आहे तो केवळ गोवा यासारख्या राज्यांमुळे भले ईंग्रजांनी राज्य सोड़लं असलं तरी त्यांची सस्क्रती आजही तिथे जपली जाते आणि त्याच लोकांचा पगड़ा आजही तिथे आहे.भारतीय लोक कमी पण जिकड़े पहावं तिकड़े सगळे गोरेच गोरे दिसतात.खुप लोकं आपल्या फँमिलीसोबत वर्षातुन एकदा तरी फिरायला जातात आणि फिरायला जाण्यासाठी जर का असा स्पाँट निवड़लात तर तिथे जावुन आपल्या बायका मुलांना, आई-बाबांना तुम्ही काय दाखवणार? त्या नग्न अवस्थेतील गोर्‍या बाया, आपल्या नवर्‍यासोबत नशा करणारी ती स्ञी. जी गोष्ट आपल्या पत्नीला आवड़त नाही नेमक्या अशाच गोष्ठी तिथे बघायला मिळतात. कारण आपला नवरा व्यसनी असावा असं कोणत्याच भारतीय स्ञीला वाटणार नाही. त्याचे परस्ञीसोबत गैरसंबंध असावेत असं तर ती स्वप्नात पण बघु शकत नाही ती आहे खरी भरतीय नारी नाहीतर त्या फाँरेनर जसा अंगावरचा ड़्रेस बदलावा तसा नवरा बदलतात ही आहे त्यांची संस्क्रती कोणत्या तरी पिक्चर

मधला सलमानखान हीरोईनची चुक तिच्या लक्षात आणुन देत तिला म्हणतो ओरत कि खुबसुरती ढ़कनेसे ज्यादा खुबसुरत लगती है! आणि खरं आहे त्याचं जर का आपण त्या अर्धनग्नअवस्थेतील बायका आणि आमची सुंदर साड़ीतील भारतीय नारी यांच चिञ ड़ोळ्यासमोर आणलं तर भारतीय स्ञी किती ग्रेट आहे आपल्याला दिसुन येईल.

वाईटाबरोबर चांगलंही पाहण्यासारखं तिथे आहे पण त्यांचं प्रमाण खुप कमी आहे. यामध्ये मंगेश मंदिर, फोर्ट, आणि विशेष म्हणजे चर्च पाहण्यासारखे आहेत.पण काही स्पाँट अशे आहेत कि त्यांची नावं फक्त ऐकलेलीच बरी. आणी मी सुद्धा ती फक्त ऐकलीतंच त्यांची हीस्ट्री ऐकुन शरमेने मान खाली जाते अशे स्पाँट पाहण्याचा योग पण आला नाही आणी ते न पाहणेच बरे कारण शितावरुन भाताची परिक्षा आपल्याला करता येते.

सांगण्याचं तात्पर्य एवढ़ंच कि, आजपर्यंत चाललंय ते ठिक चाललंय पण ईथुन पुढ़च्या पिढ़ीचं काय कारण या पिढ़ीवर टि.व्ही. सिरियलचं भुत एवढ़ं चढ़लंय कि ते उतरणं आता मुश्किल झालंय अक्षरशः तरुण मुल-मुली सिरियल च्या आहारी गेल्या आहेत सिरियल मध्ये जे पाहतात तेच करतात अगदी तसंच्या तसं करण्याचा प्रयत्न करतात पण तसं करतेवेळी आपल्या आई-बाबांकड़े पैसा आहे कि नाही हे सुद्धा पाहत नाहीत आणी मुलगा-मुलगी काँलेज ला जाते काहीतरी शिकते म्हणुन आई-बाबाही लाड़ पुरवतात. कारण त्यांनी बिचार्‍यांनी काँलेज कधी पाहीलेलं नसतं ज्यांनी पहीलेलं आहे त्यांनी तरी असं करु नये कारण वेळ निघुन गेल्यानंतर काही उपयोग नसतो आज जरी त्यांना थीड़ं वाईट वाटलं तरी उध्या तशी चुक करतावेळी ते दहा वेळा विचार करतील.

माझ्या तरुण मिञांना मि एवढ़ंच सांगेन कि, देशाच्या कोणत्याही कानोकोपर्‍यात जा पण आपली संस्क्रती विसरु नका जे आपल्याला उत्तम लाईफ बनवायला कामास येईल अशाच गोष्टी आत्मसात करा. आजचा तरुण हा उध्याचा नागरीक आणी कर्तव्यदक्ष पालक आहे हे तरुणाने विसरु नये.

— प्रमोद पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..