नवीन लेखन...

मराठी माध्यमाकडून उच्चशिक्षनाकडे





आज समाजात आपण बघतो जो तो इग्रजी शाळेत आपल्या मुलाला टाकायला धजत असतो. जणू काही मराठी माध्यमात मुले शिकली तर ती प्रगती करणारच नाही अशी आजच्या पिढीची समजूत झालेली आहे.

आज पूर्वीसारखे राहिलेले नाही मराठी शाळेत सुद्धा आज सेमी इंग्लिश कल्पना अस्तित्वात आलेली दिसते, त्यामुळे मराठीत शिक्षण घेऊन सुद्धा इंग्लिशचा आस्वाद घेता येतो. पण असो आपण मूळ विषयाकडे वळू. तर आपला विषय आहे मराठी माध्यमाकडूनउच्चशिक्षनाकडे.

आज ऐपत नसतांना अनेक मंडळी आपल्या मुलाला / मुलीला इंग्लिश माध्यमात टाकत आहेत. आणि बऱ्याचदा मुलीला इंग्लिश माध्यमात टाकलेले असेल आणि त्याचवेळी मुलाला ज्यावेळी इंग्लिश माध्यमात टाकायची वेळ येते तेव्हा हीच मंडळी मुलीचे नाव तिथून काढून त्याजागी मुलाला टाकतात आणि परंपरेने अन्याय होत असलेली स्त्री बिचारी अगदी योग्य ठिकाणी म्हणजे मराठी माध्यमात येते आणि तेपण सेमी इंग्लिश घेऊन.

पण का हे सर्व कशासाठी. आपण जर थोडा विचार केलात तर आपल्याला पटेल कि मराठी माध्यमातच शिक्षण देऊन आपण आपल्या मुलाला उच्च अधिकारी बनवू शकाल. ते कसे

आज बहुतांशी इंग्लिश माध्यमातील शाळांना अनुदान मिळत नाही म्हणजे आपला किमान वार्षिक खर्च रुपये २५०००/- पकडू. असे दहा वर्ष म्हणजे आपला एकूण खर्च २५००००/- कदाचित याहीपेक्षा जास्त. पण जर आपण आपल्या मुलाला मराठी माध्यमात टाकले आणि तेपण सेमी इंग्लिश घेऊन तर बघा आपला हा पैसा नक्कीच वाचेल. आता आपण म्हणाल आम्हाला काही पैसे वाचवायचे नाही आमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळणे आवश्यक अरे हो हो मी कुठे नाही म्हटले.

आपण मराठी माध्यमात आपल्या मुलाला जेव्हा टाकाल त्यावेळी सेमी इंग्लिशचा उपयोग नक्कीच करा आणि त्याचबरोबर इंग्लिश speaking

कोर्से लावा अगदी उच्च प्रतीचे इंग्लिश शिकवत असतील अश्या

ठिकाणी आपल्या मुलाला पाठवा शेवटी सराव महत्वाचा. नुसते इंग्लिश शाळेत टाकले म्हणजे मुलगा हुशार होईलच असे नाही. (

आता बघा त्यामुळे आपण आपल्या मुलाला जो काही खर्च करणार होता तो पैसा जपून ठेवा त्यावर पतपेढीचे व्याज कमवा आणि बघा बर १० वर्षांनी हा पैसा किती होतो ते आणि मग हा पैसा फक्त आणि फक्त आपल्या मुलाचे उच्चशिक्षण करण्यासाठीच उपयोग करा. कारण शिक्षणाचा खरा प्रवास सुरु होतो तो दहावीनंतर. त्यावेळी नक्कीच तुम्हाला वाटले कि आपण आपल्या मुलाला डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि अजून काही करायचे, त्यावेळी नक्कीच या बँकाकडे भिक मागावी लागणार नाही. आपलाच पैसा उपयोगी येईल कारण हा १० वर्षांचा पैसा + व्याज + तुम्ही अजून काही प्लान करून ठेवलेला असेल तो पैसा बघा जमत आहे का गणित.

शेवटी काय ज्याचा त्याचा प्रश्न ? निर्णय आपल्यालाच घ्यायचा ?

— सचिन सदावर्ते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..