मतपेटीचे राजकारण; आसामचे बांगलादेशीकरण

आसाममध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात 31 जणांचा बळी गेला आहे. जातीय दंगलीचा वणवा 500 गावांत पसरला असून कोक्राझार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 23 जुलैपासून आसाममध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोक्राझार जिल्ह्याला या दंगलीचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोक्राझारमध्ये समाजकंटकांना पाहताक्षणी गोळया घालण्याचे आदेश तसेच अनिश्‍चितकालीन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी निमलष्करी दलाचे 1400 जवान पाठवण्यात आले आहेत. राज्यात अर्धसैनिक दलाचे 9000 जवान आधीच तैनात करण्यात आले आहेत. आसाममधून जाणार्‍या तब्बल 31 रेल्वे विविध रेल्वेस्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. गोसाई गावात अज्ञात जमावाने गुवाहाटीकडे जाणार्‍या राजधानी एक्‍स्प्रेसच्या चार डब्यांना आग लावल्याचीही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. संतप्त लोकांनी अनेक तास राजधानी एक्‍स्प्रेस रोखून धरली. धुबरी आणि चिरांग जिल्ह्यातही हिंसाचाराच्या घटना घडल्या. धुबरीत पोलिसांशी झालेल्या चकमकीत 7 जण जखमी झाले. आल असाम मायनॉरिटी स्टुडंट्‌सने सोमवारी आसाम बंदची हाक दिली होती. संघटनेच्या समर्थकांनी लोकांना मारहाण केली. प्रतिबंध करणा-या पोलिसांवरही त्यांनी हल्ला केला. धुबरी आणि चिरांग जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

8000 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या 400 गावांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. आसाममध्ये शुक्रवारी रात्री बोडो लिबरेशन टायगरच्या चार कॅडर्सची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून बोडो आणि बांगलादेशींमध्ये (सध्या तेथे बहु संघर्ष भडकला आहे. आसाममध्ये जातीय हिंसाचाराने भीषण रूप धारण केले आहे. कोक्राझार, चिरांग जिल्ह्यात दंगलीत 500 गावे खाक झाली. दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जुलैला पोलिस गोळीबारात 4 जण ठार झाले त्यामुळे मृतांची संख्या 32 झाली. कोक्राझारमध्ये दोन विद्यार्थी नेत्यांच्या हत्येनंतर शुक्रवारी बोडो लिबरेशन टायगर्सच्या चार माजी सदस्यांची हत्या झाली. यानंतर भडकलेली दंगल 11 जिल्ह्यांत पसरली. कोक्राझार, चिरांग, धुबरी जिल्ह्यांत संचारबंदी लागू आहे. 50 हजार लोक मदत छावण्यात आहेत. 26 रेल्वे बंद करण्यात आल्या. दंगल आटोक्‍यात आणण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा सर्व शक्तिनिशी वापर करा, असे निर्देश पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना दिले आहेत. बुधवारी सर्वपक्षीय गटाकडून घटनास्थळी जाऊन पीडितांची चौकशी करण्यात येणार आहे.

भारतात 3-4 ते 4 कोटी बांगलादेशी घुसखोर
गुवाहाटीसारख्या राजधानीत एका युवतीवर जमावाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे हादरलेला आसाम सावरत असताना आता बोडो भूमीत हिंसाचाराचे लोण पसरले आहे. आताचा वाद मात्र स्थानिक विरुद्ध “परके’ असा आहे. धुब्री जिल्ह्यातून अल्पसंख्याक समाजातील (आता ते बहुसंख्याक झाले आहेत) लोक कोक्राझार जिल्ह्यात येत आहेत. त्याचा स्थानिकांना राग आहे आणि त्यातून संघर्षाची ठिणगी पडली. स्थानिक विरुद्ध परके हा वाद आसामला नवा नाही. रोजगाराच्या कमी संधी आणि आहे त्या संधींसाठीच्या संघर्षात नवे वाटेकरी आल्यावर कोण शांत बसणार? आपल्याला संधी मिळावी, अशी स्थनिकांची अपेक्षा आणि त्यात बाहेरच्यांची घुसखोरी; अशी स्थिती निर्माण झाल्याने तिचे पर्यवसान हिंसाचारात होते.

भारतात बेकायदेशीर घुसखोरी करून येथेच कायमचे स्थायिक झालेल्या बांगलादेशी नागरिकांची नेमकी मोजदाद कधीही केली गेलेली नाही. परंतु ताज्या अंदाजानुसार ही संख्या 3-4 ते 4 कोटींच्या घरात आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे 70 ते 80 लाख बांगलादेशी एकट्या आसाममध्ये घुसलेले आहेत. भौगोलिक अडचणीमुळे ही घुसखोरी रोखणे जिकिरीचे असले तरी गेल्या 50 वर्षांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने हे काम अधिकच कठीण झाले आहे. या घुसखोरांना हुडकून त्यांना परत बांगलादेशात पाठविण्यासाठी केंद्राने केलेला कायदा ही यातील मोठी अडचण असल्याची सबब बरीच वर्षे पुढे केली गेली. परंतु हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून आता आठ वर्षे झाली तरी या कामात जराही गती आलेली नाही.घुसखोर बांगलादेशी गेली कित्येक दशके अप्पर आसामच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने घुसले. तेथे स्थानिकांचा दबाव, विरोध व संघर्ष वाढल्यावर त्यांनी लोअर आसामच्या धुबरी, गोलपाडा, कोकराजार, मोरीगाव व नवगाव जिल्ह्यांमध्ये घुसण्यास सुरुवात केली. हे घुसखोर केवळ भूसीमेवरून न येता समुद्रमार्गेही येऊन थेट ओरिसामध्ये शिरू लागले आहेत. प्रस्थापित राजकीय पक्ष याविषयी काहीही करत नाहीत हे पाहून 1980च्या दशकात आसाममधील विद्यार्थ्यांनी ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियनच्या (आसू) नेतृत्वाखाली या घुसखोरीविरुद्ध सहा वर्षे प्रखर आंदोलन केले. त्यातून पुढे केंद्र सरकारने आसाम करार केला व 25 जून 1971 नंतर घुसखोरी केलेल्या सर्व बांगलादेशींची हकालपट्टी करण्याचे मान्य केले. पण हा करार कधीही प्रामाणिकपणे पाळला गेला नाही.

हिंसाचारामुळे जर्जर आसाम
सालात ईशान्य भागात 1, 489 हिंसक घटना घडल्या. या हिंसक घटनात ईशान्य भागात 257 नागरिकांचा मृत्यू झाला. एकट्या आसाममध्येच गेल्या वर्षभरात शंभरेएक बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या आहेत. व 1012 मध्ये 22 जुलै पर्यंत 70 नागरिकांचा मृत्यू झाला. भारताच्या ईशान्येकडील राज्यांत अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानच्या कुख्यात “इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) या संघटनेने या राज्यांतील दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे. आसाममधून जाणार्‍या भारत-बांगलादेश सीमेवर गुरांचा चोरटा व्यापार वाढल्याबद्दल सुरक्षा दलांनी चिंता व्यक्त केली आहे. मुस्लिम मूलतत्त्ववादी संघटनांना रोखण्याचे काम करताना गुरांचा चोरटा व्यापार वाढल्याचे लक्षात आले. भूतान, तिबेट, म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमेवर असलेला ईशान्य भारताचा प्रदेश संवेदनशील आहे. अनेक दहशतवादी संघटना येथे कार्यरत आहेत. “युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ (उल्फा) ही दहशतवादी संघटना इस्लामी दहशतवाद्यांबरोबर संपर्कात आहे.

आसामचे रूपांतर इस्लामी देशात
बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीमुळे “आयएसआय’ आणि मूलतत्त्ववाद्यांना केवळ आसाममध्येच नव्हे, तर ईशान्येकडील अन्य राज्यांतही तळ उघडणे सोपे जाते. या प्रदेशात वीसपेक्षा जास्त जिहादी गट कार्यरत आहेत. त्यात “मुस्लिम टायगर फोर्स ऑफ आसाम’, “मुस्लिम युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’, “मुस्लिम युनायटेड लिबरेशन आर्मी’, “युनायटेड मुस्लिम फ्रंट ऑफ आसाम’, “युनायटेड इस्लामिक रिफॉर्मेशन मूव्हमेंट ऑफ इंडिया’, “मुस्लिम सिक्‍युरिटी फोर्स’, “युनायटेड लिबरेशन मिलिशिया ऑफ आसाम’, “मुस्लिम सिक्‍युरिटी कौन्सिल ऑफ आसाम’, “हरकत उल मुजाहिदीन’, “हरकत उल जिहादे इस्लामी’, “पीपल्स युनायटेड लिबरेशन फ्रंट’, “रेव्होल्युशनरी मुस्लिम कमांडोज’, “जमात उल मुजाहिदीन’, “स्टुडंट्‌स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ आणि “लष्करे तैयबा’सारख्या दहशतवादी संघटना येथे कार्यरत असून, आसामचे रूपांतर इस्लामी देशात करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. बांगलादेशातून होणार्‍या अनिर्बंध घुसखोरीमुळे या राज्यांतील लोकसंख्येचा तोल आणि समन्वयच धोक्‍यात आला आहे. प्रथम घुसखोरी करायची आणि मग त्या प्रदेशाचा लचका तोडायचा, असा “आयएसआय’चा डाव आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, देशातील वीस दहशतवादी संघटना सध्या “आयएसआय’च्या जवळ आल्या आहेत.

घुसखोरांना रोखा
घुसखोरीबरोबरच दहशतवादी कारवायांसाठीही बांगलादेशच्या सीमेचा उपयोग केला जात आहे. आसाममध्ये एखाद्या ठिकाणी स्फोट घडवून आणायचा असेल, तर पूर्वी काही दिवस आधी शस्त्रास्त्रे, स्फोटके यांची जमवाजमव केली जात असे. आता स्फोटकांची जुळवाजुळव बांगलादेशातच केली जाते आणि स्फोट घडवून आणण्याच्या थोडे आधी ती आसाममध्ये आणली जातात. आसाममधील काही मूलतत्त्ववादी संघटनांची मुख्यालये बांगलादेशात आहेत, तर प्रशिक्षण केंद्रे म्यानमारमध्ये आहेत.

यांपैकी “उल्फा’ची विध्वंसक शक्ती अधिक असली, तरी अन्य संघटनांची शक्ती काही कमी नाही. “उल्फा’ ही विघटनवादी संघटना आहे. गेल्या काही वर्षांत मूलतत्त्ववादी संघटनाही वाढल्या आहेत. इस्लामिक कट्टरपंथीयही जोर धरत आहेत. आसाममध्ये बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून, धुबरी, नागाव, गोलपारा या जिल्ह्यांत घुसखोरांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यात मूलतत्त्ववादाचा प्रसार केला जात असून, त्याकडे सत्ताधारी एक तर दुर्लक्ष करीत आहेत किंवा राजकारणासाठी त्याचा सोयीस्करपणे वापर केला जात आहे. भारतात बांगलादेशाचे सुमारे 4 कोटी नागरिक बेकायदा घुसले असून, स्थिती अशीच कायम राहिल्यास ही संख्या दुप्पट होण्यास वेळ लागणार नाही. बांगलादेशात असलेली “हुजी’ ही दहशतवादी संघटना आसाममध्ये हिंसाचार घडवून आणते आहे. यांपैकी बहुतेक घुसखोर आसाममध्ये स्थायिक होतात. गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांची संख्या वाढली आहे, आणि आता तर ते मतदारही झाले आहेत. घुसखोर बांगलादेशींनी एक पक्षही सुरू केला आहे. त्याने निवडणूकही लढविली आहे. त्यान्चे सध्या आमदार आहे व ते मुख्य विरोधी पशः आहेत. त्यामुळे घुसखोरांबाबत मतपेटीचे राजकारण आड येऊ लागले आहे. अल्पकालीन राजकीय लाभासाठी, मतांसाठी घुसखोरीबाबत नरमाईचे धोरण अवलंबले जाताना दिसते आहे.गुवाहाटी उच्च न्यायालयाने केलेले भाष्य द्रष्टेपणाचे व भयसूचक होते. न्यायालयाने म्हटले होते की, हे बांगलादेशी घुसखोर आसामच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहेत एवढेच नव्हे तर राज्याच्या अनेक जिल्ह्यांत ते ‘किंगमेक’ ही झाले आहेत. कठोर राजकीय इच्छाशक्ती दाखविली नाही तर या घुसखोरांच्या लोंढयांमुळे आसाममधील मूळ रहिवासी त्यांच्याच प्रदेशात अल्पसंख्य होण्याचा दिवस फार दूर नाही.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 270 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…