प्रेम कुणावरही करावे

‘प्रेम कुणावरही करावे’..ही कुसुमाग्रज यांची ही अत्यंत गाजलेली आणि आपल्याला अंतर्मुख करणारी कविता.

प्रेम कुणावर करावं ?
कुणावरही करावं

प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं,
दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं।
प्रेम कुणावरही करावं।

प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं,
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं,
बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं,
यमुनेचा डोह जहरुन टाकणा-या कालियाच्या फण्यावरही करावं,

प्रेम कुणावरही करावं
प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातीलअद्भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं,
पेंद्याच्या बोबडया बोलावर करावं,
यशोदेच्या दुधावर,
देवकीच्या आसवांवर,

प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं,
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,

प्रेम कुणावरही करावं
प्रेम योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं

प्रेम
चारी पुरुषार्थांची झिंग देणा-या जीवनाच्या द्रवावर करावं,
आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणा-यास्वतःच्या शवावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
कारण
प्रेम आहे
माणसाच्या संस्कॄतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ….. !

4 Comments on प्रेम कुणावरही करावे

 1. Prem ek ahsas hai
  Ek bhavna hai
  Prem asimit hai
  Prem achha ya bura nahi hota
  Prem sirf prem hota hai
  Prem se pare aur kuch bhi pavitra nahi.

 2. सातत्याने फक्त प्रेमच करावं।
  सर्वांवर करावं।
  श्रीकृष्णा वर, त्याच्या सर्व लीलां वर प्रेम करावं। वृंदावना वर,तिथल्या मातीचा वर, तिथल्या पुष्पलतां वर, वृक्षांची वर, पशु-पक्ष्यां वर
  कृष्णवेड्या गोप्यांवर,त्यांच्या उत्कट प्रेमावर आणि त्यांच्या विरह-वेदनेवर सुद्धा फक्त प्रेमच करावं।
  मानवी जीवन फार छोटे असते। भौतिक संपदा मोजता येते। प्रेम मोजता येत नाही,म्हणून सतत प्रेम करत रहावं।
  -विठ्ठल घारपुरे/16-09-2018/रविवार/00:31

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..