नवीन लेखन...

प्रजासत्ताक भारत देश

    

२६ जानेवारी १९५० साली भारत देश प्रजासत्ताक म्हणून घोषित केला भारतीय लोकशाही अंमलात आली गेली पण याच देशाची राज्यघटना लिहिण्यासाठी २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले या लोकशाहीने माणसाला माणूसपण दिले याच लोक्साहीने माणसाला जगण्याचा अधिकार दिला समता न्याय हा लोकशाहीचा गाभा आहे आज २६ जानेवारीला सार्‍या देशभर उत्साहाचे वातावरण असते पण आज हि य सामान्य लोकांचा विचार केल्यास प्रश्न पडतो कि खरच आम्ही प्रजासत्ताक झालोय ?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने अथक परिश्रम घेवून या देशाची घटना लिहिली पण आज त्या महामानवाच्या जनतेला उपेक्षित ठेवले आहे आज देशात इतके हल्ले खून दरोडे बलात्कार राजरोसपणे घडतात याला जबाबदार कोण देशात असणारी लोकशाही हि जनतेच्या हितासाठी आहे असे सांगणारे नेते आज या देशात बरेच आहेत पण या समाजासाठी कोणी झटणारा कोणी नाही इथे जनता उपाशी आहे आणि नेते अगदी सुखाने राहत आहेत लोकशाहीचा गैरवापर हा भारत द्शात झाला आहे जगतील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश म्हणून साऱ्या भारत देशाची साऱ्या जगात ओळख आहे तरीही भारत देश आजपर्यंत महासत्ता झालेला नाही आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशाच्या पंक्तीमध्ये आज हि भारत देश मागे आहे आज हि भारत देश विकसनशील देश गणला जातो या देशाची लोकसंख्या इतकी अए कि जगात दुसरा क्रमांक आहे पण बाकी क्षेत्रात अजून मागे आहे इथे सामान्य जनता अश्या आशेवर जगते कि आज न उद्या या देशाला बाबासाहेबांसारखा नेतृत्वावन नेता भेटेल पण दुर्दैव आमच्या देशच इथे लोकशाहीला बदनाम केलाय आमच्याच लोकांनी मतदानासारखा बलाढ्य अधिकार दिला राजा केल सामान्य जनाला पण पैसायापुढे विकला गेला इथला सामान्य माणूस कारण आज भाषा हि पैसायाची बोलली जाते थोडा विचार केला तर समजेल कि आम्ही आजही प्रजासत्ताक नाही आम्हाला आमचा नेता निवडण्याचा अधिकार आहे पण तो आम्ही निवडू शकत नाही आम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य आहे पण आम्ही आम्हाला पाहिजे तो व्यवसाय करू सकट नाही कारण राजकारणी लोक ते आम्हाला करून देत नाही मतदान करण्याचा अधिकार आम्हाला आहे पण आम्ही मतदान कोणाला करायचे हे आम्हाला राजकीय नेते सांगतात.

आज आम्ही प्रजासत्ताक आहोत म्हणतो पण जर वळून पहा आज महिलांना रक्षण नाही महागाई इतकी वाढली आहे कि सामान्य माणसाला परवडणारे नाही जिथे जगणेही मुश्किल झाले आहे तिथे आम्ही प्रजासत्ताक झालो असे म्हणणे अगदी मूर्खपणाचे आहे देशाच्या राज्यघटनेत सारी कलमे कायद्याने अगदी परिपूर्ण असि आहेत मग तिची अंमलबजावणी आजचा सरकार का करत नाही हीच खंत आहे.

शेवटी एखादा कवी बोलून जातो

भारता भारता तू कशाचा महान रे

तुझ्याच घटनाकाराचा होतो इथे अपमान रे

भारता भारता तुकाशाचा महान रे

तुझ्या लेकींचा होतो इथे बलात्कार रे

भारता भारता तू कशाचा महान रे

तुझ्या लेकरांवर होतो इथे अत्याचार रे

भारता भारत तू कशाचा महान रे

तू कशाचा महान रे

— कुमार.रविंद्र मनोहर सावंत उर्फ रवि

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..