नवीन लेखन...

पाकिस्तानचे अफ-ताल-काश्मिर धोरण

भाग-१ – जम्मू- काश्मिरमध्ये सुरक्षा दलाच्या आक्रमक हालचाली

सशस्त्र कट्टर जिहादींच्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या घुसखोरीमुळे तसेच पश्तुनी भाषेत बोलणार्‍या कट्टर तालिबानी जिहादींकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षादलांनी व १ पॅरा स्पेशल फोरर्सेस यांनी आक्रमक हालचाली करून घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सुरक्षादल व आतिरेकी यांच्यात मार्च महिन्यात झालेल्या चकमकींवरून ही घुसखोरी बर्फ वितळण्याच्या आधीच सुरु झाल्याने ती नेहमीपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध होते. २००८ च्या तुलनेत घुसखोरीचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. शिवाय छोट्या गटांपेक्षा २०-३० सशस्त्र व सुसज्ज अतिरेकी एकाच वेळी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सैन्यदलाची आक्रमक कृती
मागील नोव्हेंबर-डिसेंबर मधील निवडणूकांपासून सैन्यदलाने स्थानिक पातळीवर घडवून आणलेल्या सुधारणा कायम राखण्यास सैन्यदलाला यश आले. असे असले तरी सैन्याने मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून त्या विरोधात शहरी भागात चळवळी, आंदोलने करण्यात आली. हुरियत कॉन्फरन्सही नागरिकांना निवडणूकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न देखील केला.
लेखकः (निवृत्त) ब्रिगेडीयर श्री.हेमंत महाजन

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..