नवीन लेखन...

न वैद्यो प्रभुरायुष:।

“आजवर कित्येक उपचार घेतले; काही फरक नाही. अगदी IUI चे कित्येक प्रयत्न केले. पाण्यासारखा पैसा खर्च झाला; तरीही रिझल्ट नाही. माझ्या बहिणीने तुमच्या नावाचा आग्रहच धरला म्हणून इथे आले. इतर कशाने फरक पडलेलाच नाही; आता आयुर्वेदाने काही फरक पडतोय का बघूया इतकाच विचार डोक्यात होता. फारशी काही अपेक्षा नव्हतीच. तुमच्या औषधाने मात्र आमचं जीवन बदललं. आधीच तुमच्याकडून उपचार घ्यायला हवे होते.”
लग्न होऊन सहा वर्षे झाली पण गर्भधारणा नाही; अशी तक्रार असलेले जोडपे आपल्या नवजात बालकाला घेऊन आपल्याकडे येऊन ही प्रतिक्रिया देतात तेव्हा ‘हा सूर्य हा जयद्रथ’ इतकी स्पष्ट स्थिती असते. ‘तुमच्या औषधाने’ हे शब्द मात्र कानाला थोडेसे खटकले. माझं औषध? माझं असं काय आहे त्यात? जे आहे ते आयुर्वेदाचं; चरक-वाग्भटादि आचार्यांचं, वात्स्ययनादि महर्षींचं. आम्हा वैद्यांचं काम हमालाचं फक्त. ‘फोडिले भांडार धन्याचा माल। मी तो हमाल भारवाही।’
आम्हाला ज्ञान देणारा आयुर्वेद आणि फळ देणारे भगवान धन्वंतरी. आम्ही वैद्यगण केवळ निमित्तमात्र. माझ्यासहच बहुतांशी वैद्य ‘तुमच्या औषधाने’ या शब्दांवर अडतात; ‘माझ्या नाही – आयुर्वेदाच्या’ असं तुम्हाला झटकन सुचवतात! शास्त्र हे सर्वोपरि. फार कशाला; काही मार्गदर्शन घेण्यासाठी आलेले विद्यार्थीदेखील नमस्कार करण्यासाठी पुढे सरसावतात तेव्हाही मी त्यांना अडवतो आणि माझ्या चिकित्साकक्षातल्या धन्वंतरीप्रतिमेकडे बोट दाखवतो. बहुतांशी वैद्य असेच असतात; निष्काम कर्मयोग्यासारखे. किंबहुना तसेच असण्याचा आयुर्वेदाचा आदेश आहे.
‘न वैद्यो प्रभुरायुष:।’
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..