नेत्याने अपयशावर कशी मात करावयाची?

नेत्याने अपयशावर कशी मात करावयाची? असा प्रश्न एकदा अब्दुल कलम साहेबाना विचारला गेला असता, ते म्हणाले……………

मी माझा अनुभव कथन करतो. १९७३ साली मी भारतीय उपग्रह अंतराळात सोडण्याच्या मोहिमेचा (एस एल व्ही – ३) प्रोजेक्ट डायरेक्टर नेमला गेलो. १९८० पर्यंत रोहिणी उपग्रह अवकाशात सोडण्याचे आमचे ध्येय

होते. मला आर्थिक पाठबळ आणि माणसे दिली गेलीत, परंतु त्याचबरोबर असेही स्पष्ठपणे बजावण्यात आले की हा प्रकल्प १९८० पर्यंत पूर्णत्वास गेलाच पाहिजे. हजारो हात हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी एकत्र आलेत आणि आम्ही शास्त्रीय दृष्ट्या तसेच तांत्रिक दृष्ट्या ते कार्य सिद्धीस नेण्यासाठी व आमचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.

मला वाटते तो १९७९ चा ऑगस्ट महिना होता आणि आम्हाला वाटले आम्ही आमचे कार्य सिद्धीस नेण्यास तयार आहोत. जेथून हा उपग्रह अवकाशात सोडवायचा होता त्या ठिकाणी प्रोजेकट् डायरेक्टर म्हणून मी उपस्थित होतो. उपग्रह अवकाशात सोडण्यापूर्वी ४ मिनिटे अगोदर कॉम्पूटरने सगळे तपासून पाहण्यासाठी सुरुवात केली. १ मिनिटा नंतर ताबडतोब कॉम्पूटरने उपग्रह अवकाशात पाठविण्याचा कार्यक्रम स्थगित केला. उपग्रहाची नियंत्रण कार्यपद्धती व्यवस्थित कार्यरत नव्हती. माझे चार / पाच सहकारी होते – ते म्हणाले, “साहेब, तुम्ही काही चिंता करू नका. त्यांनी त्यांची गणिते केलीत आणि म्हणाले की उपग्रहामध्ये पुरेसे इंधन आहे. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की कॉम्पूटरकडे लक्ष न देता आपण मानवी नियंत्रणाने उपग्रह अवकाशात सोडूया. पहिल्या फेरीमध्ये सगळे व्यवस्थित काम करीत होते. दुसऱ्या फेरीमध्ये एक अडचण निर्माण झाली. अवकाश यान अवकाशात जाण्याऐवजी बंगालच्या उपसागरामध्ये कोसळले. ते एक मोठेच अपयश होते.

त्या दिवशी, इस्रोचे अध्यक्ष प्रोफ. सतीश धवन यांनी पत्रकार परिषद घेणार होते. उपग्रह अवकाशात सोडण्याची वेळ होती सकाळी ७ वाजता, तर पत्रकार परिषदेची वेळ होती सकाळी ७.४५ वाजताची. जगातील नामवंत पत्रकार ह्यासाठी श्री हरीकोटा येथे उपस्थित राहणार होते. त्यांनी ती ठरलेली सभा घेतली आणि नुसतीच घेतली नाही तर ह्या संपूर्ण अपयशाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यानी सभेमध्ये असे सांगितले की, आमच्या संपूर्ण गटाने ह्या प्रकल्पावर फारच मेहनत घेतली आहे. परंतू त्यांना आणखी तांत्रिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदतीची आवकश्यता आहे.

कलामांनी ह्यावेळी आठवण करून दिली की, ह्या प्रकल्पाचे ते प्रोजेक्ट डायरेकटर होते व ह्या अपयशाची जबाबदारीही त्यांचीच होती. परंतू असे असतानाही प्रोफ धवण यांनी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने ती जबाबदारी स्वीकारली होती.

पुढच्याच वर्षी १९८० च्या जुलाई महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपग्रह अवकाशात पाठविण्याचे धाडस केले आणि त्यामध्ये ते यशस्विही झाले. संपूर्ण देश आनंदात / जल्लोषात सामील झाला. पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेण्यात आली, परंतू ती त्यांच्या अध्यक्षते खाली न घेता त्यांनी ह्यावेळी श्री. कलाम साहेबाना पुढे बोलाविले आणि ती पत्रकार परिषद त्यांना घेण्यास सांगितली.

श्री. कलाम म्हणतात, त्या दिवशी त्यांनी आपल्या आयुष्यातील एक मोठा धडा घेतला. ज्यावेळेस अपयश आले त्यावेळेस संस्थेचा अध्यक्ष म्हणून अध्यक्षांनी ते आपल्या शिरावर घेतले. परंतु ज्यावेळेस, यश पदरात पडले त्यावेळेस ते त्यांनी ते न घेता आपल्या संपूर्ण गटाला दिले. यावरून हे दिसून येते की, व्यवस्थापनाचे धडे हे पुस्तकात वाचून मिळत नसतात, तर ते अनुभवातून येत असतात.

— मयुर तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…