नवीन लेखन...

ध्वनि प्रदुषण…. एक अद्रुश्य भस्मासुर….





ध्वनि
प्रदुषण हि एक खुप मोठी समस्या आज आपल्याला भेडसावत आहे. बदलत्या कळानुसार आपणही
बदलत आसतो व प्रगतीची विवीध शिखरे पार करीत असतो परन्तु हे करत असताना निसर्गाची व
स्वत:ची जी हानी होत असते त्याकडे आपण कळत नकळत कानाडोळा करत असतो.

ध्वनि
प्रदुषण म्हणजे काय ते आपण प्रथम समजुन घेऊ…

माणसाच्या
कानांची
, ऎकण्याची एक विषिष्ठ मर्यादा असते, जेव्हा त्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात ध्वनी येतो तेव्हा तो आपल्या
अरोग्यास हानीकारक असतो व त्या परीस्थीतीला ’ध्वनि प्रदुषण’ असे म्हणतात.

ध्वनी
मोजण्याच्या मापाला “डेसिबल” असे म्हणतात. साधारणपणे १० – ५० डेसिबल्स
चा ध्वनि आपणास व्यवस्थित त्रास न होता ऎकु येतो. या मर्यादेवरील आवाज आपणास नकोसा
वाटतो. ऊदाहरणादाखल….

जोरात
बोलणे – ६० डेसिबल्स.

टि.व्ही, रेडीयोचा मोठा आवाज – ७०-७५ डेसिबल्स.

प्रेशर कुकरची शिट्टी – ७५ डेसिबल्स.

वाहनांचे ब्लो होर्न – ७५ – ८० डेसिबल्स.

विमान उडताना – ११० – १२० डेसिबल्स.

ढोबळ मनाने ध्वनी प्रदुषणाचे स्त्रोत हे ३ प्रकारात विभागले
आहेत ते म्हणजे १.घरातील आवाज. २.औद्योगीक क्षेत्रातील आवज. ३.दळणवळण साधनांचे
(वहनांचे) आवाज.

औद्योगीक क्षेत्रातील आवाजांबद्द्ल आता बरीच काळजी घेतली
जाते परंतू घरातील ध्वनी प्रदूषण व वाहनांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत आपण फारच उदासिन
दिसतो.

आता आपण ध्वनी प्रदूषणामुळे होणार्या दुष्परीणामांची महीती
करून घेवूया…

१. मानवी आरोग्यावर होणारे दुष्परीणाम

२. निसर्गावर होणारे

दुष्परीणाम.

मानवी आरोग्यावर होणारे दुष्परीणाम हे तात्पूरत्या स्वरूपचे
नसुन प्रदीर्घ स्वरूपाचे असतात.

सदर दुष्परीणामात मुख्यत्वे, बहिरेपणा, निद्रानाश, चिड्चिड, मानसिक
असंतुलन
, वढता रक्तदाब, अर्धशिशि, ई.
त्रास सुरु होतात. या त्रासांमुळे पुढे जाऊन मधुमेह
, ह्रुदयरोग
यांसारखे गंभिर आजार होऊ शकतात.

ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्या साठी करावयाच्या ऊपाय
योजना….

आपण जर स्वत:वर काही बंधने घतली तर ही समस्या पटकन आटोक्यात
येईल.

घरामधे टि.व्ही, रेडियो लहान आवाजात ठेवा. स्वयंपाक
घरातील मिक्सर
, कुकर सारख्या उपकरणांचा वापर मर्यादित ठेवा. घराच्या
खिडक्या – दारे व्यवस्थित घट्ट बंद होतील याकडे विषेश लक्ष द्या जेणेकरून बाहेरील
आवाजावर प्रतिबंध होईल
, वाहन चालवताना कमीत कमी हॊर्न वाजवा. वाहनाची योग्य
निगा राखून इंजीनचा कमीत कमी आवाज होईल याची दक्षता बाळगा. हल्ली बहुतेक वाहने
, रिव्हर्स
गियर टाकल्यावर मोठा मोठा आवाज करतात
, हा आवाज बहुतेक वेळा अनावश्यक असतो
विशेषत: रात्री अपरात्री सोसायट्यांच्या आवारात जेव्हा वाहन रिव्हर्स घेतात तेव्हा
तर हा आवाज फारच क्लेशकारक वाटतो (गाडी मालकाला सोडुन) त्यामुळे अशावेळेस असे आवाज
बंद करून मग वाहन रिव्हर्स मधे घ्यावे.

अतीरीक्त आवाजा पासून बचाव करण्यासाठी ईअर प्लग (मऊ स्पंजचे
लांबूडक्या आकाराचे बोळे)
, ईअर मफ्स (गोलाकार आकाराचे प्लॆस्टिक-स्पंज चे कान
झाकण्याचे उपकरण) ई. साधनांचा प्रभावीपणे उपयोग करावा.

निसर्गावर होणारे दुष्परीणामतर फारच गंभिर स्वरूपाचे आहेत. बहूतेक प्राणी –
पक्षी हे आपले भक्ष मिळवण्यासाठी तसेच समागमाचे संदेश देण्यासाठी आवाजाची मदत
घेतात. परंतू ह्या वढत्या
ध्वनी प्रदूषणामुळे
निसर्गामधील समतोल ढासळू लागल्याने कितीतरी प्राणी पक्षी नामशेश होण्याचि वेळ आली आहे.

थोडक्यात
सारांश असा की ध्वनी हा आपल्या जीवनातील एक सुंदर घटक आहे पण मानवच्या बेदरकार
स्वभावामुळे हाच घटक ध्वनी प्रदूषणाच्या रुपाने एक अद्रुश्य भस्मासुर बनून आपल्या
दिशेने येत आहे. त्याला वेळीच प्रतीबंध करून आपले जीवन व निसर्गातील अन्य जीव
यांचे रक्षण करूया नहीतर हा भस्मासूर आपल्याला गिळंक्रुत केल्याशिवाय रहणार नाही.

— डॉ मयुरेश जोशी

1 Comment on ध्वनि प्रदुषण…. एक अद्रुश्य भस्मासुर….

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..