हा विशाल समुद्र आहेआणि हे माझे इवलेसे अश्रू.मी या विशाल समुद्राकडे पाहतोआणि कविता लिहीतो.मी या विशाल समुद्राकडे पाहतोआणि प्रेम करतो.मी या विशाल समुद्राकडे पाहतोआणि अदास होत नाही.मी या विशाल समुद्राकडे पाहतोआणि माझ्या अश्रूंना धीर देतो.पण हा विशाल समुद्र माझ्या अश्रूंना कमी लेखतो.हा सरित्पती माझ्या अश्रूंनासरितांप्रमाणे स्वीकारत नाही.मी माझ्या दुखांना आभाळापेक्षा मोठं करीनआणि एक दिवस या विशाल समुद्रालामी माझ्या इवल्याशा अश्रूमध्ये कायमचं कैद करीन.कविता: जयेश मेस्त्री
— जयेश मेस्त्री
Leave a Reply