नवीन लेखन...

दिन:श्चर्या प्रारम्भ…………!!!

प्रात:कालाची सुरुवात

झोपेतून उठताना व अंथरुणातून बाहेर पडताना जमिनीला स्पर्श करून नंतर मुखमार्जन करावे. मुखमार्जन करताना डोळ्यांवर पाण्याने हलकेसे छीटकारे मारावेत आणि डोळे धुवून घ्यावेत. तोंड धुवून घ्यावे. कमीत कमी १ ग्लासभर तांब्याच्या भांड्यातील पाणि प्यावे व ह्या दरम्यान इतर काहीही घेवू नये. इतके झाल्यावर आसनस्थ व्हावे.

तदनंतर आपले दोन्ही करतल आपल्या डोळ्यांसमोर धरण्यापूर्वी एकमेकांवर जोरजोरात चोळावेत व नंतर ते आपल्या दोन्ही डोळ्यांवरून व कपाळावरून एकमेकांच्या विरुध्द बाजूला घेवून जावेत. या कृतीचा लाभ असा होतो की जी उर्जा आपण हात एकमेकांवर घर्षण करून निर्माण करीत असतो ती उर्जा हात डोळ्यांवरून फिरविल्यामुळे डोळ्यांमध्ये तसेच कपाळामध्ये परावर्तीत होवून डोळ्यांना तसेच मस्तकाला एक प्रकारे उर्जावान करण्याचे कार्य केले जाते. यामुळे दृष्टीदोष सुधारण्यास तसेच मेंदूला उत्तेजित करण्यास मदत केली जाते. आपले दोन्ही करतल आपल्या मस्तकावरून फिरविले गेल्यामुळे तेथेही उर्जा स्त्रोत प्राप्त होवून त्याचा परिणाम बुद्धिमत्तेत भर घालण्यासाठी केला जात असतो. इतकेच नव्हे तर आपण आसन मांडी घालून बसलेले असल्यामुळे ते करतल वरुण खाली हातांवरून, पायांवरून फिरवीत न्यावेत, ज्यामुळे संपूर्ण शरीरभर ती उर्जा पाठविली गेल्यामुळे शरीरही ताजे तावाने होण्यास मदतच होते.

अशाप्रकारे आपल्या दिनाचा प्रारंभ झाल्यावर, आपले दोन्ही करतल आपल्या डोळ्यांसमोर धरून पुढील श्लोक म्हणण्यात यावा…..

कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले स्थितो ब्रह्म:, प्रभाते कर दर्शनम्

(तळहाताच्या अग्रांवर लक्ष्मी देवीचा वास असतो, तर तळहाताच्या मध्यभागी देवी सरस्वती वसत असते. तळहाताच्या मुळाशी ब्रह्मदेवाचा वास असून अशाप्रकारे तळहात डोळ्यासमोर धरून सकाळी उठल्याबरोबर सर्वस्व देव देवतांचे स्मरण घडते व त्यांचे आशीर्वादही प्राप्त होत असतात.)

हा श्लोक म्हटल्यावर उठण्यापूर्वी आपण ज्या भूमीवर निद्रिस्त झालेले असतो, ज्या

भूमीवर दिवसभर फिरत असतो, बागडत असतो, त्या भूमीला आपल्या दोन्ही हातांनी स्पर्श करून व त्या भू मातेचे स्मरण करून, भू मातेला विनन्तिपूर्वक आळवून भू मातेकडे क्षमायाचना करून, भू मातेला म्हणावे –

“हे, भू माते ! मी आपल्याला जो काही चरणस्पर्श करीत आहे व त्यामुळे जे काही कष्ट आपणाला होत आहेत, त्याबद्दल मी आपला क्षमाप्रार्थी आहे, मला पामराला क्षमा कर आणि माझ्या ह्यापुढील कर्तव्यात यश दे.”

तदनंतर खालील श्लोकाचे उच्चारण करण्यात यावे……..

समुद्र वसने देवी, पर्वस्तन मंडीते, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम्, पादस्पर्शम् क्षमस्व मे I I

प्रात:काली उठल्यानंतर महत्वाचा असा हा कार्यक्रम आटोपल्यावर प्रत्येकाने आपल्या माता-पित्यांचे (हयात असल्यास प्रत्यक्ष किंवा नसल्यास त्यांच्या छब्यांचे) दर्शन घेणे अतिउत्तम. माता-पित्यांचे दर्शन झाल्यावर आपला प्रात:र्विधीचा कार्यक्रम आटोपून प्राणायाम, योगिक कसरतींना प्रारंभ करावयाचा असतो.

कसरतींना व प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथमत: तांब्याच्या भांड्यातील अथवा इतर भांड्यातील कमीत कमी एक मोठे ग्लासभर पाणि पिणे गरजेचे असते. (ह्या बाबतचा उल्लेख वर आलेलाच आहे.) साध्या भांड्यातील पाणि पितांना थंडीच्या मोसमामध्ये ते कोमट किंवा गरम करून पिणे हितकारक असते. इतर मोसमातून ते थंड प्यायले तरी चालते. परंतू ज्यांची कफ प्रकृत्ती असेल, त्यांनी ते कोमट किंवा गरम करून पिणेच चांगले.

प्राणायामाने शरीरातील बहुतेककरून सारे दोष दूर होत असतात, तर धारणेने मानवी मनातील सारे दोष दूरवर जात असतात. प्रत्याहारामुळे आसक्तीचा दोष नाहीसा होण्यास मदत होत असते, तर समाधी स्थितीने आत्म्याच्या ऐश्वर्याला झाकोळून टाकणा-या बहुतेक सगळ्यांनाच दोषांचे निरसन होत असते, निराकरण होत असते.

पाणि पिवून झाल्यावर योगिक कसरती करण्यापूर्वी, प्राणायाम करण्यापूर्वी, साधारणत: पाच मिनिटे ओमकार जप करणे अति उत्तम स्थिती होय. यामुळे आपणाला एक प्रकारची योगिक शक्ती प्राप्त होवून, पुढील आयुष्य व दिनक्रम सुखकर होण्यास मदत होत असते. ओमकार जप करताना दीर्घ श्वसन पद्धतीने करणे आवश्यक असते. तसेच मकार ओढण लावून केल्यामुळे आपल्या चित्त शक्तीमध्ये वाढ होवून मनावर नियंत्रण येण्यास मदत होते व हळू हळू आपले मन त्या ओमकार ध्वनिमध्ये रममाण होवू लागते. त्याचा परिणाम समाधी स्थितीकडे जाण्यासाठी होत असतो. त्यामुळे सताचे, भगवंताचे, सद्गुरू माऊलींचे दर्शन होण्यास मदतच होते.

भगवत गीतेनुसार ओम् हे ब्रह्माचे रूप आहे. संपूर्ण जगताच्या शक्तीचा तो स्त्रोत आहे, म्हणजेच ओम् हे भगवंताचे आकारी रूप आहे.

आपण जर कां बारकाईने निरीक्षण केले तर आपल्या हे लक्षात येते की जेवढे म्हणून सिद्ध मंत्र आहेत, त्या सगळ्या मंत्रांची सुरुवात ही ओम् नेच होत असते. म्हणूनच सगळ्या मंत्रांचे मूळ हे ओम् आहे. ओम् असल्याशिवाय कोणताही मंत्र सिद्ध होत नाही. सगळ्या मंत्रांची सुरुवात ही ओम् आणि त्यांचा शेवटही ओम् नेच होत असतो. ओम् हा बीजमंत्र आहे.

मंत्र म्हणजे तरी काय? तर आपल्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, ‘मंत्र’ म्हणजे मन त्या त्रयीत लय करून जो शब्दोच्चार केला जातो, तोच मंत्र होय. (याचाच अर्थ, मन + त्र म्हणजे तीन ज्ञानेंद्रिये अर्थात नाक, कान आणि डोळे म्हणजेच त्रिकुटी एका ठिकाणी एकाग्र होत असते, तेव्हाच मुखातून जो प्रणव ओम् सहित बाहेर पडतो किंवा ज्याचे उच्चारण केले जाते तोच हा मंत्र होय.)

“मंत्र” ही एक विशिष्ट प्रकारे केलेली शब्दांची रचना व उच्चारण होय. यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि प्राणीमात्रांवर त्यांचा आणि त्यांच्यापासून निर्माण होणा-या लहरींचा परिणाम होत असतो. त्यासाठी हे मंत्र पुन: पुन्हा जपावयाचे असतात. यामुळे दिसून येणारे परिणाम हे अलौकिक असे विलक्षण असतात. पातन्जलिनी योगशास्त्र निर्माण केले, त्याला आज जवळ

जवळ २४०० वर्षे होवून गेली. (ख्रीस्तापूर्वी ४०० वर्षे) त्यांनी संस्कृत भाषेतील योग सुत्रांमधून ओम्कारांची माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेल्या योग अभ्यासामध्ये ओम्कारांचे ताबडतोब दिसून येणारे आणि प्रत्यक्ष असणारे महत्व विशद केलेले आहे. पातन्जलिनी हे दाखवून दिले की ओम् चा प्रत्यक्ष आकार आणि त्याचे उच्चारण यामध्ये किती साध्यर्म आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या ध्यान योगामध्ये ओमकार जपाचा समावेश केलेला दिसून येतो.

आपण जार का बारकाईने व लक्षपूर्वक पाहिले तर आपल्या हेही लक्षात येईल की ओम् हा शब्द तीन अक्षरांनी तयार झालेला आहे. ती तीन अक्षरे म्हणजे अ, ऊ, व म. हे तीन शब्द जेव्हा एकत्रित होतात त्यावेळेस त्यामधून निघणारा ध्वनी हा ओम् असतो.

ओम् हा आकारी असून, तो आपल्या डोळ्यांना दिसतो, तसेच तो कानांनी ऐकता देखील येतो. असा हा ओम् कार ध्वनी आपण तोंडानी उच्चारू देखील शकतो. याचाच अर्थ असा की आपण आपली ही तीनही इंद्रिये ओम् कार जप करण्यासाठी एकत्रित आणीत असतो व त्यामुळे आपण आपले मन या त्रयीत (तीन इंद्रियांमध्ये) एकत्रित केल्यामुळे, एकलय करू शकतो आणि म्हणूनच आपण आपले मन अशाप्रकारे ध्यान धारणा करून समाधी स्थितीपर्यंत नेवू शकतो. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस पुन: पुन्हा पद्धतशिररित्या ओम् कार जप करीत असतो, त्यावेळेस त्यामधून बाहेर पडणा-या तरंगांनी आपले मन शांत व स्थिर होवून समाधी स्थितीत जात असते.

ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम :

१)मानवी मनाची शुद्धता करणे.

२)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.

३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.

४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे.

५)ओम् कर जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होवून, ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते.

ओम् कर जप :

ओ SSSSSS म् ………………..ओ SSSSSS म्………………ओ SSSSSSS म्……………..

— मयुर तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..