नवीन लेखन...

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक केरसी लॉर्ड

 

‘दम मारो दम’, ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ अशा सदाबहार गीतांमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक केरसी लॉर्ड यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३५ रोजी झाला.
केरसी लॉर्ड. हिंदी चित्रपटसंगीताला सदाबहार सुरांचे चैतन्य बहाल करून अजरामर करणारे एक मनस्वी व्यक्तिमत्त्व. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक मा. कॉवस लॉर्ड हे मा.केरसी लॉर्ड यांचे वडील. “कावस लॉर्ड” हे ‘कावस काका’ म्हणून ओळखले जात. अगदी पहिला बोलपट ‘आलम आरा’पासून त्यांनी चित्रपटसृष्टीत कामं केली. ते तालवाद्यातले” पायोनिअर “मानले जात. घरात आई बानूबाईही पियानिस्ट, आईचं माहेर म्हणजेही संगीतघर. अशा संस्कारात बालपण गेलेल्या केरसीजींनी १४ व्या वर्षी संगीत हेच आपलं सर्वकाही असं ठरवलेलं होतं. ”उत्कृष्ट जॅझ ड्रमर” म्हणून नाव मिळवल्यावर इंडियन -हिदमला अनुसरून केरसींनी आपली अशी प्लेइंग स्टाईल निर्माण केली, जी त्यांची एक वेगळा ‘ड्रमर’ म्हणून खास ओळख ठरली.शास्त्रीय तबल्याचं शिक्षण केरसींनी इनामअली खांसाहेबांकडे घेतलं होतं. मॅलेट इन्स्ट्रमेंट्समध्ये (वूलन किंवा रबरी गट्टनी वाजवलं जाणारं) व्हायब्रोफोन, झायलोफोन सोबत १९६०/६१च्या काळात ग्लॉकेन्स्पायल (ग्लॉक्स) हे वाद्य केरसींनी इंट्रोडय़ुस केलं.”मिस रोडा खोडियाजींकडे” पियानो शिकायला सुरुवात केली होती. “पी. मधुकर “यांच्याकडे हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण घेतलं होतं. त्या पाठोपाठ ज्याच्याविषयी आंतरिक ओढ होती, ते पियानो अॅशकॉर्डियन वाद्य केरसींनी ‘गळय़ाशी’ घेतलं नि सातत्य व अनेक प्रयासांनंतर “निष्णात अॅ कॉर्डिनिस्ट” म्हणून स्वत:चं नाव केलं. सचिनदांच्या संगीतात ‘काला पानी’ सिनेमातल्या ‘अच्छाजी मैं हारी’ तसंच सलीलदांच्या ‘माया’मधल्या ‘तस्वीर तेरी दिल में’,आज सनम मधुर चांदनी में हम इ. गाण्यांतून केरसींचं अॅ कॉर्डियन वाजलंय. मेलडी व -हिदम दोन्हींवर प्रभुत्व असल्यामुळे दोन्ही सेन्सच्या समन्वयातून अॅरकॉर्डियनवर बीट्सच्या अंगाने बेलोच्या (भात्याच्या) टेक्निकने एक्स्प्रेशन्स देण्याचा अनोखा प्रयोग केला. पंचमही एक प्रयोगशील संगीतकार असल्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं व ते अॅपकॉर्डियनचं जॅझ स्टाईलचं जीवंत उदाहरण आहे. ‘आराधना’तलं ‘रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना.’ आणखी एक बर्मनदांच्याच ‘शर्मिली’मधल्या ‘मेघा छाए आधी रात बैरन बन गयी निंदिया’ गाण्यातलं अॅरकॉर्डियन. नौशाद साहेबांबरोबर केरसी लॉर्डनी शेवटपर्यंत काम केलं. त्यात ‘द स्वार्ड ऑफ टिपू सुलतान’ ही मालिकाही केली होती. सुमारे १९६७ मध्ये त्यांच्याकडे राजेंद्रकुमार व वैजयंतीमाला हिरो-हिरोईन असलेला मद्रासचा एक सिनेमा आला होता ‘साथी’! निर्मात्याला नौशादचं संगीत वेगळय़ा रंगाचं हवं होतं. केरसींकडे ‘साथी’ची गाणी अॅारेंजमेंटला आली. त्यांनी पठडीतले काही रूल्स ब्रेक करून ती अॅअरेंज केली. नौशादच्या संगीतात ‘अंदाज’च्या काळानंतर पुन्हा मुकेश आला. हा चेंज तमाम फिल्म संगीत शौकिनांनी स्वीकारला होता. एवढेच नव्हे; तर मद्रासचा ‘इलिया राजा’सारखा मातब्बर संगीतकार ‘साथी’ची अॅीरेंजमेंट एकून केरसींचा फॅन झाला होता.

१९६ ७नंतर कम्पोजर, वादक, अॅूरेंजर म्हणून सगळय़ा बडय़ा संगीतकारांबरोबर काम करता करता आणखी एक लक्षणीय काम केरसी लॉर्ड यांनी केलं आहे ते मदन मोहनसाठी. चेतन आनंदाच्या ‘हंसते जख्म.’ मधलं लताबाईंचं ‘आज सोचा तो आंसू भर आए’ हे गाणं म्हणजे दीदी आणि त्यांच्या मदनभैयाच्या स्वर्गीय स्वरांचा अमृतयोग. केरसींनी त्या गीताला अनुरूप असा आपल्या अॅारेंजमेंटचा हळुवार मोर पीस स्पर्श दिला. त्याच सिनेमाचं दुसरं सुपर हिट गाणं ‘तुम जो मिल गए हो, तो यह लगता है, के जहां मिल गया.’ हे कारमध्ये पिक्चराईझ केलंय. कारची गती आणि अँगल्स, वळणावरचे जर्कस् हे सगळं ग्रुप व्हायोलिन्स पार्ट्समधून, विंड इंस्ट्रूमेंट्स आणि -हिदमचे चेंज ओव्‍‌र्हर्स वापरून केरसींनी सजवलंय नि गाण्याइतकीच अॅधरेंजमेंटचीही उंची राखली होती. ‘देखो कसम से, कसम से’ (तुमसा नहीं देखा), वाद्य- कॅस्टेनट्स. ‘तेरी दुनिया में जिने से’ (हाऊस नं. ४४) वाद्य- अॅहकॉर्डियन, झनक झनक तोरी बाजे पायलिया (मेरे हुजूर), वाद्य- घुंगरू ‘अंधे जहां के अंधे रास्ते’ (पतिता) वाद्य- बोंगो ‘जाने क्या तूने कही’(‘प्यासा)’, वाद्य- वूडब्लॉक्स. ‘दिल लेना खेल है दिलदार का’ (‘जमाने को दिखाना है’) वाद्य- इलेक्ट्रिक ऑर्गन. यात मा. केरसी लॉर्ड यांनी केलेली वाद्यांची मनोहर कलाकुसर दिसते.तसेच जयदेव यांच्या ”हम दोनो ”चित्रपटातील त्यांचे ”लायटर म्युझिक” केवळ अविस्मरणीय होते.

संगीत क्षेत्रात डी.डी. म्हणून संगीतरसिकांना माहीत असलेले डावजेकर हे भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचेही जनक आहे , हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल. केरसी यांनी पहिला सिंथेसायझर भारतात आणला होता. त्याची गोष्ट सांगताना मा केरसी लॉर्ड दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या बद्दल सांगत. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती. अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर? असा विचार केरसी यांच्या मनात आलाला. या विचार येताक्षणीच त्यांच्या समोर पहिले नाव आले ते दत्ता डावजेकरांचे. कारण संगीत आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य या दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान व त्यावर हुकमत असणारे डीडी एकटेच होते. त्यावेळी डीडी गिरगावात तर केरसी लॉर्ड गँट रोडला राहत. मग केरसींनी डीडींना गाठले. काय काय इलेक्ट्रॉनिक सामग्री लागेल, याची दोघांनी यादीच केली. डीडींनी ऑपेरा हाऊसच्या माकेर्टमधून सारी सामग्री आणली. डीडी कामाला लागले आणि सहाव्याच दिवशी भारतातल्या पहिल्या देशी सिंथेसायझरचा जन्म झाला. ही आगळी जन्मकथा सांगून केरसी म्हणाले की डीडींनी बनविलेला सिंथेसायझर घेऊन आम्ही ‘ पंचमदां ‘ कडे गेलो. तो सिंथेसायझर पाहून आरडी खूषच झाले. तो डीडींनी बनवला आहे , म्हटल्यावर तर त्यांनी आदराने मस्तक झुकवले. तेव्हा हे अफलातून वाद्य बनवण्यासाठी डीडींनी केवळ पाचशे रुपये खर्च केला. डीडींचा स्पर्श झालेल्या या वाद्याचा वापर नंतर त्यांनी निदान तीनशे गीतांच्या संगीतात तरी केला. डीडींनी तयार केलेला हा ३६ वर्षांपूवीर्चा सिंथेसायझर आजही केरसी लॉर्ड यांच्या संग्रहात मोलाच्या जागी आहे. आता तर इलेक्ट्रॉनिक वाद्यांची प्रचंड मांदियाळी तयार झाली आहे. त्यांचे आकार , त्यांची कार्यक्षमता आणि सर्वच प्रकारच्या संगीतात अशा वाद्यांचा होणारा वापर हे सारे आमूलाग्र बदलून गेले आहे. तरी एका महान संगीतकाराने तयार केलेले हे पहिलेवहिले वाद्य म्हणजे चित्रपटसंगीताच्या इतिहासातले पिंपळपान आहे. ते पिंपळपान केरसी लॉर्ड आजही जीवापाड जपून आहेत. डावजेकरांनी तयार केलेला हा अस्सल भारतीय सिंथेसायझर मा.केरसी लॉर्ड यांनी मोठ्या प्रेमाने जतन केला आहे. आर.डी बर्मन हे वेस्टर्न संगीताकडे आकर्षित केले हे खरे असले तरी वेस्टर्न संगीताशी आर.डी ची खरी ओळख करून दिली ती केरसी लॉर्ड यांनी. सुट्यात पंचम केरसी लॉर्डकडे जॅझ्झ, लॅटिन अमेरिकन, युरोपिअन आणि मिडल इस्टच्या रेकॉर्ड्स ऐकत असत. केरसी लॉर्ड व त्यांचे बंधू बुर्जोर लॉर्ड यांना ‘ओ. पी. नय्यर पुरस्कार’ मिळाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ ६० टक्के गाण्यात कावस, केरसी व बजी या लॉर्ड फॅमिलीचं योगदान आहे. एकट्या केरसी लॉर्ड यांचीच पंधरा हजार गाणी आहेत. आपल्या परम मित्राचं पंचमचं निधन झाल्यावर केरसीनी २००० साली सिनेव्यवसायातून निवृत्ती पत्करली. केरसी लॉर्ड यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित केले गेले होते. मा.केरसी लॉर्ड यांचे १६ ऑक्टोबर २०१६ निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 3839 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..