डुक्कर आणि दारुडानवीन वर्षाचा पहिला दिवस , माया -बहिणींनी घर-आंगण धुऊन-पुसून साफ-सफाई केली होती. कधी नव्हे ते मुनिसीपालीटीने शहरातला कचरा उचलून, कचरा घरांचीही साफ-सफाई केली होती. एक डुक्कर बिच्रारे सकाळ पासून कुजक-माजक, नासलेल- सडलेल्या अन्नाचा शोधात वणवण फिरत होता. तो भुकेन व्याकूळ झाला होता. रस्त्यात त्याला एक दारुडा भेटला. डुक्कर म्हणाला , दारुडा भाऊ, इथे कुठे कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न मिळेल का? दारुडा म्हणाला , अरे डुक्करा, तुला माहित नाही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आज तुला कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न कुठून मिळणार. आज तर ताजे-ताजे अन्न भेटेल. पुरण-पोळी, श्रीखंड खायला मिळेल. डुक्कर म्हणाला , दारुड्या भाऊ , असेल अन्न मी नाही खात! दारुडा म्हणाला, मग तुला काय पाहिजे? डुक्कर म्हणाला –
कुजक-माजक खाईन, झिंगात येईन.गटरात लोळीन, स्वर्गसुख भोगीन.
दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, त्या साठी वणवण फिरायची काय गरज,ये माझ्या जवळ बस, एक घोट घे, दोघही झिंगात येऊ, गळ्यात- गळे घालून , गटरात लोळू, एक-मेकांना चाटू व स्वर्गसुख भोगू.
पुढे काय जाहले ते सांगायची गरज नाही. दोघ ही दारू पिऊन गटरात पडलेले होते. त्यांच्या अंगावर माश्या भिणभिणत होत्या, दारुड्याच्या घरी त्याची बायको आणि पोर फाटक्या कपड्यात, भुकेले खंगलेले घरात अश्रू गाळीत पडलेले होते, हे सांगायला नकोच. खंर म्हणाल तर दारुडा दुर्गंधयुक्त गटरात नरक यातनाच भोगत होता. त्याचा घर-संसार उध्वस्त झालेला होता.
मायानो-बहिणीनो, बाप्यानो- तरुणानो असलेच स्वर्गसुख भोगायचे असेल तर अवश्य दारू प्या. पृथ्वीवर खरच स्वर्गसुख भोगायचे असेल तर बाबा रामदेव म्हणतात, नवा वर्षाचा नवा संकल्प घ्यावा –
सकाळी उठावे, प्राणायाम करावे,मनाला व शरीराला कसवावे,अभक्ष्य ते सर्व टाळावे,दारू एवजी- फळांचे रस प्यावे,शाकाहारी राहावे.तन प् रसन्न, मन प्रसन्न तर घरात आनंदी-आनंद. जिथे आनंद त्या घरी लक्ष्मी सरस्वती आगमन होणारच. मग घरातच स्वर्ग निर्माण होईल.
HTTP://VIVEKPATAIT.BLOGSPOT.IN/2012/03/BLOG-POST_23.HTML

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…