नवीन लेखन...

डी.एड.साठी पदवी ही पात्रता नकोच

 षिप्रधान असलेल्या भारतात आजही ६० टक्के जनता ग्रामीण भागात राहते आणि ८५ टक्के लोक हे शेती व तस्सम व्यवसायांवर अवलंबून असलेल्या उद्योग – धंद्यावर आपली उपजीविका भागवितात. याबरोबरच विविध संशोधनाच्या आधारे ८५ टक्के भारत हा गरिबीतच पिचत पडल्याचे समोर येत असताना महाराष्ट्रही याला अपवाद नाही. आज महाराष्ट्रात बहुसंख्य जनता ही ग्रामीण भागात राहते व शेतीवर उपजिवीका भागवत असताना शेतकर्‍यांच्या आत्महत्याचा आकडा लाखांवर जातो तेव्हा याचे कारण शोधण्यास कुणी धजत नाही ही मोठी शोकांतिका असतानाच या कृषक समाजाला शिक्षणापासून गोड स्वप्न पडू लागली होती. जेमतेम जीवन जगताना मुलांनी शिकावं मोठं व्हावं व आमच्या वाट्याला जे आलं ते त्यांच्या वाट्याला येऊ नये अशी सर्वच शेतकरी व सामान्य पालकांची भूमिका असल्याने काही अशंी का होईना गरिबांची मुलं शिक्षण घेऊ लागली व पोलिस, शिक्षक तसेच स्पर्धा परीक्षांमध्येही आपला ठसा उमटू लागली होती. यामध्ये शिक्षक होण्याचे प्रमाण मोठे आहे. एकदाची बारावी झाली की, दोन वर्षांचे डी.एड. करायचे आणि नेाकरी लागली की लगेच मांडवात उभे राहायला मोकळे व्हायचे. अशीच सर्वसाधारण व कालसापेक्ष मानसिकता घेवून गरीब घरची मुलं शिक्षक होऊ लागली व घरी शेतावर असणार्‍या पालकांना व बांधवांना आर्थिक मदत होऊ लागल्याने आता कुठेतरी शेतीतही चांगले दिवस येताना दिसत होते.मुलांच्या बाबतीत असे असले तरी मुलींचे जीवन देखील सुधारताना दिसत होते. फार पूर्वीचा काळ नाही मुली शिकतच नव्हत्या असे म्हणण्यापेक्षा बाईने चूल आणि मूल या पलीकडे काही पाहू नये अशी पारंपरिकता मोडित निघून मुलीही शिक्षणाकडे वळून एकदा मास्तरीन झाले की मगच माझं लग्न करा या विचारातून तिचे स्वप्न सहजच साकार होेत असे व योग्य वेळेतच नेाकरी व विवाह होत असल्याने आई-वडिलांना देखील आपल
ता डी मास्तरीन

झाली याचा खूप आनंद व्हायचा. यातूनच सामान्य माणसाच्या सामाजिक, आर्थिक़, सांस्कृतिक जीवनावर सकारात्मक परिणाम होऊन एकदाचे फुले-सावित्रींचे स्वप्न सत्यात उतरत असल्याचे समाधान विचारवंतात दिसून येत होते. पण गेल्या दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्र्यांनी डी.एड.चा अभ्यासक्रम पदवीनंतर असावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि लगेच त्याला हिरवी झेंडी दाखविली गेली.डी.एड. साठी पदवी ही पात्रता ठेवल्यास काय-काय घडण्याची शक्यता आहे यावर वरील बातमीने ग्रामीण महाराष्ट्राच्या घरा-घरात चर्चा होऊ लागली. गरिबांची मुलं कसे तरी शिकत होती. पोटाला चिमटा घेवून जवळ असेल ते किडूक-मिडूक विकून डी.एड. करायची व मास्तर व्हायची. आता मात्र बारावीनंतर तीन वर्षे पदवी करावी लागणार आहे आणि याच्यानंतरही दोन वर्षे डी.एड. करून पुढील तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून केवळ तीन हजारात (या खर्चात फक्त सजीव राहता येते) काम करावे लागणार आहे. एकूणच किमान सहा वर्षे जास्त सांभाळ करण्याची वेळ गरीब कुटुंबावर येणार असून हे ओझे सामान्यांना न झेपणारे आहे. वरील विचार साधारण मुलांच्या बाबतीत करता येईल. मात्र ज्या कुटुंबांनी आपली तायडी मास्तर व्हावी व नंतरच तिचे लग्न करावे असे स्वप्न पाहिले त्यांच्या तर तोेंडचे पाणी पळाले आहे. यातूनच आता तायडीचेही मॅडम होण्याचे स्वप्न विवाह मंडपातच परिवर्तीत होताना दिसेल. केवळ जास्त दिवस मुलीला विवाहाशिवाय ठेवता येत नाही. या मानसिकतेबरोबरच आर्थिक प्रश्‍नही सामान्य पालकांसमोर उभा राहिल्याने आता ग्रामीण भागातील मुलींचे दोर शिक्षणापासून तुटणार की काय असा प्रश्‍न समोर येतो व एकेका खेड्यातून प्रतिवर्षी किमान २०-२२ डि.एड. होणार्‍यामध्ये मुलींचे ४-६ असलेले प्रमाण संपुूष्ठात येण्याची चिन्हे दिसत आहेत.वास्तविक पाहता डी.एड. चे तर सोडाच समग्
शिक्षण व्यवस्थाच कोणत्या थराला पोहोचली आहे याचे चिंतन होण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी दहावी नंतर डी.एड. असायचे त्यांच्या अगोदर आज जे तिसीत असतील त्यांना शिकविणारे मास्तर व हेडमास्तर चौथी किंवा सातवी अशी पात्रता घेवून महाराष्ट्र घडू पाहत होते. पुढे मात्र सातवी, दहावी आणि आता पदवी अशी प्राथमिक शिक्षक होण्यासाठी शैक्षणिक पर्यायाने वयाची पात्रता देखील आपोआप बदलताना दिसते आहे पण प्राथमिक शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांची वये मात्र पूर्वीचीच आहेत मग शासनाचे डी.एड.ची पात्रता पदवी असावी असे धोरण का असावे. यातून काय चांगलेपणा निष्पन्न होणार आहे. जर बारावी पास नंतर डी.एड. करून शिक्षक झाल्याने अध्यापनात काही कसूर राहत असेल तर असा विचार करण्यास हरकत नाही. याऊलट महाराष्ट्राची बहुतेक महाविद्यालये कशी चालतात यावरही नजर टाकणे आवश्यक आहे.आर्थिक स्थिती सामान्य असो की नसो पदवीला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी केवळ परीक्षा फार्म भरण्यासाठी महाविद्यालयात जातात व यानंतर पुन्हा महाविद्यालयाचे तोंड परीक्षांच्या तारखांदरम्यानच पाहतात. मधल्या काही महिन्यांत महाविद्यालयात गेल्यास विद्यार्थी कमी अन् प्राध्यापक व इतर नोकरदारच जास्त दिसून येतात. तेही आपापल्या सोईनूसार बसून विट्टभट्टी टाकण्याचे, गाडी बदल्याचे, प्लॉट घेण्याचे तसेच संस्थेवाल्या साहेबांचे कधी गुणगाण तर कधी राजकीय विषय हाताळताना दिसतात. मग अशा परिस्थितीतला विद्यार्थी कोणत्या मानसिकतेचा असेल तो जर पदवी केवळ परीक्षांना येवूनच पूर्ण करणारा असेल तर तो यानंतर डी.एड. करूनही समर्थपणे अल्पवयातील मुलांसमोर उभा राहील का? वयाच्या पंचवीशीनंतर (ज्या वयात त्याच्या बापाचा व आजोबांचाही संसार पूर्णपणे झाला होता.) तो तीन वर्षे केवळ पोट भरण्यासही पूरणार नाहीत इतक्या कमी मानधनावर काम करे
ल का? करेल तर तो विवाहास पात्र असेल का? त्याचा कौटुंबीक आधार मधल्या काळात तुटला तर त्यास शिक्षणही थांबवावे लागेल मग अशावेळेस सामान्यांचा छळ डी.एड. पदवीनंतर असावे या निर्णयाने होत नाही हे कशावरून म्हणावे?

— श्री.राम मच्छिंद्र गायकवाड उर्फ नेपोलियन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..