डिमेंशिया (विस्मृती) आणि आहार

डिमेंशिया – अवमनस्कता ही एक अशी अवस्था आहे की ज्यात मानसिक क्षमता इतकी कमी झालेली असते की ज्याचा असर आपल्या दैनदिन आयुष्यावर होतो. स्मरणशक्ती कमी होणे, वैचारीक कसब किंवा कौशल्य कमी होणे ह्या सारखी लक्षणे डिमेंशिया मध्ये आढळतात. ही लक्षणे एवढी जास्त प्रमाणात असतात की त्या व्यक्तीला त्याचे रोजचे व्यवहार ही नीट करता येत नाहीत. विस्मरण किंवा विस्मृती होणे हे त्याचेच उदाहरण आहे. डिमेंशिया मध्ये अल्झायमर नावाचा रोग जास्त प्रमाणात आढळतो. अल्झायमर मध्ये मेंदूतील बिघाडामुळे स्मृती, बोलणे, हलचाल करणे इत्यादी क्रिया हळूहळू मंदावत जातात किंवा बंद पडतात. ह्या रोगाचे प्रमाण वृद्ध व्यक्ती मधे जास्त प्रमाणात आढळते.

स्मरण / स्मृती आणि आहाराचा काही संबंध आहे का?
नक्कीच आहार आणि स्मृति ही एकमेकांशी निगडीत आहेत. एखाद्या व्यक्तीचा आहार अपूर्ण / अपुरा असेल तर त्याचा त्या व्यक्तीच्या स्मृतीवर परिणाम होतो असे प्रयोग दाखवतात. ह्या विस्मृयीचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला अल्झायमर होण्याची शक्यता बळावते. आहार एक असा सहज बदल करता येण्यासारखा घटक आहे की ज्याच्या बदलामुळे विस्मृती किंवा विस्मरण होणे टाळता येऊ शकते किंवा तो उशीरा होण्यास उपयुक्त ठरू शकतो. गेल्या काही वर्षात आहार पद्धती, आहार, संज्ञानीक र्हास ( cognitive decline) आणि विस्मरण ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ह्या विषयावर बरेच प्रयोग होताना आढळत आहेत,

Ondine Van de Rest et al ह्यांनी “आहार पद्धती cognitive decline आणि विस्मरण” ह्या विषयी सर्वागीण आढावा (systematic review) केला आहे. त्यांनी मे 2014 पर्यंत cognitive decline आणि विस्मरण ह्या विषयावर केलेल्या प्रयोगांचा ह्या सर्वांगीण आढाव्यात समावेश केला आहे.

6 पैकी 4 छेदीक विशलेषण (cross sectional) शोध प्रबंधात, 12 पैकी 6 अनुदैर्घ्य ( longitudinal) शोध प्रबंध, 1 चाचणी प्रयोग आणि 3 meta analysis ह्यांचा समावेश केला. पहाणी अंती असे आढळले की Mediterranean आहार पद्धतीचे सेवन केलेल्या व्यक्तींमधे cognitive decline, डिमेंशिया, किंवा अल्झायमर चे प्रमाण कमी आढळले. Mediterranean आहार पद्धती ही एक अधूनिक आहार पद्धती असून ती Gŕeece, Southend Italy, आणि Spain ह्या देशात पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या आहार पद्धती वर आधारित आहे. प्रयोगात असे आढळले आहे कि Mediterranean आहाराच्या सेवनाने आप्णा निरोगी राहू शकतो.

6 cross sectional शोध प्रबंधात आणि 8 पैकी 6 longitudinal शोध प्रबंधात अनुभव पूर्व (priori) वाढते अनुभवोत्तर (posteriori) प्रयोगात आरोग्यदायी आहार पद्धतीच्या (healthy diet) सेवनामुळे cognitive decline आणि /किंवा डिमेंशिया ची जोखीम कमी झालेली आढळली. अनुभव पूर्व ह्यात आरोग्यदायी आहार पद्धतीचा इंडेक्स (उल्लेख सूची, हेल्दी डाइट इंडीकेटर आणि National Nutrition Sante’ guideline score कार्यक्रम व अनुभवोत्तर ह्यात factor analysis, cluster analysis, आणि reduce rank regression गोष्टीचा समावेश केला होता. ह्या प्रयोगाचा निश्कर्ष ” Applied in Nutrition an international review journal” March 2015: vol 6, 154 -1 68, 201 ह्यात प्रसिद्ध करण्यात आला. त्या मध्ये असे ही नमूद करण्यात आले की cognitive decline टाळण्यास किंवा तो विलंबाने कसा होईल ह्या बद्दलच्या तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी अशा प्रकारचे जास्तीतजास्त प्रयोग होणे गरजेचे आहे

brain-foodमेंदू योग्य प्रकारे कार्यरत राहण्यास त्याला उर्जा लागते. चांगल्या प्रकारची फॅट, फळे, भाज्या, लिन प्रथिने, आणि योग्य प्रमाणात जीवनसत्व व खनिज ह्यांचे सेवन स्मृति, स्मरण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. एखाद्या पदार्थाचे सेवन कमी जास्त केल्यास त्याचा मेंदू च्या कार्यावर तर परिणाम होतोच पण स्मरणशक्ती वर ही त्याचा परिणाम होताना दिसतो. काही पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास स्मरण वाढते, तर काहीं पदार्थांच्या सेवनाने अल्झायमर चा धोका वाढतो असे प्रयोगात आढळले आहे. काही पदार्थांच्या सेवनाने शरीरात हानीकारक घटक तयार होतात ज्यामुळे शरिरा अंतर्गत सूज वाढीस लागते. ह्या संदर्भात आपण आधीच्या लेखात समजावून घेतले आहेच. ही अंतर्गत सूज मेंदूत प्लाक निर्माण करतात आणि त्याचा परिणाम म्हणून cognitive function मध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते.

food-habitsविस्मरण निर्माण करणारे पदार्थ – प्रक्रिया केलेले चीज (processed cheese), प्रक्रिया केलेले मटण (processed meat), beer, सफेद रंगाचे पदार्थ जसे की पास्ता, साखर, सफेद तांदूळ, सफेद ब्रेड, पापकर्म इत्यादि

स्मरण वृद्धिंगत / वाढवणारे पदार्थ – पालेभाज्या, सॅलमन नावाचा मासा, तसेच थंड पाण्यातील मासे, (cold water fish) बेरी फळ जसे की करवंद, गडद सालीची फळ, काॅफी, चाॅकलेट, एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, आणि कोल्ड व्हर्जिन खोबरेल तेल

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..