जीवनदायी सलाइनची बाटली

वरझडी हे औरंगाबाद तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटसं गाव या गावात माणिकराव पठारे यांची दोन एकर जमीन आहे. टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाज्या पिकवणं हा त्यांचा व्यवसाय. शेतात दोन विहीरी. दोन्ही विहिरींतील पाणी भाजीच्या मळ्याला पुरवणं हा नेहमीचा कार्यक्रम. रुसलेल्या वरुण राजामुळे या कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला. २०१२ साली पाऊस आला कधी आणि गेला कधी कळलंच नाही. नद्या, ओढे, विहिरी, शेतं कुठेच पाणी साठलं नाही पाण्याशिवाय भाज्या पिकवणं कठीण झाडं.माणिकरावांनी टोमॅटो, वांगी ही कमी पाणी लागणारी दोनच पिकं घेण्याचं ठरवलं. काही दिवसांनी टोमॅटोला सुध्दा शेतातून बाहेर काढावं लागलं. वांगी ही एकमेव भाजी पिकवण्याची तयारी त्यांनी केली. असक्तपणा आल्यावर किंवा आजारपणात सलाइन लावण्यात येत. सलाइन लावल्यामुळे तब्येतीत सुधारणा होते. माणिकरावांनी अशक्त झालेल्या पिकाला सलाइनच्या बाटलीतून पाणी देण्याचं ठरवलं.

माणिकरावांनी गावापासून १५ किलोमीटर लांब असलेल्या करमाड येथे राहणार्‍या डॉक्टरांकडून सलाईनच्या बाटल्या अडकवण्यासाठी वांग्याच्या रोपाजवळ एक काठी रोवली. बाटलीची नळी जमिनीत साधारण पाच ते सहा इंचपर्यत आत सोडली. अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीतून नळीद्वारे हळूहळू पाणी वांग्याच्या रोपापर्यत पोहोचेल अशी सोय केली. दर दोन दिवसांनी अर्धा लिटर पाणी वांग्याच्या रोपाला मिळू लागलं अशक्त झालेल्या वांग्याच्या रोपांची तब्येत एकदम सुधारली. वांग्याचं उत्पादन दुपटीहून अधिक वाढलं. माणिकराव स्वत:च्या प्रयोगावर खूश झाले ३० हजार रुपये निव्वळ नफा झाला. एका छोट्याशा प्रयोगातून मोठं यश मिळालं.
अशाच प्रकारे स्वत:च्या व्यवसायावर निष्ठा व प्रेम कष्ट करण्याची तयारी असेल, स्वत:च्या शेतीचे प्रश्न ओळखून उपाय शोधण्याची जिद्द असेल, तर आधुनिक महाराष्ट्रात शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.

— सुचेता भिडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…