नवीन लेखन...

जाहिरातींचे मायाजाल

जो खोटे बोलतो तो सर्वात मोठ्याने ओरडून सांगतो, हा मानसिकतेचा नियम आहे. चोवीस तास टीव्ही व रेडिओ वर साबण, तेल, सुंदर दिसण्याची क्रीम, शीतपेय, टूथपेस्ट, यांच्या हास्यास्पद जाहिराती आपल्याला दाखवतात यातून आम्ही काय बोध घ्यावा हेच समजत नाही.

आजकाल हिंदी चित्रपटातील हिरो शितपेयातील जाहिरातीत सुपरमॅन सुद्धा न करू शकणारे स्टंट करून दाखवतात व शेवटी शीतपेय पिताना दाखवतात, आहे कि नाही कमाल? आम्ही सामान्य लोक असली पेय पिऊन हे उद्योग खरच करू शकणार आहोत का? या पेयात अदभूत शक्ती देणारी रसायने असतात का? यातील एक तरी पेय शरीराला व पचनसंस्थेला मदत करणारे आहे का? हि आमची फसवणूक नाही का? बरं यातून सरकार कराच्या रुपात गडगंज संपत्ती मिळवते असेही नाही. यातील दोन कंपन्या परदेशी आहेत, ज्या आपल्याला मूर्ख बनवतात. कधी कधी वाटते, कदाचित आपण मूर्ख आहोच, हे लोक आपल्याला ते सिद्ध करून देतात इतकेच. तसे नसते तर ह्या कंपन्या असली कुचकामी पेय विकत आपल्या देशात कॅन्सर सारख्या फ़ोफ़ावल्या नसत्या.

असेच उदाहरण साबणाचे व क्रीमचे आहे, मी जेव्हापासून समजायला लागले आहे, तेव्हापासून गोरेपणाच्या साबणाच्या व क्रीमच्या जाहिराती पाहतो आहे, हे जर खरे असते तर भारत सोडाच, आफ्रिका सुद्धा गोरगोमट्यांचा खंड दिसला असता असे नाही का वाटत? बरं या साबणाने अंग स्वच्छ होते असेही नाही, हा हि खोटा आभास आहे. मुळात आपल्या शरीरावर असणारे जंतू जेव्हा मेलेल्या पेशींवर ताव मारतात, त्यातून दर्प किव्वा वास येतो, या साठी कोणतेच साबण मदत करत नाही. जर अंग खरबरीत उटणे वापरून घासले तर मेलेल्या पेशी गळून जातात, व अंग स्वच्छ होते, मग हि महागडी साबणे घेण्याची गरज काय? आजकाल या विदेशी कंपन्यांना तोडीसतोड, आमचे देशी बाबा सुद्धा असली साबणे विकायला अग्रेसर झाले आहेत. यात फरक इतकाच, पैसा परदेशात जाणार नाही, पण अंग स्वच्छ होण्याचे काय?

दात साफ करण्यासाठी नामांकित कंपनीने पूर्वी आम्हाला सांगितले कि कोळसा, मीठ याने दात खराब होतात, तीच कंपनी, जाहिरातीत, क्या आपके टूथपेस्ट में नमक है, असे म्हणणारी ललना धाडकन एका घराचा दरवाजा उघडून येऊन विचारते, असे दाखवतात, असे वागणे मुळात शोभते का? हाच माझा खरा मुद्दा आहे. असो

काही दिवसापूर्वी मला दाढ दुखीमुळे डॉक्टरांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला, त्यांनी स्पष्ट सांगितले, आक्रोड, बदाम दाताने फोडण्याच्या कला तुम्ही चुकूनसुद्धा दाखवू नका, जाहिरातीत दाखवतात ते अतिशयोक्ती असते. असे केल्याने दात तुटू शकतो, किव्वा हिरड्यांना गंभीर इजा होऊ शकते. जगातला एकही दातांचा डॉक्टर असले उद्योग करा याला संमती देणार नाही. केवळ त्यांच्या भूलथापांना आपण बळी पडावे हाच एकमेव हेतू या जाहिरातीतून असतो.

सिनेमाला जसा सेन्सॉर बोर्ड असतो तसा या जाहिरातीसाठी नसतो का????? यांना पण जाहिरातीत स्टार( * ) करून अटी व शर्ते लागू किव्वा, जाहिरातीत दाखवलेले खरे नाही, असल्यास निव्वळ योगायोग समजावा… सारखी ओळ बंधन कारक करायला हवी.

रोल्स रॉईस ने कधीही जाहिरात केली नाही. ज्यांच्या वस्तू उत्कृष्ठ असतात त्यांना अश्या जाहिराती करायची गरज नसतेच. लोकांना माहित होण्यासाठी, नवीन वस्तू पहिल्यांदाच बाजारात विकायला आणली असेल तर सुरवातीला ठीक आहे, पण एकदा नाव मिळवल्यावर काहीच गरज नसते. व्यर्थ पैसा जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा सर्वाना परवडेल अश्या रास्त किमतीत वस्तू विका.

ग्राहक राजा जागा हो,

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..