नवीन लेखन...

जाता गणपतीच्या गावां…

p-4482-inlineतुमच्या-आमच्या आवडत्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येकाची आपापल्यापरीने तयारी सुरु केली आहे. मीही तयारी केली ती आमच्या महान्यूजच्या वाचकांसाठी गणपतीच्या गावाची गोष्ट सांगायची !

हे गणपतीचे गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण होय. मुंबईपासून अंदाजे ९० किलोमीटर व रायगड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या या शहराचा उल्लेख करताच आपल्या डोळयासमोर येतात त्या गणपतीच्या सुबक मुर्त्या. त्यांच्या नाविन्यपूर्ण मांडणीमुळे पुणे- मुंबईपासून उर्वरित महाराष्ट्रातही इथल्या मुर्तींना प्रचंड मागणी असते.

येथील गणपती मुर्तीकाम व्यवसायाची परंपरा सांगतांना येथील सुप्रसिध्द मुर्तीकार श्रीकांत वामन देवधर यांनी सांगितलेली माहिती त्यांच्याच शब्दात…

“११५ वर्षाची परंपरा असणारा हा उद्योग पुर्वी लहान प्रमाणात घरगुती गरजेपुरता मर्यादित होता. पेण व आजुबाजुच्या परिसरातील नागरीक अंगणातील माती घेऊन घरी बसवण्यासाठी गणेशमुर्ती तयार करत. मात्र मुंबई स्थित शिल्पकार बांदिवडेकर घराणे व बाबु चितारी यांच्या घराण्याने या परंपरेला व्यवसायिक रुप दिले. १८८० ते १९५० या कालावधीत पेणमधील अनेकजण त्यांच्याबरोबर या उद्योगात काम करु लागलेत व नंतर कामगारांनी स्वत:हून वेगळा मुर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. आता या व्यवसायिकांची चौथी पीढी यात काम करीत आहे. या व्यावसायिकांच्या दुसर्‍या पिढीत देवधरांच्या आजोबांनी भिकु टिकली यांनी व्यवसायाची सुरुवात केली. १९५० नंतर दळणवळणाची साधने वाढल्यानंतर वामनराव व राजाभाऊ देवधर यांनी गणेश मुर्त्या तयार करण्याचे कारखाने सुरु केले. एक लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात ८ ते १० हजार नागरीक ४०० ते ५०० कारखान्यातून कार्यरत आहेत. १९७० ते ८० पासुन प्लॅस्टर ऑफ पॉरिसचा वापर या मुर्तीकामामध्ये होऊ लागल्याने मुर्ती बनविणे तुलनेने सोपे ठरु लागले आहे. ”

सद्यस्थितीत मोठय़ा प्रमाणावर गणपती बसविण्याचे प्रमाण वाढल्याने येथील मुर्तींना अधिक मागणी असली तरी गणेश मुर्ती व्यवसायिकांनाही काही अडचणींना  सामोरे जावे लागत आहे. सेझ प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना इतर उद्योगात मोठय़ा रकमेच्या नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने स्थानिक तरुण या व्यवसायाकडे लवकर वळत नाही. त्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवतो. गणपती उत्सव हा विशिष्ट कालावधीपुरता असल्याने उर्वरीत काळात गणेशमुर्ती घडवून त्या सांभाळून ठेवणे ही एक मोठी जबाबदारी असते.

या सगळ्यांवर मात करण्यासाठी येथील स्थानिक व्यवसायिकांनी “गणेश कस्टर्ड डेव्हलपमेंट” या नावाने एक संघटना उभारली आहे. यात गणेश मुर्ती कारखान्यांसाठी MIDC त स्वतंत्र जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मदतीला महाराष्ट्र शासनाचे जिल्हा उद्योग केंद्र असुन ते मुर्तीकारांच्या गरजेनुसार त्यांना व्यवसाय प्रशिक्षण व कर्जाची उपलब्धताही करुन देत असते. पेण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे यांच्या कल्पनेतून एक छानसे गणपती संग्रहालयही शहरात उभारण्यात आले असुन क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही त्याची प्रशंसा केली आहे.

माता पार्वतीने गणपती घडविण्याची आख्यायिका आपण सर्वजण ऐकतो. मात्र या गावाला गेल्यावर मुर्ती घडवतांना मुर्तीकारांच्या चेहर्‍यावरील भावही मला तितकेच वात्सल्यतेने भरलेले दिसले.

— किरण शिसोदे
(`महान्यूज’ च्या सौजन्याने)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..