नवीन लेखन...

छातीचा एक्स-रे

आधुनिक विज्ञानात प्रतिमाशास्त्राने कितीही प्रगती केली तरी क्ष किरणांचे महत्व अजिबात कमी होणार नाही. कमी खर्चात भरपूर व सूक्ष्म माहिती देण्यात क्ष किरण शास्त्र समर्थ आहे आणि याचेच उत्तम उदाहरण म्हणजे छातीचा एक्स-रे. क्षुल्लक तक्रारीतही डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात व यात डॉक्टरांची काहीही चूक नाही कारण छातीचा एक्स-रे म्हणजे रुग्णाच्या आरोग्याची कुंडलीच आहे. यात फुफ्फुसांची सखोल माहिती व प्रदुषणामुळे झालेले छातीचे विकार दिसून येतात. तसेच अजूनही वैद्यकशास्त्राला आव्हान ठरलेला क्षयरोग म्हणजे टी.बी. असेल तर तोही यात स्पष्टपणे दिसून येतो. फुफ्फुसात होणारे न्युमोनिया, प्लुरसी (पाणी भरणे) व अजून कित्येक विकार हा साधा एक्स रे सांगू शकतो.

रुग्णांनीदेखील हा एक्स-रे काढण्याबद्दल दिरंगाई किंवा दुर्लक्ष करणे योग्य नव्हे. हा एक्स-रे काढायला रुग्णाला फक्त एक्स-रे ट्यूबसमोर केवळ अर्धा मिनिट उभे राहावे लागते व काही सेकंदांसाठी श्वास आत धरुन ठेवावा लागतो. या एक्स-रे साठी उपाशी जाण्याची गरज नाही.

हा एक्स-रे आपल्याला बर्‍याच त्रासांतून वाचवू शकतो. उदा. एका रुग्णाने छातीचा एक्स-रे काढून घेतल्यामुळे त्याचे फुफ्फुस काढून टाकण्याची शस्त्रक्रिया वाचवली आहे. या रुग्णाचा एम.आर.आय. केल्यावर झाले कॅन्सरचे निदान. पण याच पाच वर्षांपूर्वीच्या एक्स-रे मध्ये व नव्या एक्स-रे मध्ये काहीच फरक नसल्याने नवीन रोग झालेला नाही हा निष्कर्ष निघाला व सर्जरी रद्द झाली. पुढे तपास करुन हे सिद्ध झाले की ते निव्वळ दाबले गेलेले फुफ्फुस होते.

छातीचा एक्स-रे फुफ्फुसांबरोबरच हृदयाचीही माहिती देतो तर लहान मुलांमध्ये रिकेट्स व स्कर्व्ही (जीवनसत्व सी व डी चा अभाव) यांच्याबद्दलही सांगतो. क्वचितच डॉक्टर रुग्णाला छातीचा तिरकस कोनातून अजून एक एक्स-रे काढायला सांगू शकतात. ९९ टक्के छातीच्या रोगांचे निदान साध्या एक्स-रे तच होतात.

आपल्याकडे हळूहळू डिजिटल एक्स-रे ही कॉम्प्युटर एक्स-रे पद्धती येऊ लागली आहे. पण हे यंत्र महाग असल्याने एक्स-रे महागडा आहे व निदानात तसा फारसा फरकही पडत नाही. त्यामुळे याच एक्स-रे साठी अडुन बसु नये.
Advt1Right बर्‍याच वेळा छातीचा फोटो नॉर्मल येऊनही टी.बी. चे निदान केले जाते. कारण टी.बी. फुफ्फुसांव्यतिरिक्त दुसर्‍या कुठेही होऊ शकतो हे लक्षात घ्यावे.

छातीचा एक्स-रे गर्भवती महिलेने काढणेही सुरक्षित आहे कारण तीन महिन्यापर्यंत अशा महिलांना लेड शिल्ड दिले जाते. गर्भवती महिलांनी एक्स-रे काढायला जाताना क्लिनिकमध्ये याबाबत पूर्वसूचना द्यावी. तीन महिने उलटल्यावर गर्भावर काहीही गंभीर परिणाम होत नाही व पाचसहा महिन्यांनंतर लेड शिल्डचीही गरज भासत नाही. कारण एक्स-रे चा डोस सौम्य असतो.

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

1 Comment on छातीचा एक्स-रे

  1. एक्सरे ची मराठीत पुस्तके मिळतील का लेख खुपचं छान आहे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..