चारोळ्या …………!!! (भाग २)

चारोळ्या …………!!!

(भाग २)

१) सध्या आहे दोन बाबांची चलती,

एक आहे संजूबाबा,

तर दुसरा आहे राहुलबाबा,

तीस-या रामदेव बाबांची

करताहेत मात्र गच्छन्ति….!!!

२) तुफान पडतो आहे पाऊस धुवांधार,

पावसामध्ये धुवून निघतो आहे निसर्ग आरपार,

असा झाला आहे निसर्गाचा कहर,

तरी सर्वत्र दिसून येतो आहे बहर हिरवागार….!!!

३) राहुल तेरा क्या कहना,

मा के बिना तू क्या रहना,

मा है इसीलिये तेरी है चलती,

वरना हो जायेगी तेरी बंद बोलती….!!!

४) मिशन मेक ओवर म्हणून केले

सद् भावना उपोषण,

उपोषणाला बसल्यावर थांबेल

का सामान्य माणसांचे कुपोषण……!!!

५) न्यायासाठी दिला लढा ११ वर्षांचा,

११ वर्षानंतर पदरी पडले काय?

तर हाय कोर्टाचा निर्णय

आला नोकरीत घेण्याचा…..!!!

(वृत्त पत्रात्रील बेस्ट कन्डक्टरची बडतर्फी यावर हाय कोर्टाने दिलेल्या निकालावर देण्यात आलेल्या बातमीवर आधारित वरील चारोळी)

६) अण्णांच्या उपोषणाने मिळाली होती धार,

तर मोदींच्या उपोषणाने झाले त्यांचे विरोधी पक्ष बेजार,

एक म्हणे उपोषणामुळे कलंक धुतला नाही जाणार,

तर दुसरा म्हणे नाही त्यांना नैतिक अधिकार,

तिसरा म्हणे हा तर नाटय अवतार,

खरे कोणाचे, खोटे कोणाचे,

ह्यामध्ये सामान्य जणांचे थकले आहेत विचार…..!!!

— मयुर तोंडवळकर

(+९१९८६९७०४८८२)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…