चण्याच्या डाळीची सांजणी

साहित्य –

२ वाट्या चण्याची डाळ
१ वाटी नारळाचं दूध
अंदाजाप्रमाणे गुळ (पाऊण वाटी)
अर्धी वाटी साखर
वेलची, जायफळ पूड, केशर, बदाम पिस्ता (आवडीप्रमाणे सुकामेवा)
चवीनुसार मीठ, आवडीनुसार इसेंस, २ चमचे साजुक तूप

कृती –

चण्याची डाळ कृती करण्यापूर्वी चार तास आधी भिजत घालावी व नंतर ती चाळणीत उपसून १० ते १५ मिनिटे ठेवावी. नंतर मिक्सरमधून सरसरीत बारीक करुन घ्यावी. (गुळगुळीत नको). नंतर त्यामध्ये नारळाचे दूध घालावे, चवी पुरते मीठ घालावे. (अर्धा चमचा मीठ). त्यामध्ये केशर, वेलची, जायफळ पावडर गुळ, साखर घालून चांगले ढवळावे. दोन चमचे साजूक तुप घालावे. आवडत असल्यास इसेन्स घालावा. पळीतून पडेल इथपर्यंत पातळ करावे. गरज भासल्यास आणखी थोडेसे नारळाचे किंवा साधे दूध घालावे.

सांजणी बनवायच्या थाळीमध्ये अगोदर बदाम, पिस्ते टाकावे. त्यावर मिश्रण टाकावे. साधारण जाडसर थर करुन घ्यावा. (खूप जाड नको). वर परत बदाम, पिस्ते, केशर घालावे व त्याला उकड द्यावी. अंदाजे १० ते १५ मिनिटे गॅसवर ठेवावे. नंतर गॅस बंद करुन उकडीचे झाकण काढून ठेवावे. थाळी बाहेर काढून गार झाल्यावर सुरीने काप करावे व डिश मध्ये उलटे करुन काढून ठेवावे.Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…