गायन वादन करणारा हत्ती

अकबर बादशाहच्या पदरी असलेल्या बिरबलाच्या चतुरपणांच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच ही एक कथा.

अकबराच्या दरबारात एकदा एका गवयाचे गाणे झाले. ते गाणे अकबराला इतके आवडले, की त्याने त्या गाण्याला एक हत्तीच भेट दिला. ती भेट पाहून गवई आनंदी व्हायच्या ऐवजी दुःखीच झाला. कारण आधीच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ नीट चालत नव्हता. त्यात पुन्हा एवढ्या मोठ्या हत्तीला पोसणे त्याच्या दृष्टीने फारच अवघड होते. परंतु खुद्द बादशाहने हत्ती भेट दिल्यामुळे तो हत्ती नाकारू शकत नव्हता. शेवटी त्याने आपली अडचण बिरबलाला सांगितली. .बिरबलाने लगेच त्या गवयाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाणे गवयाने दुसऱ्याच दिवशी हत्तीच्या गळ्यात एक ढोलके व तंबोरा बांधला व त्याला राजधानीच्या मुख्य रस्त्यावर सोडले.

हत्ती जाताना इकडे तिकडे सोंड हलवी व ती ढोलक्यावर पडत असल्यामुळे ढोलके वाजत असे व तंबोराही अधूनमधून सूर देत असे. हत्तीचा हा अवतार पाहून बघ्यांची एकच गर्दी जमली. त्या गर्दीमुळे हत्ती बिथरला व मोकाट सुटला. शेवटी याची तक्रार बादशाहपर्यंत आली. बादशाहला खरा प्रकार
कळल्यानंतर त्याने गवयाला पकडून आणण्याचे आदेश दिला.

गवई आल्यावर अकबर बादशाह त्याला म्हणाला, ‘मी तुला इनाम दिलेला हत्ती तू असा मोकळा का सोडलास!’त्यावर गवई हात जोडून बादशाहला म्हणाला, ‘खाविंद माफ करा, मला या हत्तीचे पालनपोषण करणे अशक्य आहे. म्हणून मीच त्या हत्तीला सांगितले, की मी जसे गायन करून माझे पोट भरतो तसेच तूही गायन-वादन करून तुझे पोट भर. म्हणून मी त्याच्या गळ्यात ढोलके व तंबोरा अडकवून रस्त्यावर सोडला.

त्याचे उत्तर ऐकून बादशाहला त्याच्या या युक्तीमागे कोण आहे हे लगेच कळले. त्यामुळे त्याने त्या गवयाकडून तो हत्ती परत घेऊन त्याला सुवर्णमुद्राने भरलेली थैली दिली.

गवई मनापासून बिरबलाचे आभार मानत घरी परतला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..