नवीन लेखन...

गरज नेटीझन वॉरिअर्स बनण्याची

 काही शतकांपूर्वी घोडदळ, पायदळ इत्यादी युद्ध पद्धतींचा अवलंब करून शत्रूशी युद्ध भूमीत सामना केला जायचा. इतिहासातील नमूद सर्व युद्धांचा कारणमिमांसेकडे आपण लक्ष दिल्यास कदाचित त्याची कारणे भिन्न असू शकतील पण या उपर सर्व समावेशक कारण मला दिसले ते म्हणजे स्व-अस्तित्वाचे कारण. स्वतःच्या अस्तित्वावर कुणी घाला आणला किंवा त्या भावनेला कुणी आव्हान केले तर सशस्त्र लढा व्हायचा आणि तसा लढा आजही होतो. अगदी पुरातन काळापासून चालत आलेल्या या युद्धपरंपरे मध्ये बारकाईने लक्ष दिल्यास एक बाब जाणवते, ती त्या युद्धाची बदलती युद्धनिती… ज्यांच्याकडे आधुनिक युद्ध प्रणाली अवगत असून तिचा वापर करणारे निपूण सैन्य आहे त्यांचीच युद्धात सरशी झालेली दिसते. २६/११ ला झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये ए-के ४७ बंदुकींसमोर पोलिसांची पारंपारिक बंदूक कशी फीकी पडली हे उभ्या जगाने पाहिले. भारताने आज जरी यशस्वीरित्या अणूचाचण्या देऊन जगासमोर आपली ताकद सिद्ध केली असली तरी देशासमोरची अतिरेकी आव्हाने संपुष्टात आणण्यास भारताला तितकेसे यश आलेले नाही. आजही मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी दिवसा ढवळ्या बॉंबस्फोट होत आहेत. असो, पण आता भारताला स्वरक्षणासाठी नवीन युद्ध प्रणालीचा शोध लावून त्याची अंमलबजावणी करणे अनिवार्य झाले आहे. मुंबईत ११ ओगस्ट रोजी झालेली हिंसक दंगल आपल्याला शत्रूच्या नवीन युद्ध प्रणालीची झुळूक दाखवून देते. पाकिस्तान मध्ये बसून आतंकवाद्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून मुस्लीम बांधवांना भडकाऊ मेल आणि एसेमेस पाठवून हिंसक वातावरणाची निर्मिती केली. परिणामी सी.एस.टी जवळ हिंसक दंगल उसळली, भीतीचे वातावरण तयार झाले आणि पुन्हा अतिरेक्यांनी आपले पहिले लक्ष्य साध्य केले. दु्सऱ्या लक्ष्याकडे अतिरेक्यांची कूच म्हणजेच नोकरीसाठी देशभर पसरलेल्या आसामच्या मुलांच्या मनामध्ये ई-मेल, एसेमेस आणि सोशल साईट्सच्या माध्यमातून जीवाला धोका असल्याची भीती निर्माण केली. हा सर्व प्रकार अतिरेक्यांनी घरबसल्या इंटरनेट तसेच सोशल साईट्सच्या माध्यमातून साध्य केले. आता भारताला सीमेवरून होणार्‍या परकीय आक्रमणाबरोबरच इंटरनेट आणि सोशल साईट्सच्या माध्यमातून होणार्‍या हल्ल्यावरती गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सायबर क्राईम मधील कायद्याच्या अंमलबजावणी कडे सरकारने लक्ष देणे ही काळाची गरज झाली आहे. आता यापुढे होणारे हल्ले हे इंटरनेटच्या माध्यमातून देखील होऊ शकतात याची ताजी झुळूक लागलेल्या भारताने या घटनेतून आज वेळीच शिकून शहाणे होण्याची गरज आहे. पर्यायाने आपण सर्व नेटीझन, इंटरनेट आणि सोशल साईट्स हाताळताना जागरूक राहणे सुरक्षित भारतासाठी गरजेचे आहे.

— श्री.स्वप्निल सुर्यकांत चाळके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..