नवीन लेखन...

खर प्रेम काय असत?????

एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता. त्याने पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक हरीणी त्याच्या शेजारी येऊन बसली. जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे. एक दिवस गेला. दोन दिवस गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. धनगर जसजसं ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे येऊन जवळ बसुन रडु लागायची. मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता मध्येच थांबला. ती हरीणी रडणं थांबवुन निघुन जाऊ लागली. त्याने पुन्हा वाजवायला सुरुवात केली. हरीणी पुन्हा जवळ आली. धनगराने हरीणी समोर हात जोडले आणि म्हणाला, माझं काही चुकतं का गं? मी कित्येक दिवस बघतोय जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो. तेव्हा तेव्हा तु ईथे येऊन रडतेस. कारण काय आहे. सांगना माझं काही चुकतं का गं?

तेव्हा ती हरीणी म्हणाली, तुम्ही कोण आहात मला माहीती नाही, हे काय वाद्य आहे मला माहीती नाही, पण जेव्हा तुम्ही हे वाद्य वाजवता. यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या.. काळजावर घाव घालते हो, कारण याला जे कातडं लावलंय ना, ते माझ्या आयुष्याचा साथीदार,माझ्या नवर्याचं आहे..

हे ऐकुन धनगर निशब्द झाला..

हरीणी पुढे म्हणाली, माझी एक विनंती आहे तुम्हाला, माझ्या मृत्युनंतर या वाद्याच्या एका बाजुला माझं कातडं लावा, कारण या वाद्यातुन मनाला परमोच्च सुख देणारे संगीत तेव्हाच बाहेर पडेल..जेव्हा दोन्ही बाजुंनी ढोल तितक्याच लयमध्ये वाजवला जाईल.म्हणजेच त्याच्या एवढंच दुःख मलाही सहन करावं लागेल..असं म्हणुन त्या हरीणीने जागीच प्राण सोडले..दुःखी मनाने त्या धनगराने त्या हरीणीचं कातडं ढोलच्या एका बाजुला लावलं. आज तो ढोल वाजवताना त्या हरीणीच्या डोळ्यातुन पाणी येत नाही. पण तो ढोल वाजवणार्या धनगराच्या डोळ्यांत मात्र अश्रु दाठुन येतात कारण जेव्हा तो ढोल दोन्ही बाजुने वाजतो ..
तेव्हा त्याला वाटतं ते जोडपं एकमेकांशी बोलुन आपली सुख दुःखं वाटुन घेत आहेत. ज्यांनी जन्मच नाही तर मरण देखील वाटुन घेतलं…….

प्रयत्न माझा नेहमी येवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी. आपण कधी भेटु अगर न भेटु, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकाना. माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!!

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..

— प्रा. हितेशकुमार पटले

प्रा. हितेशकुमार पटले
About प्रा. हितेशकुमार पटले 15 Articles
प्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.

1 Comment on खर प्रेम काय असत?????

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..