नवीन लेखन...

किल्ले सुधागड



|| श्री बल्लाळेश्वर प्रसन्न ||

दुर्गसखाचा पहिला वर्धापन दिन हा दणक्यात साजरा झाला…… सुधागड शेवटी काळोख्या रात्रीच सर केला.

किल्ले सुधागड ह्यावर काही माझे मनोगत मांडत आहे .

३१ जुलै २०१० रोजी दुपारी १२:३० ची एस .टी पकडून जायचे ठरले होते. पण….माझ्या कामाच्या वेळेने त्यात व्यत्यय आणला होता.

मी आणि माझा मित्र अभी ( काळू) आम्हा दोघांना हि त्या वेळेने कोड्यात ठेवले होते..पण आम्ही ठरवले कि पहिले वर्धापन दिन आणि आपण नाही …..! म्हणून सकाळीच घरातून सर्व तयारीने BAG भरून बाईक काढली आणि थेट कामावर रुजु झालो. दुपारी ३:३० च्या दरम्यान कामावरून पळ काढून थेट मुलुंड ला पोहचलो आणि तेथून अभीला घेतले आणि ४:०० च्या दरम्यान पाली च्या मार्गावर आम्ही प्रस्थान केले . आमच्या आधी निघालेले माझे सवंगडी हे मज्जा करीत होते आणि त्रस्त हि झाले होते,कारण दुपारी निघालेली एस.टी हि पनवेल नंतर खूपच रडत रडत जात होती.मी आणि अभी लवकरात लवकर पोहचून आपल्या मित् रांना पालीतच गाठावे अशी हुरहूर माझ्या मनात होती,आणि तसे झाले सुद्धा…कारण सकाळ पासून जोर पकडलेल्या पावसाने आमच्या निघण्याच्या वेळी थोडा का होईना शांत झाला होता.पाली २ KM असताना सुबोधचा फोन आला कि आम्ही पाली हून पाच्छापूर मार्गे ठाकूरवाडी गावात जाऊन

थांबत आहोत.तुम्ही हि आम्हाला तेथेच येऊन भेटा. ६:३० च्या दरम्यान पालीत येऊन आम्ही धडकलो.

काही समान हि घ्यायचे होते ते अभी ने घेतले आणि मी सरसगडाचे दर्शन घेतले.थोडा चहा आणि गरम गरम भाजी वर ताव मारून आम्ही ठाकूरवाडी गावाचा मार्ग धरला.रस्ता माहित नसल्यामुळे मी आधीच एका गाववाल्याकडून पूर्ण रस्त्याची माहिती घेतली आणि तेथून आम्ही निघालो.जस जसा पाच्छापूर गावाचा फाटा जवळ येत होता तस तसा मकरंद ने सूचित केलेली वाक्य माझ्या डोक्यात भिनत होती. कारण पाली ते ठाकूरवाडी हे अंतर १३ कम चे होते आणि खूप भयानक होते ,त्यातल्या त्यात अंधार हि झाला होता .अंधार्या रात्री लुटमारी तसेच दरोडा घालून ठार मारण्याच्या गोष्ठी ह्या वाटेत होतात,पण बल्लाळेश्वराची कृपा तसेच मित्रांना भेटण्याची आस आणि काळोख्या रात्रीच सुधागड सर करण्याची जिद्द मनात असल्यामुळे आम्ही तो मार्ग पार केला आणि ८ :०० च्या दरम्यान आम्ही ठाकूरवाडी गावात येऊन पोहचलो. तो क्षण खूप आनंदाचा होता ,आमच्या चिंतेत राहिलेले माझे मित्र आम्हाला पाहून आनंदाने ओरडू लागले. मकरंद तर पहिले येऊन मला मिठी मारली,तसा दिवसही मैत्रीचा होता ना … FRIENDSHIP DAY . मकरंद आणि सुबोधच्या डोळ्यातून तो मैत्रीचा भास हा मला दिसत हि होता.पावसाने हि तो क्षण पाहून आनंदाने जोरात आनंदा आश्रू पडू लागला . हर हर महादेवाचा गजर करीत आम्ही ८:३० च्या दरम्यान गड चढण्यास सुरवात केली.

ह्या ट्रेक मध्ये मी,मकरंद,आशिष,अभी,सुरज,सुबोध,मधुर,अमेय आणि नवोदित ट्रेकर पूनम हे सर्व जन होते . सर्वांनी आपापल्या खांद्यावर ओझी घेऊन गडाचा मार्ग धरला. अर्ध्या तासाच्या चालनिनंतर आम्ही वाटेतील लोखंडी शिडी येथील वाटेवर येऊन पोहचलो.आता पाऊसही थांबला होता आणि मी फोटोसेशन करण्यास सज्ज झालो . यंदाच्या ट्रेक मध्ये एक नवीन फुलपाखराचे जोडप जुन्या फुलपाखराच्या जोडप्याला साथ देत होत..म्हणजे फोटो सेशन साठी हा……….! थोडे से निरनिराळे फोटो काढून आम्ही परत गडाच्या दिशेने चालू लागलो. पूनम तर हि खूप वैतागली होती कारण १० मिनिट १० मिनिट करत आम्ही तिला २ तास चालवले होते,पण आमचे १० मिनिट काही संपले नव्हते.

आम्हाला जो वाटाड्या मिळाला होता त्याचे नाव गणेश होते.योगायोग पहा बल्लाळेश्वराचे दर्शन आपण परतताना घेऊ असे सर्वांच्या मनात होते , पण बल्लाळेश्वराने दुसर्या रुपात येऊन आम्हाला गडाची वाट दाखून आम्हाला सुखरूप वर गडावर पोहचवले.सुमारे ११:३० च्या दरम्यान आम्ही गडावरच्या त्या वाड्यात येऊन पोहचलो.सुधागडाविषयी थोडे मी वाचले होते,म्हणून त्याचा वाचलेला इतिहास डोळ्यांसमोर माझ्या न्याहाळत होता.

सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव ,सुधागड हा तसा खूप प्राचीन किल्ला आहे . पुढे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री शिवाजी छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने “सुधागड” हा इ.स. १६४८ साली स्वराज्यात सामील झाला. पूर्वी ह्या गडाचे नाव भोरपगड असे होते. महाराजांनी त्याचे नाव “सुधागड” असे नामकरण केले.आम्ही ज्या पाच्छापूर मार्गे आलो होतो तेथेच संभाजी राजे आणि औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर ह्यांची भेट पाच्छापूरात झाली होती.महाराजांच्या अष्टप्रधान मधील असलेल्यापैकी अण्णाजी दत्तो ,बालाजी चिटणीस,त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ,आणि हिरोजी फर्जद ह्यांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीनी सुधागड परिसरातील परली ह्या गावत हत्तीच्या पायी दिले होते.सुधागडावर येण्यास ३ मार्ग आहेत,साव्वानीचा घाट,नानदंड घाट,आणि पाच्छापूरमार्गे,आम्ही पाच्छापूरमार्गे वर गडावर आलो होतो.आम्ही ज्या वाड्यात थांबणार होतो त्या वाड्याचे नाव साचिंवा वाडा.

महत्वाची एक गोष्ट अशी कि त्या वाड्याच्या

समोर आता एक धर्मशाला बांधली आहे,आणि त्यात ५०-६० मानस आरामात राहू शकतात.आमच्यासारखेच उत्साही आणि दुर्ग प्रेमिचा १ ग्रुप पहिलाच तेथे येऊन मुक्कामाला थांबले होते.त्या ग्रुपचे नाव ” युथ होस्टेल” अनुशक्तीनगर मधील

४५ जणांची हि टोळी होती ,आणि सर्व ABOVE 45AGE च्या वरचे ते होते. मकरंद ,सुरज आणि मी आम्ही झोपण्याची चांगली जागा शोधात होतो,तर अभी आणि आशिष गडावर वसलेल्या श्री भोराई देवीच्या गाभार्यात झोपण्या इतकी जागा आहे कि नाही हे बघण्यास गेले होते. तर अमेय सुबोध,मधुरा,आणि पूनम हे MAAGGI बनवीत होते.गरम गरम ती MAAGGI हि बनत होती आणि मकरंद आणि सुरज ह्यांचे सुसंवाद चालत होते.मी मात्र दुसर्या कोणाच्या आठवणीत वेळ घालवत होतो.वाड्याच्या पत्र्यावर पडणारे ते पावसाचे थेंब आणि त्यातून येणारा तो आवाज आणि हातात गरम गरम MAAGGI काहीतरी वेगळाच अनुभव होता. खाऊन पिऊन झाल्यावर परत आपल्या कामाला मंडळी लागली.सकाळच्या जेवणाची तयारी आम्ही रात्रीच करू लागलो. आम्ही म्हणजे ते दोन जोडपे आणि त्यांच्या जोडीला अभी आणि आम्ही चौघे सुस्तावून मस्त झोपून त्यांचे काम पाहत होतो.पण थोड काम आपण हि कराव म्हणून लसून सोलायला त्यांना मदत केली.सुमारे १:३० च्या दरम्यान सर्व कामे आपटून आम्ही सर्व निद्रआवस्थेत गेलो.

सकाळच्या प्रहरी लवकर उठून आम्ही आमचा पहिला वर्धापन दिन साजरा केला. पहिलाच मुक्काम ठोकलेल्या युथ होस्टेलच्या ग्रुप ने आमचे अभिनंदन हि केले आणि शाबाशकी हि दिली. आमच्या वर्धापन दिनात ते हि सामील झाले.दुपारच्या जेवणाची पूर्ण तयारी आम्ही त्या दोन जोडप्यांना दिली होती आणि ती त्यांनी व्यवस्थित पार केली होती.पूनमचा हा तर चढताना शेवटचा ट्रेक आहे माझा असेच वाक्य निघत होते पण नंतर तिचे ब्रीद वाक्य कसे काय बदलले देव जाणे .तिचा हा पहिलाच ट्रेक होता आणि सर्वांपेक्षा ती जास्तच उत्साही होती आणि चालताना धडपडत होती. त्या नंतर आशिष ने आपली कालागीरीचे नमुने दाखविण्यास सज्ज झाला .तो एक उत्कृष्ट असा क्यालीग्राफार आहे,त्याचे ते कलागिरी पाहून आम्ही तर पहिलेच थक्क झालो होतो पण नवीन लोकांनी तर त्याचे खूपच कौतुक केले. अप्रतिम अशी त्याची रेखाटन होती.काही नि तर त्याची रेखाटणे घरी फ्रेम बनवून लावण्यासाठी घेऊन गेली. सकाळची न्याहारी झाली आणि आम्ही सर्व जन गड पाहण्यास निघालो.गडावर पाहण्यासारखे खूप काही आहे. भोरेदेवीचे मंदिर,टकमक टोक,महादरवाजा,पडके वाडे, तलाव,पाण्याच्या टाक्या , तलाव भरण्यासाठी चातुर्याने मार्ग काढलेले ते मार्ग हे सर्व खूपच अप्रतिम होते. प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथली माहिती गोळा करून आणि फोटो सेशन करून आम्ही महादारावाज्यापाशी येऊन पोहचलो.मकरंदने मग जोरात घोषणा देऊन तेथील परिसर हादरवला तर होता आणि सर्वांच्या नसानसात आपल्या संस्कृतीचा झेंडा रोविला पण होता. महादरवाजा हा मला रायगडावरील नगारखान्याची आठवण करून देत होता. हुबेहूब तशी कलाकृती आणि नक्षीकाम होते. तेथे थोडा वेळ थांबून मग आम्ही चित्र -विचित्र फोटो काढले , मजा केली आणि परत वाड्याच्या दिशेने चालू लागलो. सुमारे १२ च्या दरम्यान वाड्यात येऊन आम्ही दुप
ारचे जेवण केले. अप्रतिम तो झालेला पुलाव खाऊन आता सर्वाना झोप आणि त्यांच्या मुखातून जांभई निघत होत्या. लगेच मग मकरंद आणि सुबोधने आजून एक दिवस गडावर मुक्काम करायचे ठरवले. पण मी आणि अभी कामावर रुजू होण्यास जायचे असल्या कारणाने घराची वात पकडली.तसा सर्व मित्रांनी आग्रह हि केला कि थांब रे गाड्या जाऊ या आपण उद्या ……….पण सुट्टी नसल्यामुळे आम्ही तेथे थांबू शकलो नाही. परत एकदा सर्व मित्रांना आलिंगन देऊन आणि ग्रुप फोटो कडून आम्ही घाराची वात पकडली. सुमारे ३ च्या दरम्यान गडाच्या पायथ्याशी आम्ही येऊन पोहचलो ,शेवटचे सुधागडाचे दर्शन घेतले,गाडीला किक मारून थेट पाली गाठले. बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही तेथून खोपोली मार्गे लागणार्या वरदविनायकाचे हि दर्शन घेतले आणि ६:४५ वाजता घरी परत परतलो .

मैत्रीचा तो दिवस हा मी कधी विसरू शकणार नाही . आम्ही गेल्यानंतर आमच्या संस्थेच्या मित्रांनी ” दुर्गसखा” नावाची परंपरा हि जोपासली. तेथे त्यांनी काही आंब्याची झाडे लावली,तसेच पूर्ण वाडा हा साफ केला आणि तसेच तेथे राहणाऱ्या आदिवासी जोडप्यांना जुन्या कपड्यांचा तसेच काही खाद्य पदार्थांच्या रुपात यथाशक्ती मदतही केली.

दुर्ग दर्शन हे केवळ मजा मस्ती,मौज करण्याचे ठिकाण नाही,तर काही तरी निवीन शिकणे,जिद्द निर्माण करणे,आणि मनातील भय घालवणे यासाठी हि दुर्गदर्शन करावे. खूप काही शिकता येत आणि खूप काही शिकवत आणि खूप काही दुसर्यांना शिकवता हि येईल असे आपल्या महाराष्ट्रातील डोंगररांगा आहेत. समर्थ रामदासबोधात म्हणतातच

जे जे आपणासी ठावे | ते ते हळू हळू सिकवावे | शहाणे करून सोडावे | अवघे जण ||

शेवटी सांगण इतकच कि संस्कृती टिकवाल तरच टिकाल ……

चेतन र राजगुरु ९९८७३१७०८६मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा.

— चेतन राजगुरु

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..