नवीन लेखन...

काहीच्या काही – मधु आणि मधुमाशी

मला मधुमाश्यांची भयंकर भीती वाटते. कारण हि तसेच आहे, बालपणीची गोष्ट १२-१३ वर्षांचा असेल.  दिल्लीच्या बिर्लामन्दिराच्या मागे असलेल्या जंगलात मित्रांसोबत फिरत होतो. अचानक समोरून मधुमाश्यांचे भले मोठे सैन्य चालून येताना दिसते.  कुणीतरी बहुधा त्यांची खोड काढली असावी. पण मधुमाश्यांच्या न्यायच  अजब, गुन्हेगार कुणी का असेना, जो समोर दिसेल त्याला डसा. जीव मुठीत घेऊन पळालो. बहुधा उसेन बोल्टचा रिकार्ड सुद्धा मोडला असेल. ओलम्पिक असते तर नक्कीच सुवर्णपदक मिळाले असते. तरीही शरीरावर कित्येक ठिकाणी मधुमाश्यांच्या चुंबनांचे वेदानामयी काटे उमटलेच.  या घटनेनंतर एखाद दुसरी मधुमाशी दिसली तरी अंगावर काटे येतातच.

कालचीच गोष्ट सकाळी-सकाळी अंगणातल्या झेंडूंच्या फुलांना पाहत होतो. एक मधुमाशी चेहऱ्याजवळ घोंघावत आली चक्क मानवी आवाजात म्हणाली, ‘ए थेरड्या‘ बघतोस काय, समोरची बादली उचल आणि फुलांवर पाणी घाल. क्षणभर मी गोंधळलोच, काय करावे सुचेनासे झाले. ती पुन्हा ओरडली ‘मुकाट्याने पाणी फुलांवर टाकतो, कि दाखवू इंगा‘.  बालपणीची आठवण जागी झाली. दचकून म्हणालो, घालतो बाबा, पण एक सांग फुलांवर पाणी कशाला घालायचे. मुर्खा एवढे कळत नाही, फुल पाण्यात भिजले कि त्यातले परागकण हि भिजतील. भिजलेले पराग पियुन मला ‘पातळ आणि भरपूर मधु’ बनविता येईल.  स्वस्त असे पातळ मधु विकून आमचा मालक हि चांगली कमाई करेल.

काही इलाज नव्हता, मुकाट्याने फुलांवर पाणी घालू लागलो. अचानक दुसर्या दिशेने दुसरी मधुमाशी वेगाने येताना दिसली. जवळ येऊन तीही ओरडली,  पांढरेकेस वाल्या, ते पाणी घालणे थांबव आधी. मला काही समजेनासे झाले, पहिल्या मधुमाशी कडे बघितले, दुसरी जोरात ओरडली, ‘कळत नाही का, फेक ती बादली. मी चुपचाप पाण्याची बादली खाली ठेवली. हिम्मत करून तिला विचरले,  ती फुलांवर  पाणी घालायला सांगते आणि तू पाणी घालू नको म्हणते, का? हा काय प्रकार आहे.  दुसरी मधुमाशी म्हणाली, वाळक्या फुलांच्या पराग पिऊन मी चांगले घट्ट असे मध बनविते.  हिच्या सारखे, मधात पाण्याची भेसळ नाही करीत. आमचा मलिक दर्जेदार घट्ट मध विकतो.  मी फुलांना पाणी घालणे थांबविले आहे, हे पाहून पहिल्या मधुमाशीला राग आला, ती माझ्यावर जोरात डाफरली, फुलांच्या वर पाणी घालतो कि नाही थेरड्या कि तुला शिकवू धडा? दुसरी तेवढ्याच त्वेषाने ओरडली, तिचे ऐकू नको, माझ्या दंश तिच्यापेक्षा जालीम आहे. काय करावे मला सुचले नाही, शेवटचा मार्ग पाण्याची बादली खाली ठेऊन खोलीच्या दिशेने धूम ठोकली. कानावर फक्त ऐकू आले, पळतो आहे हरामखोर, सोडणार नाही तुला. 

आई…ई, करत जोरात ओरडलो. डोळे चोळीत उठलो. सौ. पण  दचकून जागी झाली. काय झाले?  मी म्हणालो,  बहुतेक मधुमाशी डसली वाटते. सौ.ने काही नाराजगीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, इथे बंद खोलीत कुठून मधुमाशी येणार, डास चावले असतील. काहीच्याबाही विचार करत राहतात आणि असले भुक्कड स्वप्न तुम्हाला पडतात. माझी हि झोपमोड होते. बाय द वे चावली कुठे? मी म्हणालो, चावली नाही ग. गालाचे चुंबन घेतले. सौ. पुढे काही बोलली, नाही चुपचाप अंगावर पांघरून घेऊन, पाठ फिरवून झोपून गेली. स्वत:ला मनोमन दाद दिली, बायकांची बोलती बंद करायचा चांगलाच अनुभव आहे, अस्मादिकांना. 

सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे फिरायला गेलो. येताना ओळखीच्या किरणाच्या दुकानासमोर थांबलो. समोर रेकवर मधाच्या बाटल्या ठेवलेल्या दिसत होत्या, चाचपत-चाचपत हळूच त्याला विचारले, हे मध पातळ वाले आहे, कि घट्टवाले?  त्याने विचित्र नजरेने मजकडे पाहिले आणि तेवढ्याच हळू आवाजात विचारले, अंकल, आज सुबह सुबह ही….डोक्यावर हात मारला..च्यायला मधुमाशींच्या चक्करमध्ये येऊन मद्य.ssपी ठरलो (काका,  मद्याला शिवत सुद्धा नाही, हे आता कुणाला खरे वाटेल).

डिस्क्लेमर: या कथेचा विज्ञापनांशी काही एक संबंध नाही.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..