कथा आणि व्यथा – तहान

जलदिना निमत्त ही कथा….

त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं याडया बाभळीची झाडे होती.त्याला पानं नव्हती राहीली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती.

गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या. बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती. त्यातल्याचं काही थोराडं पोरी, बायानं मात्र डर्म, डब्बे, कळश्या बकेटा काढल्या. आता तिथचं संसार थाटणारं होतं. त्यांना पाणी लागणारं होतं. हे कुठून पाणी आणणार ? मलाच प्रश्न पडला.त्या पटांगणात कुठं ही सार्वजनिक नळ नव्हता.हापश्या ही बंद होता. नळाला पाणी यायचं ही पंधरा दिवस बंद झाले होते.टॅकरने पाणी पुरवठा होतं होता.

त्यात वशिल्यावाल्याला… नगरसेवकाच्या जवळच्याला पाणी जास्त दिलं जातं होतं.

टॅकर आलं की महायुध्द सुरू झाल्या सारखा महोल होतो. दोन दिवसापूर्वीच दोन गटात टॅकर मध्ये पाईप टाकण्यावरून तुंबळ हाणामारी झाली होती.त्या हाणामारीला थांबता थांबवता…पोलिसांच्या तोंडाचं पाणी पळालं होतं.कारणं त्या भांडणाला जातीय स्वरूप आलं होतं. जातीय स्वरूप आल्यावर मग काय दुसरं ? दंगलच…

आता यांना पाणी कोणं देणारं ? मलाच प्रश्न पडला. सहा सात बाया पोरी डर्म , कळशा , पात्यालं घेऊन निघाले. त्यांना पाणी हवं होतं.

आता या बापुडया कुठून पाणी आणणार…मलाच प्रश्न पडला.आता इथं जो तो पाण्यांनी परेशान. यांना कोण पाणी देणारं ?

तो सारा ताफा हापश्या जवळ गेला . हापश्याय… तो कधीचं बंद झाला होता. त्याचं दांडकं हालवून बघीतलं. त्यातून कसलं पाणी येतं? सा-याचं हिरमुसल्या. त्या पाण्याची शोध मोहीम सुरू झाली ?

पाणीचं कुठं दिसेना.

आता त्यांनी मोर्चा…काॅलनीतल्या घरांकडे वळवला. अगोदर त्या नुसत्याचं फिरल्या…पाण्याचा त्यांना काही ठाव ठिकाणा दिसतो का हे पाहिलं. ओपन पाणी कुठं दिसतं असत व्हयं ? कुठं आता.त्या जाईत दारं वाजवतं. पाणी मागतं.त्यांना कोण पाणी देतं.जारचं विकतं पाणी घेणारे कुठं फुकट पाणी देतत असतेत का ?

भला मोठा खंडा पाहिला की गपकन दार बंद होईत.काही दारं तर उघडतचं नव्हती. कुणी नुसतं खेकसतं होती.कुत्र्यावर भुंकावं तशी भुंकत.
मला तर प्रचंड दया येत होती पण मी काही करू शकत होतो . दयेचा पाझर काळजात होऊन ही मी काहीच करू शकतं नव्हतो. कधी कधी आपण दयेच्या पाझर करण्या पलीकडं काहीचं करू शकतं नाही. मी हतबल होतो. जेमतेम दोनच बकेट पाणी होतं माझ्याकडं
ते मेटाकुटीस आले.पाणी दिसत नव्हतं…आणी कुणी बोलतं ही नव्हतं.

आता हे काय करणारं ? मला उत्सुकता लागली होती.

देवगावकरचं घर त्यांना दिसलं. तो मात्र दारातल्या झांडांना पाणी घालतं होता. त्याच्या बोअरला पाणी बरं पाणी. त्याच्याकडं मोठा हौद…टॅकर आलं की तो डायरेक्ट भरून घेतो.मोटार टाकून…

त्याचं नाव घेण्याची ही सोय नाही. त्याचा मोठे वशिलेत. नगराध्यक्ष कधी जेवायला त्याच्याकडे असतो.त्यामुळं त्याला पाण्याला कमी नव्हतं.

आमची सत्ता…आमचं माणसं… आमचं पाणी… असंचं वागणं असतं त्याचं. गल्लीतल्या माणसाला यांन कधी पाणी दिलं नाही. तो या भिका-यांना कधी पाणी देणं शक्य नव्हतं.

पाणी पहायला भेटल्यामुळे ती झुंबड काही पुढे सरकेना. ते सारे नुसतं पाण्याकडं पहात राहिले. टूकमूक …

लाचार नजरेनं सा-या पाहू लागल्या. देवगावकर…रागानं त्यांच्याकडे पहात होता. त्या हालत नव्हत्या.उलट एकीने पुढं जाऊन धाडसानं ओठं उचकले.

” दादा दे ना पाणी. ”
” पळा.. पाणी बिणी काय नाही.”
” दे ना रे…एक एक डराम दे फक्स्त…”
” पळा हे पाणी फुकाटचं नाय….
” दे ना रे दादा पाया पडते .हात जोडते. तहानलेरे…”
” आता पळता का कसं ..” तो पार मारायला धावला. ते भिकारीच लयं चिवाट….
मग हळूहळू ते पार कंपाऊडच्या एक एक आत शिरले. आता मात्र देवगावकरचा ताबा सुटला. हातातला पाईप खाली टाकला. त्यांच्या माग पळाला तस सारे धूम…एक प्रौढ बाई पळाली नाय.
अरे दादा हाणते काय ? झाडाला पाणी देते अन् माणसाला नाय. दे ना तहानलीरं लेकरं ..”
” पळ .भिकारडे.. पाणी फुकटं नायं”
“मग विकते देते काय ,”
” जाती की नाय .आयघाले …” देवगावकर डायरेक्ट शिव्याचं दयायला लागला. अंगावरच धावला तशी ती तिरकं तिरकं हालली.

देवगावकरनं मोटारचं बंद केली.ते मनालाचं लाजलं. घरात गेला.
ते सारे पालावर आली. पाणी नव्हतं .पालं टोकून गडी दमून गेले असतीलं. तहानले असतील. डरम तर सारे रिकामेचं. एक दोघानी त्या रिकाम्या डरमावर…लाथा घातल्या. थोडा कालवा झाला. सारे गप झाले.
मी थोड आत आलो. पाणी प्यालो. माझी तहान तृप्त झाली पण…
त्यांची तहान….? या जगात असे किती लोक असतील…ते पाणी नाही पिऊ शकतं. रानावनात किती प्राणी ,पक्षी किटक असतील त्यांना जिवंत राहण्यासाठी पाणी नाही.
पाणी… आणि ….काही काही आठवत राहिले. दारात आलो तर…

पहातो तर देवगावकरच्या दारातं गर्दी होती. एक पोरगी पकडली होती.तिला चोर चोर म्हणून मारलं होतं. तिनं देवगावकरच्या नळाचं पाणी चोरलं होतं. हिसकावुन घेतलेला …हंडा ….सांडलेलं पाणी…माती पाणी माती पितं होती पण तिला पाणी नव्हतं.
तिच्या डोळ्यात प्रंचड चीड आणि चेह-यावर….भंयकर तहान दिसतं होती. ती तहान नक्कीचं पाण्याची नव्हती….ती माणसाच्या रक्ताची ही असू शकते.

परशुराम सोंडगे,पाटोदा ( बीड )
9673400928About परशुराम सोंडगे 11 लेख
परशुराम सोंडगे हे स्तंभलेखक असून बीड येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक सुराज्य, दैनिक चंपावतीप्रत्र वगैरे वृत्तपत्रांतून लेखन करतात. ते “आई गातो तुझी गाणी” हा कविता व कथांचा बहारदार कार्यक्रम सादर करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…